जाहिरात

Amravati Mayor Election: अखेरच्या क्षणी भाजपची मोठी खेळी, अख्खं सभागृह बघतच राहिलं, काय घडलं? पाहा VIDEO

Amravati Mayor Election: अमरावती महापालिकेच्या 87 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत विजयासाठी 44 मतांच्या बहुमताची गरज होती. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीकडे आधीच स्पष्ट बहुमत होते.

Amravati Mayor Election: अखेरच्या क्षणी भाजपची मोठी खेळी, अख्खं सभागृह बघतच राहिलं, काय घडलं? पाहा VIDEO

शुभम बायस्कार, अमरवती

Amravati News: अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. 'बडनेरा' येथील एमआयएमच्या महिला नगरसेविका लीलाबाई (मीरा) कांबळे यांनी भाजपचे महापौर पदाचे उमेदवार श्रीचंद तेजवानी* यांना हात उंचावून जाहीर मतदान केले. कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या एमआयएमने भाजपला मतदान केल्याने महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

महायुतीचे संख्याबळ आणि विजय

अमरावती महापालिकेच्या 87 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत विजयासाठी 44 मतांच्या बहुमताची गरज होती. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीकडे आधीच स्पष्ट बहुमत होते. भाजप 25, युवा स्वाभिमान पार्टी (रवी राणा गट) 15, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 11, शिवसेना (एकनाथ शिंदे) 3 असं एकूण 54 नगरसेवकांचा संख्यांबळ भाजपकडे आहे. अशा परिस्थितीत श्रीचंद तेजवानी यांचा विजय निश्चित मानला जात होता, मात्र एमआयएमच्या नगरसेविकेने त्यांना मतदान केल्याने भाजपचे संख्याबळ अधिकच वाढले आहे.

(नक्की वाचा-  MHADA Lottery: म्हाडा लॉटरी अखेरच्या क्षणी लांबणीवर, अर्ज नोंदणी पुढे ढकलली; काय आहे कारण?)

पाहा VIDEO

एमआयएममध्ये खळबळ

एमआयएमच्या नगरसेविकेने भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे पक्षांतर्गत शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजपने एमआयएमचा नगरसेवक फोडल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. सभागृहात लीलाबाई कांबळे यांनी श्रीचंद तेजवानी यांना पाठिंबा दर्शवत हात उंचावला त्यावेळी सगळेचं अचंबित झाले. एमआयएमच्या इतर नगरसेवक त्यांना हात खाली करण्यासाठी सांगत असल्याचंही दिसून आलं. मात्र त्या आपल्या पाठिंब्यावर ठाम राहिल्या. 

(नक्की वाचा- Pune News: अजितदादांच्या मृत्यूच्या दु:खादरम्यान पुणे मनपाचा अजब निर्णय; चौफेर टीकेनंतर प्रशासनाला जाग )

अमरावती मनपातील पक्षीय बलाबल 

  • भाजप- 25
  • युवा स्वाभिमान पार्टी - 15
  • काँग्रेस - 15
  • एमआयएम- 12
  • राष्ट्रवादी (अजित पवार)-  11
  • शिवसेना (शिंदे गट) - 3
  • बसपा- 3
  • शिवसेना (ठाकरे गट)- 2
  • वंचित बहुजन आघाडी- 1
     

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com