
Rohini Khadse Pranjal Khewalkar: रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांचे लग्न कसे झाले?
Rohini Khadse Pranjal Khewalkar: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या पतीचे प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आलीय. या प्रकरणामुळे खळबळ उडालीय. 26 जुलै रोजी रात्री उशीरा पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पुणे पोलिसांनी छापेमारी करत ही पार्टी उद्ध्वस्त केली. यादरम्यान सोशल मीडियावर रोहिणी खडसेंचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्वतःच्या लग्नाची गोष्ट सांगितलीय. रोहिणी खडसेंनी नेमके काय म्हटलंय, जाणून घेऊया...
(नक्की वाचा: Pune Rave Party : पतीला रेव्ह पार्टीत अटक, 24 तासांनंतर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया)
रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांच्या लग्नाची गोष्ट
- राशप नेत्या रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांचं लग्न कसं ठरलं? याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- रोहिणी खडसे यांनी मुलाखतीत सांगितले की, तुम्ही जोडीदार शोधू शकता, फायनल आम्ही करू; अशी बाबांनी आम्हा भावंडाना मोकळीक दिली होती.
- प्रांजल खेवलकर आणि रोहिणी खडसे शाळेपासून मित्र आहेत. दोघं इयत्ता दहावीमध्येही सोबत होते.
- जेव्हा मी बाबांना प्रांजलसोबत लग्न करायचं असे सांगितलं तेव्हा त्यांनी परवानगी दिल्याचे रोहिणी खडसेंनी सांगितले.
- त्याचा-माझा परिवार आम्ही खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, मित्र आहोत. मूळचे मुक्ताईनगरचेच असल्याचंही त्यांनी सांगितले.
- चांगल्या रितीने आम्ही दोघंही संसार करतोय. तुझा निर्णय बरोबर होता, असं बाबाही म्हणतात, असेही त्यांनी मुलाखतीत सांगितले.
- एकमेकांना फार चांगल्या पद्धतीने आणि जवळून ओळखणारा परिवार आहे : रोहिणी खडसे
- त्यामुळे पाहण्याचा कार्यक्रम, पोहे आणणे असा काही प्रकार झाला नव्हता : रोहिणी खडसे
- रोहिणी खडसे यांच्या कुटुंबात दीर, भावजय, पुतणी, सासू असे सदस्य आहेत.
- रोहिणी खडसे यांनी लगाव बत्ती नावाच्या यू-ट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगितली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world