देवा राखुंडे, इंदापूर:
Indapur Election 2026: इंदापूरचे राजकारण सध्या कोणत्या वळणावर चाललंय याचा कोणाला थांग पत्ता लागत नाही, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी विरोधात भाजप असा सामना होईल असं चित्र असताना अचानक शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाऊन मिळाली ज्यामुळे इंदापुरात दादांचा पारडं जड झालंय. तीन निवडणुकीत दत्ता भरणेंकडून पराभव झाल्यानंतर ही हर्षवर्धन पाटील त्यांच्याच सोबत गेल्याने विरोधकांनी मात्र आग पाकड केलीय. पाहूयात या वरचा हा एक स्पेशल रिपोर्ट...
इंदापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र..
पुण्याच्या इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडत आहेत. नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे नेते प्रवीण माने तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आणि शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी कृष्णा भीमा विकास आघाडी केली होती. मात्र नगरपरिषद निवडणुकीत आघाडीचा दारुण पराभव झाला.
यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजप स्वतंत्र लढतील असा कयास बांधला जात होता. अशातच राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत वापरलेला आघाडीचा फॉर्मुला दोन्ही राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही वापरण्याचा निर्णय घेतला आणि इंदापुरात 1995 पासून अजित पवारांच्या विरोधात असलेले आणि सलग तीन वेळा दत्ता भरणेंकडून पराभव झालेले हर्षवर्धन पाटील आता अजित दादांसोबतच गेले.
इंदापूर नगर परिषदेत तिघांनी एकत्र येत केलेली कृष्णा भीमा विकास आघाडी ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत ही कायम ठेवली जाईल असं सांगण्यात आलं होतं मात्र अचानक हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे इंदापुरात आघाडीचे समीकरण बदललं आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप मैदानात उतरलाय. दोघांचं एकत्र येणं हे स्वार्थापोटी असून घराणेशाहीला लोकशाहीच्या मार्गातून जनता विरोध करेल आणि जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सर्व जागा आम्ही जिंकू असा मोठा दावाच इंदापूरचे भाजपचे नेते प्रवीण माने यांनी केला आहे.
हर्षवर्धन पाटील आणि आमचं काही बांधाच भांडण नव्हतं. आमचे राजकीय मतभेद होते दोन्ही नेत्यांनी ठरवले एकत्र यायचं आणि त्याच्यामुळे आम्ही एकत्र निवडणूक लढतो आहोत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला आहे.
Mira-Bhayander काँग्रेस आणि शिंदे शिवसेना एकत्र, भाजपच्या विरोधात तयार केली आघाडी
अजित पवारांकडून विरोधकांचा समाचार..
दोन्ही पवारांनी राज्यातील महानगरपालिकांची निवडणूक एकत्र लढली मात्र दोन्ही पवारांना मतदारांनी सपशेल नाकारलं. यानंतरही पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका शक्य तिथे एकत्र येऊन लढण्यावर शिक्कामोर्तब झालं आणि त्याची अंमलबजावणी इंदापुरातून झाली. मात्र राष्ट्रवादीच्या याच एकत्र येण्यावर विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. या आरोप प्रत्यारोपांना आता अजित पवारांनीही आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.
इंदापुरात जर हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे एकत्र आले आप्पासाहेब जगदाळे यांनी इतर लोकांनी साथ दिली तर बिघडलं कुठं असं म्हणत आम्ही वेगवेगळे लढलो की काही लोकांचं फावत त्यांना वाटतं आपल्याला कशी किंमत येणार मग तुम्हाला किंमत येण्यासाठी आम्ही एकमेकांच्या उरावर बसायचं का ? असं अजित पवारांनी म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world