मंगेश जोशी, जळगाव
Jalgoan Accident: जळगावातील रामदेववाडीजवळ भीषण दुर्घटना घडली आहे. भरधाव कारची बाइकला धडक बसल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेसह दोन लहान मुलांचा समावेश आहे. भरधाव कारमुळे बाइकवरील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
(नक्की वाचा: दिल्लीतील फर्जी गजाआड, कल्याण पोलिसांनी जप्त केल्या हजारोंच्या बनावट नोटा)
मृत पावलेले तीनही जण एकाच कुटुंबातील तसेच रामदेववाडी गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला. संतापलेल्या ग्रामस्थांनी दगडफेक आणि रास्तारोको करत जळगाव पाचोरा रस्त्यावरील वाहतूक अडवून ठेवली. तसेच संतप्त जमावाने बंदोबस्तामध्ये तैनात असलेल्या पोलिसांनी दगडफेक देखील केली.
कारच्या धडकेत बाइकवरील तिघांचा मृत्यू
Photo Credit: Reporter- Mangesh Joshi
(नक्की वाचा : डोंबिवलीत घरफोड्या करून उत्तर प्रदेशात बांधला आलिशान बंगला, चोरटे गजाआड)
परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिसरामध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की कारच्या धडकेनंतर बाइकचा अक्षरश: चुराडा झाला.
(नक्की वाचा: पालकांनो मुलांवर ठेवा लक्ष! इन्स्टाग्राममुळे अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त)