जाहिरात

Jalgaon News: बेवारस कार अन् रहस्यमय आवाज, बॉम्ब स्कॉडने दार उघडताच.. जळगावमध्ये काय घडलं?

एकीकडे युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना रेल्वे स्थानक परिसरात बेवारस स्थितीत कार आढळल्याने सुरक्षा यंत्रणाही तात्काळ अलर्ट मोडवर येत संपूर्ण परिसर हा रिकामा केला.

Jalgaon News: बेवारस कार अन् रहस्यमय आवाज, बॉम्ब स्कॉडने दार उघडताच.. जळगावमध्ये काय घडलं?

मंगेश जोशी, जळगाव: जळगाव रेल्वे स्थानक परिसरात बेवारस कार आढळल्याने एकच खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे कारमधून बीपचा आवाज येत असल्याने प्रवाशांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकारानंतर बॉम्ब शोध पथकाकडून बेवारस कारची तपासणी करण्यात आली. सदर बेवारस गाडी एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांची असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती समोर आली त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, जळगाव रेल्वे स्थानक परिसरात बेवारस स्थितीत एक कार आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून कारमधून बीपचा आवाज येत असल्याने प्रवाशांसह नागरिकांमध्ये ही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान एकीकडे युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना रेल्वे स्थानक परिसरात बेवारस स्थितीत कार आढळल्याने सुरक्षा यंत्रणाही तात्काळ अलर्ट मोडवर येत संपूर्ण परिसर हा रिकामा केला.

त्यानंतर बॉम्बशोध पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले व बॉम्ब शोध पथकाच्या मदतीने संपूर्ण कारची तपासणी करून कारचा दरवाजा उघडून कार मध्ये कुठलीही बेवारस वस्तू नसल्याचे लक्षात येतात सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान तांत्रिक कारणामुळे कारमध्ये बीप चा आवाज आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर सदर कार ही एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तर या प्रकरणात नो पार्किंगमध्ये कार उभी केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे.

नक्की वाचा - Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार

तसेच नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये असा आवाहन देखील पोलिसांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांशी फोन द्वारे संवाद साधला मात्र कुठलीही संशयास्पद कारमध्ये आढळले नसल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

करदात्यांची गोपनीय माहिती लीक होत असल्याचा आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com