मंगेश जोशी, प्रतिनिधी
Jalgaon Municipal Corporation Election 2026 : जळगाव महानगरपालिका निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी मतदान केंद्राबाहेरच बोगस मतदाराला पकडून मारहाण करण्यात आली. यानंतर मतदान केंद्राबाहेर गोंधळाचं वातावरण होतं. या प्रकरणी पोलिसांनी बोगस मतदानाचा आरोप असल्याच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमधील प्रभाग क्रमांक 5 मध्ये आर. आर. विद्यालयाच्या मतदान केंद्राबाहेर राडा झाला. अपक्ष उमेदवार पीयूष पाटील यांनी बोगस मतदाराला पकडून मारहाण केल्याने मतदान केंद्राबाहेर गोंधळ उडाला. पोलिसांनी बोगस मतदार असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. बोगस मतदार हा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराकडून पाठवण्यात आल्याचा दावा अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनी केला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्यालाही अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा आरोप आहे. या प्रकारामुळे आर आर विद्यालयाच्या मतदान केंद्राबाहेर दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला.
गोंधळामुळे मतदान केंद्राबाहेर काही काळ तणावाचे वातावरण
पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवत परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनीही भेट देऊन याची पाहणी केली. जळगावमधील प्रभाग क्रमांक 5 मध्ये आर. आर. विद्यालयाच्या मतदान केंद्राबाहेर राडा झाला असून अपक्ष उमेदवार पीयूष पाटील यांनी बोगस मतदाराला पकडून मारहाण केल्याने मतदान केंद्राबाहेर गोंधळ निर्माण झाला. बोगस मतदार हा शिवसेना शिंदे गटाचा असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार पीयूष पाटील यांनी केला आहे. दरम्यान अपक्ष उमेदवार पीयूष पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा आरोप शिंदे गटाचे उमेदवार विष्णू भंगाळे यांनी केला असून या प्रकारामुळे आर आर विद्यालयाच्या मतदान केंद्राबाहेर दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. तसेच मतदान केंद्राबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त हा परिसरात तैनात केला असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनीही भेट देऊन परिसराची पाहणी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
