जाहिरात

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर 5 किमी लांबच लांब रांगा; प्रवासी दुपारपासून अडकले, अनेकांचे हाल

गतिमान प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर गॅस गळतीमुळे वाहनाचा लांबच लांब रांगा लागल्याची घटना घडली आहे.

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर 5 किमी लांबच लांब रांगा; प्रवासी दुपारपासून अडकले, अनेकांचे हाल

लक्ष्मण सोळुंखे, प्रतिनिधी

Jalna News : गतिमान प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर गॅस गळतीमुळे वाहनाचा लांबच लांब रांगा लागल्याची घटना घडली आहे. दोनच दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर अपघाताची घटना ताजी असताना जालना एक्झिट पॉईंटपासून काही अंतरावर जामवाडी शिवारात नायट्रोजन गॅस घेऊन जाणारा टँकरला अपघात झाला होता. टँकरमधून गॅस गळती सुरू असल्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. 

समृद्धी महामार्गावर ५ किलोमीटर लांबच लांब रांगा...

दुपारच्या वेळेस नायट्रोजनचा टेम्परेचर 65°c च्या आसपास असल्यामुळे गॅस रिफीलिंगला उशीर झाल्यामुळे समृद्धी महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टेम्परेचर कमी होताच नायट्रोजनच्या गॅस रिपेरिंग काम सुरू करण्यात आला. अनेक वाहनं समृद्धी महामार्गावरील जालना शहरातून जालना - संभाजीनगरकडे वळवण्यात आली आहे.

नक्की वाचा - ठाणे ते बोरिवली...! देशातील सर्वात लांब बोगदा; दीड तासांचा प्रवास 15 मिनिटात, 11 KM मार्ग कसा असेल?

त्यामुळे समृद्धी महामार्गावरील जालना एक्झिट पॉईंटपासून 5 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या टँकरमध्ये गॅस रिफिलिंग झाल्यानंतर समृद्धी महामार्ग मोकळा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी समृद्धी महामार्गावर दुपारपासून अडकून पडल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com