
कल्याण: कल्याण स्टेशनवरील थंड पेयांच्या अनधिकृत टपऱ्यांवर आज पुन्हा एकदा तोडक कारवाई करण्यात आली. याआधीही अनेकदा अशी कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत एखाद्याच टपरीधारकाला मोठा फटाका बसतो. इतर टपरीधारक आपले सामान स्टेशन परिसरात लपवतात. कारवाईकरणारे निघून गेले की पुन्हा एकदा आपली दुकाने त्याच ठिकाणी थाटतात, असा आरोप आता होत आहे.
आरटीओ ट्राफिक पोलिस, मनपा अधिकारी सगळ्यांचे टपरीधारकांशी लागेबांधे असल्याचे वारंवार कारवाईचा फार्स केला जातो. स्टेशन परिसरात असलेल्या या टपऱ्यांचा वाहतूक व्यवस्थेला मोठा अडथळा आहे. स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी चे काम सुरू आहे. या कामालाही त्याचा अर्थ होतो. महिला, वृद्ध, प्रवासी, पाद चारी यांना देखील त्याचा फटका बसतो. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे वाहतूक शाखा आरटीओ पोलीस आणि महापालिका प्रशासन यांचे दुर्लक्ष आहे असा आरोप नागरिकांकडून केला जाते.
कसा दिसेल मुंबईतील पहिला डबल डेकर ब्रीज? परवागन्या मिळताच 1 वर्षात काम पूर्ण होणार
स्टेशन परिसर हा वर्दळीचा असल्याने या ठिकाणी स्मार्ट सिटी चे काम सुरू आहे. प्रकल्पाच्या कामाने स्टेशनचा परिसर व्यापला आहे. त्यात स्टेशन परिसरात रिक्षा चालक रिक्षा वाहन तळ स्वरूप अन्य ठिकाणी रिक्षा उभी करतात. त्यात थंड पेय विक्रेत्यांनी या ठिकाणी बेकायदेशीर स्टेशन परिसरात दुकाने थाटले असलेले वाहतूक कोंडीत भर पडते. या थंड पेय विक्रेत्यांच्या विरोधात महापालिकेने कारवाई करणे अपेक्षित आहे.
मात्र काही वेळेस रेल्वे प्रशासन पोलीस आरटीओ वाहतूक शाखा महापालिका यांच्याकडून एक दुसऱ्यांकडे बोट दाखवले जाते. त्यामुळे कारवाई कोणी करायची असा प्रश्न देखील अनेकदा उपस्थित होतो. स्टेशन परिसरातील स्मार्ट सिटी प्रकल्पाला गती देण्यासाठी आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका स्तरावर अनेकदा विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाते. या बैठकीत चर्चा करून आदेश दिले जातात. मात्र या आदेशांचे पालन प्रत्यक्षात होताना दिसत नाही. त्यामुळे स्टेशन परिसरातील परिस्थिती काही बदललेले नाही. त्याचा फटका सगळ्यांना सहन करावा लागत आहे.
नक्की वाचा: डोंबिवलीकरांची कॉलर टाईट! दोन पेंटहाऊस विकले तब्बल 16 कोटींना, चेक करा लोकेशन
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world