
New Elphinstone Bridge Mumbai: मुंबईतील ऐतिहासिक प्रभादेवी पूल जो आधी एल्फिन्स्टन ब्रीज नावाने ओळखला जायचा 12 सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल पाडून त्याच्याजागी मुंबईतील पहिला डबलडेकर ब्रीज बांधण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील परळ स्थानकावरून हा ब्रीज जात असून इथे उभारण्यात येणारा डबल डेकर ब्रीज हा रस्ते वाहतुकीसाठीचा पूल असणार असून या पुलाचा एक डेक हा स्थानिक वाहतुकीसाठी असणार आहेत तर दुसरा डेक वरळी आणि शिवडीदरम्यानची वाहतूक अधिक वेगवान व्हावी यासाठी उभारण्यात येणार आहे. हा ब्रीज बांधून झाल्यानंतर कसा दिसेल याची एक झलक पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा: डोंबिवलीकरांची कॉलर टाईट! दोन पेंटहाऊस विकले तब्बल 16 कोटींना, चेक करा लोकेशन
कसा दिसेल एल्फिन्स्टन डबल डेकर ब्रीज ?
महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे या पुलाची निर्मिती करण्यात येत असून या पुलाची काही प्रातिनिधीक चित्रे तयार करण्यात आली आहे.
1) हा डबल डेकर एल्फिन्स्टन ब्रीज, शिवडी-वरळी उन्नत कॉरिडोरचा (Sewri-Worli Elevated Corridor) एक महत्त्वाचा भाग आहे.

Photo Credit: MRIDC
2) या प्रकल्पामुळे मुंबईच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कमी होईल, वाहनांची ये-जा अधिक सोपी होईल असा दावा करण्यात आला आहे.

Photo Credit: MRIDC
3) एल्फिन्स्टन रोड/प्रभादेवी येथे उभारला जाणारा हा ब्रीज अभियंत्यांसाठी आव्हानात्मक असणार आहे, कारण हा ब्रीज मध्य तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरून जाणारा आहे.

Photo Credit: MRIDC
कशी आहे एल्फिन्स्टन डबल डेकर ब्रीजची रचना?
या पुलाची लांबी एकूण 132 मीटर असून या पुलावर वाहतुकीसाठी दोन वेगवेगळे मजले असतील. खालच्या डेकवर 2+2 अशा चार लेन असतील आणि पादचाऱ्यांसाठी फूटपाथची सोय असेल. हा डेक स्थानिक वाहतुकीसाठी वापरला जाईल. वरच्या डेकवरही 2+2 अशा चार लेन असतील, पण फूटपाथ नसेल. वरच्या मजल्यावरून वरळी-शिवजीदरम्यानची वाहतूक होईल आणि वरचा डेक हा खासकरून अटल सेतूला (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) जोडण्यासाठी असेल. हा पूल 'ओपन वेब गर्डर' या अत्यंत मजबूत आणि टिकाऊ डिझाइनमध्ये बांधला जाईल. या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 167.35 कोटी रुपये आहे. सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर, हा पूल अंदाजे 1 वर्षाच्या आत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. हा पूल उभारत असताना सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे ते म्हणजे जुना पूल तोडण्याचे. लोकल रेल्वेची वाहतूक न थांबवता, प्रवाशांना कोणताही त्रास सहन करावा लागेल अशी स्थिती निर्माण न होऊ देता हा पूल तोडावा लागणार आहे. यानंतर नवा पूल वेळेत उभारणे हे दुसरे आव्हान असणार आहे.
नक्की वाचा: 'दशावतार' हिट झाला का फ्लॉप? आकडे पाहून आश्चर्य वाटेल
एल्फिन्स्टन पुलाचा इतिहास काय आहे ?
एल्फिन्स्टन पूल 1913 मध्ये बांधला गेला होता. त्याकाळी लोकसंख्या कमी असल्याने हा ब्रीज फार मोठा वाटायचाय मात्र मुंबईची लोकसंख्या वाढत गेली आणि आता वेळ अशी आली आहे की हा ब्रीज वाहतुकीसाठी अपुरा पडू लागला आहे. याशिवाय हा पूल वाहतुकीसाठी किती सुरक्षित आहे असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. वाढती वाहतूक कोंडी, शिवडीला अटल सेतूशी जोडण्याचा संकल्प यामुळे हा पूल पाडण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world