
राहुल कांबळे, प्रतिनिधी
कोकणातील निसर्ग सौंदर्य जितके विलोभनीय, तितकेच येथे मान्सून काळात येणारे नैसर्गिक आणि परिचालनातील आव्हानेही गंभीर असतात. खडतर भूप्रदेश आणि मुसळधार पावसाचा सामना करण्यासाठी कोकण रेल्वेने या वर्षीही मान्सूनसाठी सर्वांगीण आणि व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. पायाभूत सुविधा बळकट करणे, प्रत्यक्ष पाळत ठेवणे, आपत्कालीन प्रतिसाद आणि प्रवासी सुरक्षेवर भर देत ही तयारी करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे कोकण रेल्वेची तयारी
- पायाभूत सुविधा आणि निचरा व्यवस्था
- मार्गावरील कॅचवॉटर ड्रेन्सचे साफसफाई आणि कटिंग्सची तपासणी पूर्ण
- भूस्खलन आणि दगड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी.
- गेल्या 10 वर्षांत मान्सून काळात मोठे अपघात टळले, यामागे भूप्रदेश सुरक्षा प्रकल्पांची मोठी भूमिका.
मान्सून पाळत आणि गस्त
- 636 प्रशिक्षित कर्मचारी संवेदनशील ठिकाणी दिवसरात्र गस्तीसाठी नियुक्त.
- चिपळूण, रत्नागिरी, कणकवली व वास्को येथे BRN-माउंटेड यंत्रे सज्ज.
- 9 ठिकाणी रेल्वे मेंटेनन्स व्हेईकल्स (RMVs) तैनात.
- मंगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमळी, कारवार व उडुपी येथे टॉवर वॅगन्स तैनात.
( नक्की वाचा : 'नदी वाचवायचं नाटक भारी...',मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यावरून ठाकरेंना शिवसेनेचा ठाकरेंवर निशाणा )
परिचालनात बदल आणि सुरक्षा उपाय
- दृष्यमानता कमी झाल्यास रेल्वेचा वेग 40 किमी/ता. पर्यंत मर्यादित.
- अपघातग्रस्तांसाठी रत्नागिरी आणि वास्को येथे मेडिकल व्हॅन्स सज्ज
- वास्कोमध्ये 15 मिनिटांत तयार होणारी अपघात सहायता रेल्वे (ART) उपलब्ध
- 100 मिमी पेक्षा अधिक पाण्याचे पातळी वाढल्यास सेवा तात्पुरत्या थांबवल्या जाणार
सुधारित संवाद साधने
- सुरक्षा कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन
- लोको पायलट आणि गार्डना वॉकी-टॉकी.
- सर्व स्टेशनवर २५ वॅट VHF संच बसवले आहेत.दर १ किमीवर इमर्जन्सी संवाद सॉकेट्सबसवले आहेत.सेटेलाईट फोनमुळे आपत्ती काळातही संपर्क सुलभ.
तंत्रज्ञान आधारित पाळत
- LED सिग्नल्सची उभारणी
- कोकण रेल्वे स्टेशनं च्या 9 ठिकाणी स्वयंचलित पावसाचे मापन यंत्र.
- महत्त्वाच्या तीन पुलांवर (काळी, सावित्री, वशिष्ठी) पूर इशारा प्रणाली कार्यरतकेली आहे.
- मोठ्या पूलांवर (पणवेल, मांडोवी, झुआरी, शरावती) अॅनेमोमीटरद्वारे वाऱ्याचा वेग वेळोवेळी तपासला जातो.
24 तास नियंत्रण व वैद्यकीय मदत
- बेलापूर, रत्नागिरी, मडगाव येथे 24x7 नियंत्रण कक्ष.
- चिपळूण, रत्नागिरी, वास्को, मडगाव, कारवार आणि उडुपी येथे वैद्यकीय पथक सज्ज.
मान्सून वेळापत्रक आणि प्रवासी माहिती
15 जून ते 20 ऑक्टोबर 2025 या कालावधीत विशेष मान्सून वेळापत्रक लागू.
सुरक्षिततेसाठी वेग मर्यादित.
दररोज हवामान खात्याशी समन्वय.
www.konkanrailway.com किंवा हेल्पलाइन क्रमांक १३९ वरून प्रवाशांना माहिती उपलब्ध.
कोकण रेल्वेने आपले “सेफ्टी फर्स्ट” धोरण कायम ठेवत, निसर्गाच्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी सर्व व्यवस्था सज्ज केली आहे. या व्यापक आणि एकात्मिक योजनांमुळे मान्सून काळातही कोकण मार्गावरील रेल्वेसेवा सुरक्षित, सुकर व विश्वासार्ह राहील, असा विश्वास कोकण रेल्वे एम.डी. संतोष कुमार झा यांनी व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world