जाहिरात

विश्वास पाटील यांच्याविरुद्ध भीमा कोरेगाव आयोगाकडून वॉरंट जारी, 'संभाजी' कादंबरीचा वाद काय?

छत्रपती संभाजी महाराजांच्या  जीवनावर आधारित त्यांच्या 'संभाजी' या कादंबरीतील वादग्रस्त माहितीसंदर्भात त्यांना आयोगासमोर बोलवण्यात आले आहे.

विश्वास पाटील यांच्याविरुद्ध भीमा कोरेगाव आयोगाकडून वॉरंट जारी, 'संभाजी' कादंबरीचा वाद काय?

Vishawas Patil News: सातारा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक आणि निवृत्त सनदी अधिकारी विश्वास पाटील हे नव्या वादात अडकले आहेत. भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने (Koregaon Bhima Commission of Inquiry) विश्वास पाटील (Vishwas Patil) यांच्याविरोधात वॉरंट (Warrant) जारी केले आहे. आयोगासमोर सुनावणीसाठी हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या  जीवनावर आधारित त्यांच्या 'संभाजी' या कादंबरीतील वादग्रस्त माहितीसंदर्भात त्यांना आयोगासमोर बोलवण्यात आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण? 

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक ग्रामपंचायतीचे प्रतिनिधित्व करणारे वकील मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आयोगाने विश्वास पाटील यांना यापूर्वी २६ सप्टेंबर रोजी समन्स (Summons) बजावले होते. परंतु, पुस्तकाच्या महोत्सवामुळे आपण बिहारमध्ये असल्याचे कारण देत पाटील तेव्हा गैरहजर राहिले.

त्यानंतर आयोगाने त्यांना २७ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले. मात्र, भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचे सचिव व्ही. व्ही. पालणीतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वास पाटील हे आजही वैद्यकीय कारणे (Medical Reasons) देत हजर राहिले नाहीत. त्यामुळे वकील देशमुख यांनी पाटील यांच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्याची मागणी केली, जी आयोगाने मान्य केली.

Solapur Political News: राष्ट्रवादीचे हे 3 आमदार शरद पवारांची साथ सोडणार? चर्चांना उधाण

आयोगाचा आदेश

“विश्वास पाटील यांच्या मुंबईच्या पत्त्यावर पोलीस प्राधिकरणाद्वारे जामीनपात्र वॉरंट (Bailable Warrant) जारी करण्यात आले असून, त्यांना २९ ऑक्टोबर रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,” असे सचिव पालणीतकर यांनी स्पष्ट केले. विशेष सरकारी वकील शिरीष हिरे यांनी आयोगाचा हा आदेश पोलिसांकडून कार्यवाहीसाठी (Executed by Police) पाठवण्यात येईल, असे सांगितले.

'संभाजी' कादंबरीतील मजकूर वादाचे मूळ

वढू बुद्रुक (Vadhu Budruk) हे ऐतिहासिक गाव भीमा कोरेगावपासून सुमारे ४ किमी अंतरावर आहे. हे गाव छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीसाठी ओळखले जाते. या गावात १७ व्या शतकातील गोविंद गोपाळ ढेगोजी मेघोजी यांच्या नावाने एक वादग्रस्त थडग्यासारखी रचना आहे, ज्याला दलित महार समाज गोविंद गोपाळ यांची समाधी मानतो. वढू बुद्रुक येथील मराठा समाजाच्या म्हणण्यानुसार,१६८९ मध्ये औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर त्यांच्या पूर्वजांनी, शिवाळे देशमुख (Shivale Deshmukhs) यांनी औरंगजेबाचा आदेश झुगारून संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार केले होते.

याउलट, दलित महार समाज दावा करतो की, गोविंद गोपाळ यांनी राजांवर अंत्यसंस्कार केले होते. २८ आणि २९ डिसेंबर २०१७ च्या मध्यरात्री वढू बुद्रुक येथे गोविंद गोपाळ यांच्या 'वादग्रस्त इतिहासाची' पाटी लावण्यात आली होती, ज्यामुळे वाद झाला. हा वाद १ जानेवारी २०१८ च्या भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या कारणांपैकी एक मानला जातो.

Konkan Railway: अवघ्या 100 रुपयांचा पोहोचा कोकणात!  26 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा

वढू बुद्रुक ग्रामपंचायतीचे वकील देशमुख म्हणाले, “विश्वास पाटील यांच्या 'संभाजी' पुस्तकानुसार, महार समाजातील गोविंद नावाच्या व्यक्तीने संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्कारात भाग घेतला होता. परंतु, हे सिद्ध करणारा कोणताही समकालीन ऐतिहासिक पुरावा (Contemporary Historical Record) उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या पुस्तकातील वादग्रस्त मजकुराबाबत त्यांची तपासणी करण्यासाठी त्यांना आयोगाने बोलावले आहे”.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com