
गेल्या 70 वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेलं धुळ्यातील पाटील घराण्याचे कुणाल पाटील उद्या 1 जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. कुणाल पाटील ( Kunal Rohidas Patil joins BJP) यांचे वडील रोहिदास पाटील गेल्या 70 वर्षांपासून काँग्रेससोबत होते. गेल्या वर्षी 2024 मध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी रोहिदास पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
रोहिदास पाटील यांना खान्देशच्या राजकारणातील भीष्म पितामह, अक्कलपाडा प्रकल्पाचे जनक म्हणूनही ओळखलं जात होतं. त्यांचे आणि राजीव गांधी यांचे घनिष्ठ संबंध होतं. खान्देशात त्यांनी पक्षाचं मोठं काम उभं केलं होतं. गेल्याच वर्षी त्यांचं निधन झालं. त्यानंतर या वर्षी त्यांचा पूत्रा कुणाल पाटील यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
नक्की वाचा - Chhatrapati Sambajinagar: ठाकरे गटाच्या नेत्याची शेतकऱ्याला घरी बोलावून मारहाण, VIDEO व्हायरल
विशेष म्हणजे कुणाल पाटील आणि राहुल गांधी यांचेही चांगले संबंध आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात हा काँग्रेसला मोठा धक्का आहे. माजी आमदार कुणाल रोहिदास पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी दोन वाजता भाजप कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. पाटील घराणे गेल्या 70 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. काँग्रेसशी एकनिष्ठ आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून कुणाल पाटील यांची ओळख आहे. त्यांनी पक्ष सोडण्याच्या निर्णयावरून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world