जाहिरात

Ladki Bahin Yojana eKYC Process : अवघ्या 5 मिनिटात e-KYC करा, Video मध्ये पाहा A टू Z प्रक्रिया सोप्या शब्दात

e-KYC दरम्यान पहिल्यांदा वडील किंवा पतीचा आधारकार्ड क्रमांक अनिवार्य करण्यात आलं आहे. ती माहिती न दिल्यास तुमची e-KYC पूर्ण होणार नाही.

Ladki Bahin Yojana eKYC Process : अवघ्या 5 मिनिटात e-KYC करा, Video मध्ये पाहा A टू Z प्रक्रिया सोप्या शब्दात

Ladki Bahin Yojana eKYC Process Video : राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत  e-KYC प्रक्रिया बंधनकारक करण्यात आल्यानंतर लाडक्या बहिणी e-KYC साठी प्रयत्न करीत आहेत. मात्र एकाच वेळी मोठ्या संख्येने e-KYC प्रक्रिया केली जात असल्याने साइटवर लोड होत आहे. त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

दुसरीकडे कित्येक महिलांना ही प्रक्रिया माहिती नसल्याने त्यांना e-KYC नेमकी कशी करावी हे कळत नाही. लाडक्या बहिणींसमोर संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया कशी करावी यासंदर्भातील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीत आहोत. हा व्हिडिओ पाहून तुम्ही e-KYC करू शकता. या e-KYC मध्ये वडील किंवा पतीचा आधारकार्ड क्रमांक नमूद करणं अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय तुमची e-KYC पूर्ण होऊ शकणार नाही. तुमचे वडील किंवा पतीच्या आधारकार्ड क्रमांकावरुन तुमच्या कुटुंबातील आर्थिक माहिती सरकारला कळू शकणार आहे. 

Ladki Bahin Yojana eKYC : पती की वडील, e-KYC वेळी कोणाचा आधारक्रमांक द्याल? अडचण येत असेल तर काय कराल?

नक्की वाचा - Ladki Bahin Yojana eKYC : पती की वडील, e-KYC वेळी कोणाचा आधारक्रमांक द्याल? अडचण येत असेल तर काय कराल?

वडील किंवा पतीचा कोणाचा आधार क्रमांक द्याल?

तुम्ही विवाहित असाल तर पतीचा आधार क्रमांक द्यावा. याशिवाय कुमारिका असाल तर वडिलांचा आधारक्रमांक द्यावा. पतीचं निधन झालं असेल किंवा घटस्फोट झाला असेल तर वडिलांचा आधार क्रमांक द्यावा. 

ERROR येत असेल तर काय कराल? 

राज्य सरकारकडून आताच केवायसीबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक संकेतस्थळावर जाऊन e-KYC करीत आहे. परिणामी साईटवरील लोड वाढला आहे. त्यामुळे एरर येत आहे. मात्र महिलांनी गोंधळून जाऊ नये. तर सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा e-KYC  करण्याचा प्रयत्न करा. केवायसी करण्यापूर्वी तुमचं नेटवर्क तपासून घ्या. 

ज्यांना e-KYC वेळी अडचण येत असेल ते  अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे मदतीसाठी जाऊ शकता. 

याबाबतच्या कोणत्याही अडचणीसाठी तुमच्या भागातील लोकप्रतिनिधींकडे जाऊन मदत मागू शकता. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com