जाहिरात
2 hours ago

राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता आहेत. विविध कारणांमुळे पक्षांचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाण्याच शक्यता आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांच्या प्रदेशाध्यपदी कुणाची वर्णी लागणार हे पाहावं लागणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं भाजपला लवकरच स्वतंत्र प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती आहे. पुढील वर्षी 12 जानेवारीला पक्षाचं अधिवेशन असून या अधिवेशनात पक्षाला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा आहे.

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनी विवाहबाह्य संबंधातून पती सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणात सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. 

Live Update : नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाणाच्या हद्दीत मोठी आग

नवी मुंबईतील देवी प्रसाद हॉटेलच्या पाठीमागे एपीएमसी पोलीस ठाणाच्या हद्दीत सेक्टर 19 मध्ये मोठी आग लागली असून फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

Live Update : हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याने कुटुंबावर केला अंदाधुंद गोळीबार, पोलीस शिपायाची पत्नी ठार

हिंगोली पोलीस कर्मचाऱ्यांचा कुटुंबातील सदस्यांवर गोळीबार 

संपूर्ण कुटुंबांवर केला गोळीबार, गोळीबारात पोलीस शिपायाची पत्नी ठार..

वसमत शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या विलास मुकाडे या पोलीस शिपायाने केला अंदाधुंद गोळीबार ..

Live Update : नाशिकचे पालकमंत्री कृषीमंत्री माणिकराव कोकाटे? शासकीय दौऱ्यात उल्लेख आल्याने चर्चांना उधाण

नाशिकचे पालकमंत्री कृषीमंत्री माणिकराव कोकाटे?

- केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या शासकीय दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कोकाटे यांचा कृषीमंत्री सोबतच पालकमंत्री म्हणून उल्लेख

- नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असतांना शासकीय दौऱ्यात पालकमंत्री उल्लेख

- पालकमंत्र्यांची यादी जाहीर होण्यापूर्वीच शासकीय दौऱ्यात उल्लेख आल्याने चर्चांना उधाण

Live Update : जळगाव भरधाव डंपरने 9 वर्षीय चिमुरड्याला चिरडलं, संतप्त जमावाने पेटवला डंपर

जळगाव शहरातील अजिंठा चौकात भरधाव डंपरने 9 वर्षीय चिमुरड्याला चिरडलं 

जळगाव शहरातील अजिंठा चौकात भरधाव डंपरणे दुचाकीला धडक देत 9 वर्षाच्या चिमुरड्याला चिरडलं असून या अपघातात चिमुरड्याची बहीण व मामा हे दोघे जण जखमी झाले आहेत. योजस धीरज बऱ्हाटे असे अपघातात मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. दरम्यान या अपघातानंतर संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला असून यामुळे अजिंठा चौक परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. आता त्याने जळगाव शहरासह परिसरात डंपरमुळे अनेक अपघात होत असून त्यामुळे संतप्त जमावाने डंपर पेटवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Live Update : मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालकाने 5 ते 6 दुचाकींना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार

मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालकाने 5 ते 6 दुचाकींना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यात तिघेजण जखमी झाले असून ट्रक चालकाला बेदम मारहाण करत पोलिसाच्या हवाली करण्यात आले. 

Live Update : सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पत्नीनेच दिली होती हत्येची सुपारी

सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पत्नीनेच दिली हत्येची सुपारी

पुणे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं 9 डिसेंबर रोजी अपहरण झालं होतं. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.

सतीश वाघ यांच्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती. एका 29 वर्षीय तरुणाला त्याच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती, अशी माहिती समोर येत आहे. 

Live Update : नागपाड्यात वॉटर टँक फुटल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, तीन जण जखमी

आश्रय योजनेच्या अंतर्गत वॉटर टँक बांधण्याचे काम चालू असताना पाण्याचं प्रेशर आल्याने वॉटर टँक  फुटला... सिध्दार्थ नगर,  कामाठीपुरा गल्ली नंबर एक, नागपाडा येथे ही घटना घडली. यामध्ये नऊ वर्षीय खुशी खातून हिचा मृत्यू झाला असून 32 वर्षीय गुलाम रसूल, 9 वर्षीय मिराज खातून, 33 वर्षीय नजराना बीबी यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Live Update : वफ्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट...

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील 103 तीन शेतकऱ्यांना आणि औसा तालुक्यातील बुधोडा येथील 25 शेतकऱ्यांना वफ्फ न्यायाधिकरणाकडून नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे तळेगाव आणि बुधोडा येथील शेतकरी भीतीच्या वातावरणात होते. आज वफ्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी आणि आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा तालुक्यातील बुधोडा येथील शेतकऱ्यांची भेट घेत चर्चा केलीय. तर तळेगाव येथील शेतकऱ्यांची सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार अभिमन्यू पवार आणि वफ्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी शेतकऱ्यांची भेट घेत त्यांना दिलासा देण्यात आला आहे.. 

Live Update : सलून आणि ब्युटीपार्लरच्या सध्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय

केस कापणे आणि दाढी करण्यासाठी ग्राहकांना आता जादा दाम मोजावे लागणार आहे. सलून आणि ब्युटीपार्लरच्या सध्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय व्यावसायिकांनी घेतला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना हा भुर्दंड पडेल. केस कापण्यासाठी, दाढीसाठीच नाही तर फेशिअलपासून केसांना रंग देण्यापर्यंत सर्वच सेवांच्या दरात मोठी वाढ होणार आहे. सध्याच्या दरात किमान 20 ते 30 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाडक्या बहिणीप्रमाणे आम्हाला पण एक हजार रुपये केस कापण्यासाठी आणि दाढीसाठी द्यावेत असा उपरोधिक टोला मुंबईकरांनी लगावला आहे. 

Live Update : माझं पोलीस संरक्षण काढा, माजी आमदार राजकुमार पटेल यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात अचानक सत्ता परिवर्तन झाल्यानंतर  तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेत सहभागी सर्व आमदारांना पोलीस संरक्षण दिले होते. यात मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनाही दोन पोलीस व्हॅनसह पोलीस सुरक्षा दिली होती. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजकुमार पटेल यांचा पराभव झाला, त्यामुळे माझा पराभव झाल्याने आपल्याला पोलीस संरक्षण नको असे पत्र  राजकुमार पटेल यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना लिहिल आहे. पराभव झाल्यानंतर सुद्धा राजकुमार पटेल यांना पोलीस सुरक्षा आहे. मात्र आता माजी आमदार पटेल यांनी स्वतःहून आपली सुरक्षा  काढून घ्यावे यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं..

Live Update : संसदेबाहेर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, तातडीने रुग्णालयात हलवलं; कारण अद्याप अस्पष्ट

संसदेबाहेर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. 

Live Update : ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त पर्यटक बाहेर, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी

ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि नवी वर्षानिमित्त सेलिब्रेशन करण्यास मोठ्या प्रमाणात पर्यटक बाहेर

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांच्या रांगा व वाहतूक कोंडी.

वर्षाअखेर व नाताळच्या सुट्ट्यामुळे मुंबईकर, नवी मुंबईकर, ठाणेकर मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळ पासून वाहनांची गर्दी पाहायला मिळतेय.

त्यामुळे रायगडसह कोकणात अनेक ठिकाणी पर्यटक पाहायला मिळत आहे. तसेच खंडाळा, लोणावळा, पुण्याकडे व पश्चिम महाराष्ट्रात, तळकोकणात, जाणाऱ्या पर्यटकामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पर्यटकांच्या वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. 

त्यामुळे मोठया प्रमाणात पुणे दिशेला जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे व मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर रायगड पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या अमृताजन पुलावरुन खोपोली व खंडाळा बाजूकडील डोंगर दऱ्या व वॅलीचे विहंगम दृश्य पाहायला सेल्फी काढायला पर्यटक थांबतात. त्यामुळे पर्यटकांची गर्दी अमृताजन पुलावर पाहायला मिळते.

Live Update : अमरावती-भातकुली मार्गावर संतप्त नागरिकांचा रेलरोको, उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्ता बंद केल्याने नागरिक आक्रमक

अमरावती-भातकुली मार्गावर संतप्त नागरिकांचा रेलरोको, उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्ता बंद केल्याने नागरिक आक्रमक

अमरावती-भातकुली मार्गावर असलेल्या नरखेड रेल्वे लाईन वर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे, त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आल्याने नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे, परिणामी परिसरातील नागरिकांनी आक्रमक होत भातकुली येथील रेल्वे फाटक जवळ एक रेल्वे रोखली. गेल्या तासाभरापासून ही रेल्वे रोखली आहे. त्यामुळे परिसरात चांगला तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत पर्यायी मार्गासाठी नागरिकांनी रेल्वे रोखत एल्गार केला.

Live Update : आमदार तानाजी सावंत यांच्या पुतण्याला धमकी दिल्या प्रकरणी भूममध्ये शिवसैनिक आक्रमक

माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत याचे पुतणे धनंजय सावंत व केशव सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. त्याच्या निषेधार्थ धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरांमध्ये रस्ता रोको करत जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी ही करण्यात आली. सावंत बंधुंना पोलीस संरक्षण द्या अशी मागणी करण्यात आली.

Live Update : सिक्युरिटी गार्ड खून प्रकरणी आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद घुगे यांना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

सिक्युरिटी गार्ड खून प्रकरणी आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद घुगे यांना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

 

लातूर शहरातील आयकॉन हॉस्पिटलमधील सिक्युरिटी गार्ड खून प्रकरणी आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद घुगे यांना पोलिसांनी सोमवारी उत्तराखंडमधील हरिद्वार येथील आश्रमातून अटक करण्यात आली असून आज लातूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.  सुनावणी दरम्यान आरोपीला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर दुसरा आरोपी अनिकेत मुंडे यांचा शोधासाठी दोन पथके मार्गावर असल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांनी दिली आहे. 

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कठोर कायदा करणार- कृषिमंत्री

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कठोर कायदा करणार - कृषिमंत्री

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची नाशिक मध्ये घोषणा

नव्या कायद्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करणार 

येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या अधिवेशनातच नवा कायदा आणण्याचा प्रयत्न

नाशिक मध्ये व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या शेतकरी आणि पोलीस प्रशासनाच्या बैठकीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा समाज आक्रमक

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा समाज आक्रमक 

एसआयटीच्या चौकशीच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन 

मुंबईच्या भारतमाता परिसरामध्ये आंदोलनाला सुरुवात

वाल्मिक कराडच्या विरोधातही घोषणाबाजी

सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांचे स्मारक केले जमीनदोस्त

सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांचे स्मारक जमीनदोस्त केले. कोमतपल्ली येथील माओवाद्यांचे सर्वात उंच स्मारक डीआयजी सीआरपीएफ देवेंद्र सिंह नेगी आणि एसपी जितेंद्र यादव यांच्या उपस्थितीत सैनिकांनी पाडले. तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी 2022 मध्ये सर्वात उंच स्मारक बांधले गेले होते. माओवाद्यांच्या मुख्य भागात सुरक्षा दलाच्या धमकीनंतर सुरक्षा दलांनी माओवाद्यांनी उभारलेले 68 फूट उंच स्मारक पाडले. वाटेवागू येथे छावणी उभारल्यानंतर, DRG, STF, Cobra 210, 205, BDS आणि CARIPU यांच्या संयुक्त पथकाने ते उद्ध्वस्त केले. स्मारक पाडण्यासाठी सैनिकांना स्फोटाचा वापर करावा लागला आहे.

मुंबई-पुणे जुन्या हायवेवर बोरघाटात वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे जुन्या हायवेवर बोरघाटात वाहतूक कोंडी

नाताळची सुट्टी, वर्षअखेरमुळे अनेक नागरिक मुंबई बाहेर व कोकणात जात असल्याने मुंबई-पुणे जुन्या मार्गावर बोरघाटात वाहतूक कोंडी

त्यातच बोरघाट चढून लोणावळ्याकडे जाताना काही अवघड चढण असल्याने अनेक छोटी मोठी वाहने बंद पडल्याने वाहतूक कोंडीत भर

वाहतूक पोलीस व महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्नात.

पुण्यात फेब्रुवारी अखेर होणार दुसरे विश्व मराठी संमेलन, तारखाही जाहीर

पुण्यात फेब्रुवारी अखेर होणार दुसरे विश्व मराठी संमेलन 

राज्य सरकारतर्फे दुसरे विश्व मराठी संमेलन 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च असे तीन दिवस पुण्यात आयोजित करण्यात येणार

मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांची घोषणा,  तर या संमेलनासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देशही दिले 

मुंबईत महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ

मुंबईत महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ, महिला व अल्पावयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांच्या संख्येत वाढ झालेली असून सरत्या वर्षात देखील मोठ्या प्रमाणात आकडेवारी पाहायला मिळालेली आहे.  11 महिन्यात मुंबईतील पोलीस स्थानकांमध्ये सरासरी दिवसाला 18 असे सरासरी 5837 गुन्हे दाखल झालेले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत 5410 गुन्हे नोंद करण्यात आलेले होते, त्यापेक्षा यावर्षी 581 तक्रारी मध्ये वाढ झाली आहे. तर सरत्या वर्षात सर्वाधिक जास्त विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली असून 1968 गुणांची नोंद करण्यात आलेली आहे. तर अल्पवयीन मुलांच्या अपर्णाचे 1071 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीत, मोदी-शाहांची घेणार भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीत, पदभार स्वीकारल्यावर शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जे. पी. नड्डा यांची भेट घेणार, सदिच्छा भेट असल्याची सूत्रांची माहिती

पुण्यात पुन्हा विचित्र अपघात, मद्यधुंद कारचालकाची 9 वाहनांना धडक

पुण्यात पुन्हा विचित्र अपघात, मद्यधुंद कार चालकाची 9 वाहनांना धडक,  पुण्यातील चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला अपघात,  एक तरुण गंभीर जखमी, दयानंद केदारी असं कारचालकाचं नाव, कारचालकाला पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात, गाडी चालवताना कारचालक मद्यधुंद अवस्थेत, सुदैवाने अपघातात कुठलीही जीवित हानी नाही

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरीजवळ भीषण

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरीजवळ भीषण अपघात झाला आहे. सुरतहून मुंबईला सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या कारला  रस्त्यात आडव्या झालेल्या काँक्रीट बॅरिगेटला धडकून अपघात आहे. सुदैवाने पाठीमागून कोणत्याही वाहन न आल्यामुळे आणि कारच्या एअरबॅग उघडल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु व्हाईट टोपिंगचे काम सुरू असताना महामार्गावरील ढिसाळ वाहतूक नियोजनामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) महामार्गावरील समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांचे मालेगाव बाजार समितीचे संचलकपद रद्द

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते व मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे यांचे संचालकपद रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सलग सात मासिक सर्वसाधारण सभांना गैरहजर राहिल्याने जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी हा निर्णय दिला.बाजार  समितीचे संचालक धर्मा शेवाळे  यांनी तक्रार केली होती.अद्वय हिरे नऊ महिने तुरुंगात होते.या कालावधीत झालेल्या सात मासिक सर्वसाधारण सभांना ते गैरहजर होते. अद्वय हिरे संचालक पद रद्द झाल्याने  हिरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

कल्याण अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या प्रकरण

कल्याण अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या प्रकरण, हत्येप्रकरणी दोन आरोपींचे नावे आली समोर, मुख्य आरोपी विशाल गवळी असे नराधमाचे नाव , विशाल विरोधात विनयभंगाचे पाच गुन्हे, विशाल गवळीच्या शोधात कोळशेवाडी पोलिसांची सहा पथके 

कल्याण अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या प्रकरण

कल्याण अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या प्रकरण, हत्येप्रकरणी दोन आरोपींचे नावे आली समोर, मुख्य आरोपी विशाल गवळी असे नराधमाचे नाव , विशाल विरोधात विनयभंगाचे पाच गुन्हे, विशाल गवळीच्या शोधात कोळशेवाडी पोलिसांची सहा पथके 

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com