जाहिरात

Latur News: हातात सिगारेट, बाजूला दारूचा ग्लास अन् शिक्षकाकडून पेपर तपासणीचा कार्यक्रम, Video Viral

याबाबत लातूरच्या शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे यांनी कठोर कारवाई करणार असल्याचं संकेत दिले आहे.

Latur News: हातात सिगारेट, बाजूला दारूचा ग्लास अन् शिक्षकाकडून पेपर तपासणीचा कार्यक्रम, Video Viral
  • लातूरमध्ये एका शिक्षकाने उत्तरपत्रिका तपासताना दारूच्या नशेत सिगरेट ओढत काम केले
  • लातूर शिक्षण क्षेत्रात दर्जेदार निकालांसाठी ओळखला जातो, पण अशा प्रकारामुळे खळबळ उडाली आहे
  • पालक आणि नागरिकांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत शिक्षकावर तात्काळ आणि कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
लातूर:

विष्णू बुरगे 

शिक्षणाचा पॅटर्न म्हणून देशभर ओळख असलेल्या लातूरमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षकाने परीक्षा पेपर तपासताना दारूच्या नशेत सिगरेट ओढत काम केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित शिक्षक धाब्यावर आपल्या मित्रांसोबत बसलेला दिसतोय. त्याच वेळी विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिका तपासत असल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळते. विशेष म्हणजे, एका हातात सिगरेट आणि बाजूलाच दारूचे ग्लास ठेवून पेपर तपासण्याचा हा प्रकार समोर आल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

लातूर हा जिल्हा शिक्षणातील दर्जेदार निकाल आणि अभ्यासाच्या शिस्तबद्ध पद्धतीसाठी ओळखला जातो. अशा ठिकाणीच शिक्षकांकडून अशा प्रकारचे वर्तन समोर येणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंध असलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासताना अशा प्रकारे निष्काळजीपणा आणि गैरजबाबदारी दाखवली जात असल्याने पालक आणि नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून संबंधित शिक्षकावर तात्काळ आणि कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

नक्की वाचा - MHADA: रहिवाशांची चांदी! 230 चौरस फुट नाही तर तब्बल 1600 स्क्वेअर फुटाचं घर मिळणार

या घटनेमुळे केवळ एका शिक्षकाच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उभे राहत नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची प्रतिमा डागाळली जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या शिक्षकांकडून अशा प्रकारचे वर्तन अपेक्षित नसल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. या प्रकारानंतर संबंधित शाळेकडून हा व्हिडिओ स्वतःच्या शिक्षकांनाच बनवल्याचं सांगत त्याला निलंबित करण्यात आल्याचं सांगितले आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

नक्की वाचा - Vinod Kambli: अरे बापरे! विनोद कांबळीला 'हे' काय झालं? सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज क्रिकेटर्सनं...

याबाबत लातूरच्या शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे यांनी कठोर कारवाई करणार असल्याचं संकेत दिले आहे. त्या म्हणाल्या या प्रकरणी संबंधीत शिक्षक दोषी आढळल्यास त्यावर कडक शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या घटनेमुळे लातूरच्या शिक्षण क्षेत्राची प्रतिमा धोक्यात आली असून, पुढील काळात अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान या शिक्षकाला कामावरून कमी केल्याची माहिती ही तृप्ती अंधारे यांनी दिली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com