जेवण करण्यासाठी संपुर्ण कुटुंब बसलं होतं. सर्वच जण जेवण करण्यात दंग होते. त्याच वेळी दारात बिबट्या उभा ठाकला होता. बिबट्याला बघून त्या संपुर्ण कुटुंबाची एकच धांदल उडाली. दारा समोर बिबट्या आल्याने क्षणात काय करावे आणि काय करू नये हेच कुटुंबाला समजले नाही. पण कुटुंबाने चपळाई दाखवत बिबट्यालाचा घरात कोंडत बाहेर धूम ठोकली. त्या आधी या बिबट्याने चार जणांवर हल्ला केला होता. त्यात ते जखमी झाले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील पालेबारसा या गावात ही घटना घडली आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात पालेबारसा हे गाव आहे. या गावात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्यात दुपारच्या वेळी एका कुटुंबातली सर्व जण जेवणासाठी बसले होते. त्याच वेळी दारात बिबट्या आला. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी हिंम्मत दाखवत बिबट्याला घरातच कोंडले. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. यावेळी बिबट्याने चार जणांना जखमी केले. नेताजी कावळे, त्यांचा मुलगा लेश कावळे, विजय ठाकरे व अन्य एक जण बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - हाताची मेंदी जाण्याआधीच कपाळाचं कुंकू गेलं, संभाजीगनर ऑनर किलींगने हादरलं
बिबट्याला घरात कोंडल्यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क केला. शिवाय पाथर्डी पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी गावात पोहोचे पर्यंत बिबट्या त्या घरातून बाहेर पडला. तो गावातल्या जवळच असलेल्या झुडपात लपला होता. वन विभागाने त्याच्यासाठी सापळा रचला आहे. त्याला पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे त्याला पकडण्यात अडचण निर्माण होत आहे. सध्या बिबट गावालगत असलेल्या एका झुडपात लपून बसला आहे. अशी माहिती वन विभागाने दिली आहे. शिवाय तो बाहेर येण्याची वाटही पाहीली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world