जाहिरात

Political News : रायगडचं पालकमंत्रिपद अदिती तटकरेंकडे? 'महाराष्ट्र दिन' ध्वजवंदन कार्यक्रमाची यादी जाहीर

Raigad News : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या नेतृत्वावरून वाद सुरुच आहे.

Political News : रायगडचं पालकमंत्रिपद अदिती तटकरेंकडे?  'महाराष्ट्र दिन' ध्वजवंदन कार्यक्रमाची यादी जाहीर

मेहबुब जमादार, रायगड

Political News : रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेला तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी रायगडमधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य कार्यक्रमात महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे करणार झेंडावंदन करणार आहेत. तर नाशिकमध्ये गिरीश महाजन झेंडावंदन करणार आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद अद्याप सुटला नाही. त्यावर कोणत्याही प्रकारची बैठक होऊन शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये चर्चा झालेली नाही. वाद संपुष्टात आला नसला तरी महाराष्ट्र शासनाच्चा 28 एप्रिल 2025 च्या परिपत्रकानुसार रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार झेंडावंदन होणार आहे.

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या नेतृत्वावरून वाद सुरुच आहे. याबाबा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत तरीही वाद मिटवण्यात कोणालाही यश आले नाही.

(नक्की वाचा  - Pahalgam Video: पहलगाम हल्ल्याचा सर्वात भयानक Video समोर, गोळ्या लागत होत्या, लोक कोसळत होते)

आता परिपत्रकानुसार मंत्री अदिती तटकर हे झेंडावंदन करणार असले तरीही अद्याप गोगावले किंवा तटकरे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र यामुळे पालकमंत्रीपदाची माळ अदिती तटकरेंच्या गळात पडणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 

मी रायगडचा मावळा- भरत गोगावले

रायगड जिल्ह्यातील ध्वजरोहन आदिती तटकरे यांंच्याकडे दिल्यानंतर भरत गोगावले यांनी म्हटलं की,  "त्यावर फार बोलायच नाही. झेंडावदन अधिकार दिला म्हणजे पालकमंत्री दिले असं नाही. मी रायगडचा मावळा आहे तलवार म्यान केलेली नाही."

(नक्की वाचा - Urine Therapy: परेश रावल यांनी सलग 15 दिवस प्यायली होती स्वत:चीच लघवी; शरीरावर काय परिणाम होतो?

महाराष्ट्र दिन झेंडावंदन संपूर्ण यादी

  • एकनाथ शिंदे- ठाणे
  • अजित  पवार- पुणे
  • चंद्रशेखर बावनकुळे- नागपूर
  • राधाकृष्ण विखे-पाटील- अहिल्यानगर
  • चंद्रकांत पाटील- सांगली
  • गिरीश महाजन- नाशिक
  • गणेश नाईक- पालघर
  • गुलाबराव पाटील- जळगाव
  • दादा भुसे- अमरावती
  • संजय राठोड- यवतमाळ
  • मंगलप्रभात लोढा - मुंबई शहर
  • उदय सामंत - रत्नागिरी
  • जयकुमार रावल - धुळे
  • पंकजा मुंडे - जालना
  • अतुल सावे - नांदेड
  • अशोक वुईके - चंद्रपूर
  • शंभूराज देसाई- सातारा
  • अॅड. आशिष शेलार - मुंबई उपनगर
  • दत्तात्रय भरणे- वाशिम
  • आदिती तटकरे- रायगड
  • शिवेंद्रसिंह भोसले - लातूर
  • अॅड. माणिकराव कोकाटे - नंदूरबार
  • जयकुमार गोरे - सोलापूर
  • नरहरी झिरवाळ - हिंगोली
  • संजय सावकारे - भंडारा
  • संजय शिरसाट- छत्रपती संभाजीनगर
  • प्रताप सरनाईक- धाराशिव
  • मकरंद जाधव (पाटील)- बुलढाणा
  • नितेश राणे - सिंधुदुर्ग
  • आकाश फुंडकर - अकोला
  • बाबसाहेब पाटील - गोंदिया
  • प्रकाश  आबिटकर- कोल्हापूर
  • आशिष जयस्वाल- गडचिरोली
  • पंकज भोयर- वर्धा
  • मेघना बोर्डीकर- परभणी
  • इंद्रनील नाईक- बीड

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: