आज नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi 2024) . दिवाळीचा पहिला (Diwali 2024) दिवस. आज अभ्यंगस्नान करून दिवसाला सुरुवात करण्याची प्रथा आहे. अंधारावर मात करणारा हा प्रकाश सण देशभरातून उत्साहात साजरा केला जात आहे. घरांसमोर रांगोळ्यांचा सडा पडला आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना घरांघरांमध्ये दिवाळीचा सण आनंदात साजरा केला जात आहे.
Live Update : कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये नावांमध्ये साम्य असलेले सहा उमेदवार
कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये नावांमध्ये साम्य असलेले सहा उमेदवार ..
१)राम शंकर शिंदे भाजप
२)राम प्रभु शिंदे अपक्ष
३)राम नारायण शिंदे अपक्ष
४) रोहित राजेंद्र पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष)
५) रोहित चंद्रकांत पवार (अपक्ष)
६) रोहित सुरेश पवार (अपक्ष)
Live Update : कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता
कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता
आमदार जयश्री जाधव शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती
काँग्रेसमधील नाराजीतून जाधव हा निर्णय घेता असल्याची प्राथमिक माहिती
चंद्रकांत जाधव जाधव यांच्या निधनानंतर जयश्री जाधव यांनी पोटनिवडणूकीत विजय मिळवलेला
धाराशिव जिल्ह्यात सर्वच प्रमुख उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मंजूर, बंडोबाला थंड करण्याचे मोठे आव्हान
धाराशिव जिल्ह्यात सर्वच प्रमुख उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मंजूर, बंडोबाला थंड करण्याचे मोठे आव्हान
धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वच प्रमुख उमेदवाराचे अर्ज मंजूर झाले असून त्यांचे बंडखोरी रोखण्याचे प्रमुख आव्हान असणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांतून १८५ उमेदवारांनी २७१ नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. १६४ उमेदवारांचे २२३ नामनिर्देशनपत्र वैध तर ४८ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहेत. येत्या 4 सप्टेंबर नंतर धाराशिव मतदार संघाचे चित्र स्पष्ट होईल.
Live Update : छाननीनंतर 20 नामांकन झाले रद्द, उमेदवारी मागे घेण्यासाठी पाच दिवसांचा अवधी
भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्जांची छाननी झाली. एकूण 93 जणांचे नामांकन प्राप्त झाले होते. छाननीनंतर आता २२ नामांकन रद्द झाले असून, रिंगणात 71 उमेदवार उरले रिंगणात आहेत. भंडारा विधानसभा मतदारसंघात41 जणांनी नामांकन भरले होते. छाननीमध्ये येथे 10 रद्द झाल्याने आता 31 उरले आहेत. तुमसरमध्ये 25 मधून दोन बाद झाल्याने 23 तर साकोलीत 27 मधून 10 बाद झाल्याने 17 उमेदवार रिंगणार उरले आहेत. 4 नोव्हेंबर नंतर खरेचित्र स्पष्ट होणार असून आता किती आणि कोणते उमेदवार माघार घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
Live Update : काँग्रेसच्या प्रचाराचे रणशिंग नागपुरातून, 6 नोव्हेंबरला राहुल गांधी नागपुरात
काँग्रेसच्या प्रचाराचे रणशिंग नागपुरातून, 6 नोव्हेंबरला राहुल गांधी नागपुरात
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी हे येत्या सहा नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून त्यादिवशी सकाळी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्याच दिवशी सायंकाळी मुंबईतील बीकेसीमध्ये एका कार्यक्रमात महाविकास ‘आघाडीची गॅरंटी’ जाहीर केली जाईल असे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे.
Live Update : सदा सरवणकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचणार...
थोड्याच वेळात सदा सरवणकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचणार...
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची कशी समजूत काढतात हे पाहणे महत्त्वाचे...
सदा सरवणकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आपला निर्णय बदलतात की निवडणूक लढवतात हे पाहणे महत्त्वाचे...