जाहिरात
3 minutes ago
मुंबई:

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election Result 2024) निकालानंतर आता मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, आणि सत्तास्थापन कधी होणार, कोणाला मंत्रिपद मिळणार याबाबतचे सवाल उपस्थित होत आहेत. महाविकास आघाडी आणि मनसेला या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. मनसेचा एकही उमेदवार या निवडणुकीत निवडून येऊ शकला नाही. त्यामुळे मनसेने आज बैठक बोलावली होती. त्याशिवाय महाविकास आघाडीकडूनही निवडणूक निकालाबाबत चिंतन बैठका घेतल्या जात आहेत. 

Live Update : ठाकरे गटाचे आमदार विधानभवनात यायला सुरुवात

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार विधानभवनात यायला सुरुवात झाली आहे

वांद्रे पूर्व विधानसभेचे आमदार वरून सरदेसाई विधानभवनात दाखल

Live Update : BMC निवडणुकीत महायुती सोबत जायला हवं, बैठकीत नेत्यांची राज ठाकरेंकडे मागणी

महापालिका निवडणुकीत आपण महायुती सोबत जायला हवं त्याचा फायदा होईल, बैठकीत नेत्यांची राज ठाकरेंकडे मागणी 

उघडपणे भाजप सोबत न गेल्यामुळे नुकसान झालं

Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार 

ओम बिर्ला यांच्या कुटुंबातील लग्नसोहळ्या निमित्त उपस्थितीत राहणार 

शिंदे आणि फडणवीस यांच्या इतर नेत्या समवेत काही बैठका होतात का याकडे लक्ष

Live Update : नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंगला सुरुवात

नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंगला सुरुवात

- संजय शिरसाठ, भारत गोगावले आणि अब्दुल सत्तार एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहचले.

- मंत्रिपद मिळवण्यासाठी इतर इच्छुक आमदारही एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता.

Live Update : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दाखल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दाखल

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीवर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती

Live Update : शिवसेना ठाकरे पक्षाच्या विधान सभेतील गटनेते पदी भास्कर जाधव यांची निवड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान सभेतील गट नेते पदी भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. प्रतोदपदी पुन्हा एकदा सुनिल प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या नेते पदावर आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.

Live Update : महाविकास आघाडीतील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात

महाविकास आघाडीतील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात. 

महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता 

काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात 

विरोधी पक्ष मजबूत नसल्याने विकास कामांना गती मिळावी यासाठी आमदार शिवसेनेच्या वाटेवर

Live Update : मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, तीनही पक्ष मिळून निर्णय घेणार- अजित पवार

मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, तीनही पक्ष मिळून निर्णय घेणार- अजित पवार

27 नोव्हेंबरपर्यंत सरकार अस्तित्वात आले नाही तर राष्ट्रपती राजवट लागेल या वृत्तात तथ्य नाही- अजित पवार

Live Update : महाराष्ट्रात आचारसंहिता शिथिल झाली, निवडणूक आयोगाने केली घोषणा

महाराष्ट्रात आचारसंहिता शिथील झाली, निवडणूक आयोगाने केली घोषणा

15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली होती

26 नोव्हेंबरला चौदाव्या विधानसभेची मुदत संपणार आहे

25 नोव्हेंबरला आचारसंहिता शिथिल झाल्याचे पत्रक काढण्यात आले

Live Update : 'एकच वादा अजित दादा' देवगिरी निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांच्या घोषणा

उपमुख्यमंत्रीअजित पवार कराड दौऱ्यावरून मुंबईतील त्यांच्या देवगिरी निवासस्थानी आले असताना  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवारांना  शुभेच्छा देत एकच वादा अजित दादा अशा घोषणा दिल्या..!

Live Update : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव, Sharad Pawar यांचा करिष्मा संपलाय का?

Live Update : उत्तर प्रदेशातील संभलमध्ये मशिदीच्या सर्वेदरम्यान रविवारी झालेल्या हिंसाचाराबद्दल ओवैसी काय म्हणाले?

Live Update : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळावं आणि किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळावं यासाठी पाचोरा येथे श्रीराम मंदिरात महाआरती

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळावं आणि किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळावं यासाठी पाचोरा येथे श्रीराम मंदिरात महाआरती

Live Update : महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आम्ही लढाई करायला सक्षम आहोत - रोहित पवार

महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आम्ही लढाई करायला सक्षम आहोत. न्यायालयाकडून आम्हाला कुठल्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. हा निकाल स्वीकारणं लोकांना आणि कार्यकर्त्यांना अवघड जातंय. नेते हा निकाल स्वीकारू शकतात. मात्र कार्यकर्ते हा निकाल स्वीकारू शकत नाहीत. एवढा मोठा मॅन्डेड महायुतीला मिळून सुद्धा महाराष्ट्रात कुठेही फार मोठा जल्लोष बघायला मिळत नाही. सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांना एकसारखी मत पडलेली आहेत. नक्कीच याच्यामुळे ईव्हीएममध्ये संशय व्यक्त होऊ शकतो.

ईव्हीएम आणि पोस्टल मतांमध्ये फरक दिसत आहे.  आमच्या वेगवेगळ्या प्रश्नांना आता इलेक्शन कमिशन उत्तर द्यावीत. हा विषय ज्या वेळेस कोर्टात जाईल, त्यावेळेस कोर्टाने ही वेळेवर निकाल द्यावा, अशी आम्हाला अपेक्षा आहे. एखादा निर्णय देताना कोर्ट उशीर करतो, आमचाही निर्णय तीन वर्षे उशीर झालेला आहे. अद्याप आम्हाला अजूनही न्याय मिळालेला नाही. भाजपच्या नेत्यांनाही हा निकाल अपेक्षित नव्हता. 160 च्या पुढे आपण कसे गेलो हा प्रश्नही त्यांना पडला आहे. 

-  रोहित पवार

Live Update : नागपुरात 13 ते 22 डिसेंबर दरम्यान या वर्षीचा खासदार सांस्कृतिक महोत्सव

नागपुरात 13 ते 22 डिसेंबर दरम्यान या वर्षीचा खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येणार असून अभिनेत्री काजोल याचं उद्घाटन करतील. 

Live Update : मुख्यमंत्रिपदाची माळ एकनाथ शिंदेच्याच गळ्यात पडेल असा विश्वास - नरेश म्हस्के

मुख्यमंत्रिपदाची माळ एकनाथ शिंदेच्याच गळ्यात पडेल असा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. 

नितीश कुमार यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. हरियाणाच्या निवडणुका नायब सैनी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. त्यानंतर सैनी यांना मुख्यमंत्री केलं गेलं. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असा विश्वास आहे. सर्व्हेक्षणातही एकनाथ शिंदेंचं नाव आघाडीवर आहे. 

Live Update : थोड्याच वेळात अजित पवार आणि सुनील तटकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

थोड्याच वेळात अजित पवार आणि सुनील तटकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला येणार असल्याची सूत्रांची माहिती

Live Update : सागर बंगल्यावर आज देखील फडणवीसांना भेटण्यासाठी विजयी झालेल्या आमदारांची गर्दी

सागर बंगल्यावर आज देखील फडणवीसांना भेटण्यासाठी विजयी झालेल्या आमदारांची गर्दी

Live Update : उद्याच्या बैठकीसाठी विदर्भातील अधिकांश सर्व आमदार मुंबईत

उद्या मुंबईत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत भाजप विधी मंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यात येईल. भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना उपस्थित राहण्यास संदेश गेले आहेत. संघटनेतील महत्वाचे पदाधिकारी देखील हजर राहतील.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com