10 minutes ago

विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होवू शकते. त्यानंतर आचारसंहीता लागू होईल. त्या आधी महायुती सरकारने उद्घाटनाचा धडाका लावला आहे. आजचही मुख्यमंत्री अनेक ठिकाणी विकास कामांची उद्घाटने करणार आहे. नवी मुंबई विमानतळावर आज वायू दलाचं पहिलं विमान उतरणार आहे. शिवाय महाराष्ट्र भवनाच्या भूमी पूजनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाह एकूण दहा ठिकाणी मुख्यमंत्री भूमीपूजन करणार आहेत. 
 

Oct 11, 2024 12:24 (IST)

दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका : ॲड. प्रकाश आंबेडकर

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी नागपूर, बुद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करणाऱ्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला केले आहे. 

Oct 11, 2024 11:56 (IST)

अजित पवारांची संध्याकाळी महत्वाची पत्रकार परिषद, मोठ्या घोषणेची शक्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार संध्याकाळी महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्या बरोबर प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे ही उपस्थित असणार आहेत. यावेळी ते मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Oct 11, 2024 10:05 (IST)

मुंबईतल्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट

गुरूवारी झालेल्या पावसामुळे शिवाजी पार्क मैदानात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. उद्या देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उद्या पाऊस झाल्यास आझाद मैदानातील शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा असेल किंवा ठाकरेंचा शिवाजी पार्कचा मेळावा असेल, या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे दसरा मेळाव्यावर सध्या पावसाचे सावट आहे. 

Oct 11, 2024 09:20 (IST)

पुण्यात पुन्हा हिट अ‍ॅण्ड रन, एकाचा मृत्यू

पुण्यात पुन्हा एकदा हिट अ‍ॅण्ड रन झाले आहे. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. कारचालक दारुच्या नशेत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर रात्री 1 वाजता हा अपघात घडला आहे. अपघात झाल्यावर चालक पळून गेला. या अपघातात रौफ अकबर शेख हा मृत्यूमुखी पडला आहे. 

Advertisement
Oct 11, 2024 08:48 (IST)

काल कॅबिनेट लवकर सोडून गेलो नाही - अजित पवार

अजित पवार काल झालेल्या कॅबिनेटमधून लवकर निघाले होते. त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कॅबिनेट नंतर नियोजित कार्यक्रम लातूर येथे होता. त्यासाठी नांदेड विमानतळ येथे जायचे होते, कॅबिनेट 11 वाजता होती. नियोजित वेळे पेक्षा ती उशिरा सुरू झाली. महत्वाच्या विषयांची चर्चा कॅबिनेट मध्ये झाल्यानंतर  शिंदे  आणि फडणवीसांना सागून निघाल्याचे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे. 

Oct 11, 2024 07:37 (IST)

पुण्यातील बाल न्याय मंडळातले 2 अधिकारी बडतर्फ

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर बाल न्याय मंडळ चर्चेत आलं होतं. याच न्याय मंडळातील दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. राज्य महिला आणि बाल विकास आयुक्त प्रशांत ननावरे यांनी ही माहिती दिली आहे. पदाचा गैर वापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्या दोन अधिकाऱ्यांची पोर्श कार अपघात प्रकरणात 300 शब्दांचा निबंध लिहिण्यावरून आणि 17 वर्षीय मुलाला जामीन मिळण्यावरून चौकशी करण्यात आली होती. 

Advertisement
Oct 11, 2024 07:34 (IST)

अमरावती जिल्ह्यात शरद पवारांना मोठा धक्का

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. जिल्हाध्यक्ष पदावरून प्रदीप राऊत यांना हटवल्याने पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. पाच महिन्यातच जिल्हाध्यक्ष पदावरून काढल्याने राऊत समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Oct 11, 2024 07:31 (IST)

नवी मुंबई विमानतळावर आज पहिलं विमान उतरणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे वायूदलाचे विमान आज उतरणार आहे. हे नवी मुंबई विमानतळावर उतरणारं पहिलं विमान असेल. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे उपस्थित असतील. शिवाय सिडको व नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळेही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. यात महाराष्ट्र भवनाच्या भूमिपूजनाचाही कार्यक्रमा पार पडणार आहे.