57 minutes ago
मुंबई:

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) आज पुण्यात बैठक घेणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते या बैठकीत उपस्थित राहतील. पुण्यातील (Pune Meeting) नवी पेठेत ही बैठक पार पडेल. मनसेचे इतर नेते देखील पुण्यातील बैठकीला उपस्थिती लावणार आहेत. मनसेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीत विधानसभा निवडणुकांच्या इच्छुकांवर देखील चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे हर्षवर्धन पाटील आज पवार गटात प्रवेश करणार आहे. या पक्षप्रवेशाला शरद पवार, जयंत पाटील उपस्थित राहणार आहे. आज महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात (Maharashtra Political Update) अनेक घडामोडी पाहायला मिळणार आहे. 

Oct 07, 2024 15:56 (IST)

शरद पवार गटाचं मुंबईतील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन

Oct 07, 2024 15:55 (IST)

धनगर आरक्षण संदर्भात सुधाकर शिंदे समिती रिपोर्ट शासनाकडे सादर

धनगर आरक्षण संदर्भात सुधाकर शिंदे समिती रिपोर्ट शासनाकडे सादर करण्यात आला आहे. एक हजार पानांनी अहवाल सादर करण्यात आला असून उद्या कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षण आदिवासी संदर्भात अहवाल सादर होणार का याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. ओबीसी मंत्रालय सचिव विनिता सेहगल यांच्याकडे हा अहवाल सादर करण्यात आला आहे.

Oct 07, 2024 14:39 (IST)

एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा यावर्षीही आझाद मैदानात

एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा यावर्षीही आझाद मैदानात होणार आहे. आतापर्यंत शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानावर तयारी केली जात होती. आज मात्र शिंदे गटाकडून आझाद मैदान निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. 

Oct 07, 2024 14:02 (IST)

जैन समाजाच्या प्रतिष्ठीत नागरीकांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

मलबार हिल विधानसभेतील जैन समाजाच्या प्रतिष्ठीत नागरीकांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे ह्यांनी भेरु चौधरी, राहुल रांका, सुरेश दोशी, सुरेश दालजी सेठ, अनिल भंवर, पंकज जैन, शैलेश बोहरा, पवन मेहता, दिनेश सालेचा, अशोक रायजॉनी आणि रमेश बाफना ह्यांचे पक्षात स्वागत केले.

Advertisement
Oct 07, 2024 11:54 (IST)

अब्दुल सत्तारांनी दिलेल्या साड्या पेटवल्या, दुसऱ्या दिवशी तोच प्रकार

छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये दुसऱ्या दिवशीही अब्दुल सत्तारांनी दिलेल्या साड्या पेटवून देण्यात आल्या. सिल्लोड तालुक्यातील मांडना गावात हा सर्व प्रकार समोर आला आहे. यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. कालच सिल्लोडच्या वांगी गावात दिलेल्या साड्यांची होळी करण्यात आली होती. त्यानंतर आज देखील असाच काही प्रकार समोर आला आहे.....

Oct 07, 2024 11:49 (IST)

अखेर हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश

अखेर हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश 

Advertisement
Oct 07, 2024 11:08 (IST)

नागपूर रेल्वे स्थानकावर मनोरुग्णाकडून हल्ला, एकाचा मृत्यू, चौघे जखमी

नागपूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर पहाटे एका मनोरुग्णाने काही जणांवर हल्ला केला.  लाकडी पाट्याने केलेल्या अनपेक्षित हल्ल्यात चार जण जखमी झाले असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. 

Oct 07, 2024 08:58 (IST)

अमरावतीच्या मोर्शीमधील भाजपा विधानसभाप्रमुख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वाटेवर

मोर्शी विधानसभेत अनिल बोंडेना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. डॉ.मनोहर आंडेंसह तीन नेते हाती तुतारी घेण्याच्या तयारीत आहेत. डॉ. मनोहर आंडे, चंदू यावलकर, राजेंद्र आंडे यांनी विधानसभेसाठी पुण्यात मुलाखती दिल्याची माहिती आहे. 

Advertisement
Oct 07, 2024 08:56 (IST)

कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद राहणार, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनसाठी राज्यव्यापी संप

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील बाजार समिती आज बंद राहणार आहे. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सुविधा लागू कराव्या, या मागणीसाठी एकदिवशिय लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सहाही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कर्मचारी या बंदमध्ये सहभागी होत असल्याने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या आज बंद राहणार आहेत.

Oct 07, 2024 08:10 (IST)

भांबेड जिल्हा परिषद गटातील 18 गावातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

लांजा तालुक्यात शिवसेना उबाठाला खिंडार पडलं असून पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीत भांबेड जिल्हा परिषद गटातील 18 गावातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उबाठाचे जिल्हा युवा अधिकारी विनय गांगण यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य, माझी पं. स.उपसभापती, काही गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तर भांबेड ग्रामपंचायतच्या सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आमदार राजन साळवी यांना हा धक्का मानला जातोय. आजच्या प्रवेश सभेची गर्दी बघून विरोधकांना शब्द सुचणार नाहीत, लांजा राजापूरवासियांची सेवा करण्याचा मी निर्धार केला म्हणून राजकारणात आलो असल्याचे किरण सामंत यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान प्रवेश करणाऱ्या सर्वांना आदराची वागणूक दिली जाईल असा शब्द यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिला.