जाहिरात
1 month ago
मुंबई:

महायुतीची जागावाटपार्भात आज बैठक (Vidhan Sabha Election) होणार आहे. महायुतीत अद्याप 30 ते 45 जागांचा तिढा कायम असून आजच्या बैठकीत तिढा असलेल्या सर्व जागांवर निर्णय होणार आहे. महायुतीच्या (Mahayuti Vs Mahavikas aghadi) उमेदवारांची एकत्रित यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस आज मुंबईत दाखल होणार आहेत. दिल्लीतील बैठकीत जवळपास शिक्कामोर्तब झाले असून हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या जागांबाबत मुंबईत एक बैठक घेऊन येत्या दोन दिवसांत तोडगा काढला जाणार आहे. तर

दुसरीकडे मविआ नेत्यांची जागावाटपासंदर्भात काल 19 ऑक्टोबरला बैठक झाली. या बैठकीत मविआच्या जागावाटपाचा तिढा सुटल्यात जमा असल्याचं बोललं जातंय. येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.दोन दिवसात महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करण्याची माहिती आहे.  मविआच्या रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत विदर्भातल्या जागांवरुन वाद आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला 62 पैकी 14 जागा हव्या आहेत. पण काँग्रेस इतक्या जागा सोडण्यास तयार नाही. दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत याच विषयी बैठक होणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय.  

महाविकास आघाडीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद रद्द

महाविकास आघाडीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद रद्द

सोमवारी होणार होती बैठक रद्द

माजी आमदार कपिल पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी आमदार कपिल पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

समाजवादी गणराज्य पक्षाचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची मान्यता

कपिल पाटील यांची माहिती

महाविकास आघाडीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद, जागावाटप जाहीर होणार

उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार

आमचे सगळे ठरले आहे,उद्या जागावाटप जाहीर होणार 

शरद पवार , संजय राऊत , अनिल देसाई , जयंत पाटील यांच्या बैठकीनंतर अनिल देसाई यांनी दिली माहीती

भाजपपाठोपाठ उद्या राज्यातील तिसऱ्या आघाडीची पहिली यादी जाहीर होणार?

भाजप पाठोपाठ उद्या राज्यातील तिसऱ्या आघाडीची पहिली यादी जाहीर होणार. परिवर्तन महाशक्ती उद्या आपले 75 उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. परिवर्तन महाशक्तीमध्ये बच्चू कडू यांची प्रहार संघटना, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजीराजे यांची स्वराज्य संघटना, शंकर धोंडगे यांची महाराष्ट्र राष्ट्र समिती आणि वामनराव चटप यांच्या स्वतंत्र भारत पक्षाचा समावेश.

Live Update : विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश

विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम संघटनेची धुरा सांभाळणारे विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश. बीड विधानसभेसाठी ज्योती मेटे इच्छुक असून शरद पवार यांनी त्यांना बीड मतदार संघासाठी आशा दाखवली आहे म्हणून हा प्रवेश त्यांनी केला आहे. 

Live Update : भाजपची पहिली यादी जाहीर...

भाजपची पहिली यादी जाहीर..

कोण कुठून निवडणूक लढवणार?

Live Update : मनोज जरांगे पाटील स्वतंत्र निवडणूक लढवणार!

मनोज जरांगे पाटील स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करा, रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांचा आदेश..

पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करा, रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांचा आदेश..

रस्ते अपघातात दुचाकी वाहनचालकांच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात हेल्मेटसक्ती असून त्याची अंमलबजावणी करावी. हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. 

ढोकारे साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांचा भाजपला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश....

स्वर्गीय माजी खासदार माणिकराव गावित यांचे सुपुत्र तथा डोकारे साखर कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावित यांच्या भाजपाला रामराम ठोकत अजित पवारांची राष्ट्रवादीत प्रवेश. भरत गावित यांनी 2019 विधानसभा निवडणुकीत नवापूर मतदारसंघातून भाजपाकडून केली होती उमेदवारी. राष्ट्रवादीकडून भरत गावित यांना उमेदवारी जवळपास निश्चित. अजित पवारांच्या हस्ते भरत गावित यांच्या पक्षप्रवेश.

गौरी लंकेश हत्येचा आरोप असलेले श्रीकांत पांगारकर यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश

Live Update : बीडमधील दोन मतदारसंघात मनसेचे उमेदवार निश्चित?

बीडमधील दोन मतदारसंघात मनसेचे उमेदवार निश्चित?

केज मधून रमेश गालफाडे तर गेवराईतून मयुरी खेडकर यांनी उमेदवारीसाठी घेतली राज ठाकरेंची भेट

राज्यात स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केल्यानंतर बीड जिल्ह्यातील दोन मतदारसंघात मनसेने आपले उमेदवार निश्चित केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर केज मतदार संघातील खा.बजरंग सोनवणे यांचे समर्थक तथा उद्योजक रमेश गालफाडे तसेच गेवराई मतदार संघातील मयुरी खेडकर यांनी मुंबई येथील शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेऊन निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या भेटीवेळी बीड मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस हे देखील उपस्थित होते. हे दोन्ही उमेदवार रिंगणात उतरल्यास केज व गेवराईतील सत्ताधारी व विरोधकांचे राजकीय समीकरण बिघडू शकते.आता राज ठाकरे यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

कोल्हापुरातील गडमुडशिंगी येथे विहिरीत मंदिर कोसळल्याची घटना

कोल्हापुरातील गडमुडशिंगी येथे विहिरीत मंदिर कोसळल्याची घटना 

एक व्यक्ती मंदिरात पूजेला गेला असल्याने ढिगाऱ्याखाली गेल्याची प्राथमिक माहिती असून घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमा झाली आहे. 

बीडच्या राजकारणात राजकीय भूकंप, भाजपचे 5 मोठे नेते शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत

बीडच्या राजकारणात राजकीय भूकंप, भाजपचे 5 मोठे नेते शरद पवार गटात जाण्याची शक्यता

- उमेदवारी मिळत नसल्याने भाजपमधील पाच मोठे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत

- मतदारसंघात संधी मिळत नसल्याने भाजपमधील नेते नाराज

- महायुतीमधील जागा वाटपापूर्वीच भाजपला बीडमध्ये धक्का बसण्याची शक्यता

- नाराज असलेल्या पाच पैकी अनेक नेते तुतारी हातात घेण्याची शक्यता

Live Update : मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात गारपीटीची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज

मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात गारपीटीची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज

ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देखील पाऊस पडणार असल्याचा पुणे हवामान खात्याचा अंदाज

23 ऑक्टोबरपर्यंतच्या सात दिवसांदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक 23 पर्यंत धुळे जळगाव, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Live Update : आता विश्व हिंदू परिषद सक्रिय

महाराष्ट्रात पुढच्या महिन्यात निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता विश्व हिंदू परिषद सक्रिय झाले असून, संतांच्या आणि धर्माचार्यांच्या माध्यमांतून समाजाला  एकत्रित होऊन मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे.  या योजनेद्वारे  महाराष्ट्र राज्यात सर्वत्र  संत सम्मेलन आयोजित करण्यात येत आहेत. 

अवकाळीमुळे सोयाबीन पिकाला फटका

हिंगोली जिल्ह्यात खरीपाच्या एकूण क्षेत्रापैकी निम्म्या क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. मात्र हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाला फटका बसल्याने सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे, त्यात आत्ता सोयाबीनचे दरही घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे, ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईने कळस गाठला आहे, तर सोयाबीनला तीन ते चार हजार रुपये भाव मिळत आहे, भाव कमी असले तरी कमी भावात सोयाबिन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. 

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com