जाहिरात
31 minutes ago
मुंबई:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप मुख्यमंत्रिपदावर कोण विराजमान होणार याची घोषणा करण्यात आलेली नाही. दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याच पक्षातील मुख्यमंत्री व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महायुतीतील घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू असताना आता मराठा क्रांती ठोक मोर्चानेही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असावे अशी भूमिका घेतली आहे. दुसरीकडे भाजपने 130 जागांवर मोठी आघाडी घेतल्याने भाजपचाच मुख्यमंत्री असावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.   

Devendra Fadnavis: महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत: देवेंद्र फडणवीस

'आम्ही सगळे एकत्रित आहोत शिंदे साहेब असतील अजित दादा असतील का मी येतो महायुतीत कुठलेही मतभेद नाही आम्ही निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं. सगळे निर्णय सोबत बसून होतील पक्षश्रेष्ठी आमच्या सोबत बसून निर्णय घेतील.  कोणाच्या मनात किंतु परंतु असेल तो एकनाथ शिंदे यांनी दूर केला आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. 

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंकडून एकनाथ शिंदेंचे कौतुक:

चंद्रशेखर बावनकुळेंकडून एकनाथ शिंदेंचे कौतुक:

 देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून, अजित पवारांची साथ घेऊन डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून पुढे नेण्याकरता काम केले. एकनाथ शिंदेंसारखा एक कणखर नेता महाराष्ट्राला लाभला. त्यांनी महायुतीचा एक चेहरा म्हणून मोठे काम उभे केले. एकनाथ शिंदे रडणारे नाही, लढणार नेते आहेत, असे म्हणत बावनकुळे यांनी त्यांचे कौतुक केले. 

Mira Bhayander Accident: दुर्दैवी! क्रेनने महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

भाईंदर पूर्वेला क्रेनने महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे.  भाईंदर पूर्वेच्या फॅमिली केअर हॉस्पिटल सिग्नल जवळ ही घटना घडली.  अपघातात वयोवृद्ध महिलेचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला असून क्रेन चालकाला नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  अपघातानंतर सिग्नलवर मोठी वाहतूक कोंडी

Wardha Fire News: वर्ध्यात भीषण अग्नितांडव

वर्ध्याच्या आर्वीमधून भीषण आगीची बातमी समोर आली आहे. आर्वीमधील विद्युत  च्या  132 के व्ही सब स्टेशनला भीषण आग लागली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सब स्टेशनमधील ट्रान्सफार्मरने पेट घेतल्याने ही भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. 

Nashik Crime: येवल्यात दीड कोटींच्या पैठणींची चोरी, परिसरात खळबळ

नाशिकच्या येवल्यातील रेल्वे स्टेशन समोरील  अक्कलकोट पैठणी शोरूमची खिडकी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील खोलून आता प्रवेश करत महागड्या दीड कोटी रुपयांच्या पैठण्या चोरून नेल्या.विशेष म्हणजे चोरट्यांनी  सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी चोरून नेला.या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली. घटनेची माहिती  पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होत. चोरीचा तपास सुरू केला आहे. 

Pune Crime: पुण्यात भरदिवसा हत्येचा थरार, तरुणाचा खून

पुण्यात कोयत्याने हल्ला करत एकाचा खून झाल्याची बातमी समोर आली आहे.  सिंहगड रोड परिसरात इसमाची हत्या करण्यात आली असून चार ते पाच जणांकडून भर दिवसा एकावर कोयत्याने वार करण्यात आलेत.  सतीश थोपटे असं हत्या झालेल्या इसमाचं नाव आहे. जुन्या वादातून हत्या झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. 

Mahayuti 100 Days Program: महायुतीचा 100 दिवसांचा कार्यक्रम ठरणार! शासन दरबारी जोरदार हालचाली

महायुती सरकार बहुमत मिळाल्यानंतर आता प्रशासन पातळींवj  जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.

महायुती सत्तेत आल्यानंतर सुरुवातीला 100 दिवसांचा कार्यक्रम काय असेल? याबाबतचा कृती आराखडा

तयार केला जाणार आहे. 

Live Update : एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्रिपदाची दावेदारी सोडण्याचे संकेत...

अडीच वर्षाच्या कारकिर्दीबद्दल मी समाधानी आहे. आम्ही घेतलेले निर्णय हे ऐतिहासिक निर्णय आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात सरकारने इतके निर्णय कधीही घेतले नव्हते.

आमच्या काळात 124 सिंचन प्रकल्पांना सुप्रमा मिळाली. राज्य एक नंबरला नेण्याचे आम्ही काम केले. 

देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना राज्य एक नंबरला होते, मविआच्या काळात तिसऱ्या नंबरला गेले. आम्ही ते पुन्हा एक नंबरला आणले.

केंद्राचे आम्हाला पूर्ण पाठबळ होतं. बंड केलं तेव्हा आम्हाला सांगितलं की, आम्ही चट्टान की तरह आपके पीछे खडे है. त्याबद्दल मोदीसाहेब आणि शाह साहेबांचे आभार मानतो.

इकोसिस्टीम तयार झाली, परिवारातील प्रत्येक सदस्याला काही ना काही देण्याचा आम्ही प्रयत्न केला.

लाडक्या नागरिकांसाठी मी काही ना काही केलं पाहीजे अशी माझी भावना होती. त्यातून गेल्यानंतर त्या वेदना कळतात. सोन्याचा चमचा तोंडात घेून जन्मलेल्या गरिबी कशी कळणार ?

CM Eknath Shinde Press: अडीच वर्षाच्या कार्यावर मी समाधानी: एकनाथ शिंदे

 जनतेने महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार. माझ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळावर मी समाधानी आहे. केंद्रातून मोदी- शहांचा मोठा पाठिंबा मला मिळाला.

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पाठबळ दिलं - एकनाथ शिंदे

अडीच वर्षे मला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. तेव्हापासून प्रत्येक्ष क्षणाचा उपयोग सामान्य जनतेसाठी केला. मोदींनी योजनेत मदत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पाठबळ दिलं.

आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतले. आतापर्यंतच्या सरकारमध्ये कोणी इतके निर्णय घेतले नव्हते. 

Live Update : कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सरकारच्या वतीने काही ना काही देण्याचा प्रयत्न केला - एकनाथ शिंदे

लाडके शेतकरी, ज्येष्ठ, रुग्ण, बहीणी यांच्यासाठी काहीतरी करायला हवं ही माझी भावना होती. श्रीमंत माणसाला गरीबी कशी करणार.. परंतू मी गरीब कुटुंब आल्यामुळे मला या वेदना समजत होत्या. महायुतीच्या माध्यमातून सर्व घटकांसाठी काम केलं. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सरकारच्या वतीने काही ना काही देण्याचा प्रयत्न केला...

- एकनाथ शिंदे

Live Update : मी विधानसभेत कॉमन मॅन म्हणून काम केलं - एकनाथ शिंदे

मी ८० ते ९० सभा घेतल्या. प्रवासही खूप केला. पायाला भिंगरी लावून सर्वसाधारण कार्यकर्त्याप्रमाणे काम केलं, मी स्वताला मुख्यमंत्री समजलो नाही मी कॉमन मॅन म्हणून काम केलं. हीच माझी धारणा होती. 

- एकनाथ शिंदे

Live Update : विधानसभेत मिळालेला विजय हा ऐतिहासिक आहे - एकनाथ शिंदे

विधानसभेत मिळालेला विजय हा ऐतिहासिक आहे - एकनाथ शिंदे

Live Updates: एकनाथ शिंदेनंतर भाजपची पत्रकार परिषद, बावनकुळे काय बोलणार?

एकनाथ शिंदेनंतर भाजपची पत्रकार परिषद, बावनकुळे काय बोलणार? 

Live Update : एकनाथ शिंदे भूमिका स्पष्ट करणार?

एकनाथ शिंदे भूमिका स्पष्ट करणार?

Live Update : थोड्याच वेळात एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद सुरू होणार...

थोड्याच वेळात एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद सुरू होणार...

Live Update : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद 

Live Update : डोंगरीतील रहिवासी इमारतीला आग...

डोंगरीतील रहिवासी इमारतीला आग...

Live Update : एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करा, अयोध्येतील नागरिकांची मागणी

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला महाविजय मिळाला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावे अशी मागणी अयोध्येतील नागरिकांनी केली. अयोध्या शहरात

”अयोध्या वासियोंकी है पुकार..”

”एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री बने फिर एक बार..”

असे होर्डिंग लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील जनतेसोबतच आता अयोध्येतील जनतेचाही वाढता पाठिंबा दिसून येत आहे.

Live Update : आगामी निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजेत, पराभूत उमेदवारांची मागणी

आगामी निवडणुका महाविकास आघाडीत न लढता स्वतंत्र स्वबळावर लढल्या पाहिजेत, अशा प्रकारचा ठाकरे गटाच्या काही पराभूत उमेदवारांचा सूर आहे. उद्धव ठाकरे यांनी काल बोलवलेल्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत ईव्हीएम गोंधळाच्या मुद्द्यासोबत  काही पराभूत उमेदवारांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडला.

महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवून फारसा फायदा विधानसभा निवडणुकीत झाला नसल्याचे काही पराभूत उमेदवारांचं म्हणणं उद्धव ठाकरे यांच्या समोर त्यांनी मांडलं.  मात्र यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही. पक्षप्रमुख आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. 

Live Update : निफाडचा पारा 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली...

राज्यात थंडीचा जोर वाढू लागला असून, द्राक्षाची पंढरी असलेल्या नाशिकच्या  निफाडमध्ये 8 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली गेल्याने द्राक्षमणी तडकण्याची भीती निर्माण झाली आहे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना थंडीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे  द्राक्षमणी तडकू नये म्हणून महागड्या औषधांची फवारणी करण्याची वेळ निफाड तालुक्यातील वाकद शिरवाडे येथील शेतकऱ्यांवर आली आहे

Live Update : ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला मोठा प्रश्न

Live Update : मुंबईत थांबू नका, आपआपल्या मतदारसंघात जा, मतदारांना भेटा त्यांचे आभार माना; एकनाथ शिंदेचा आमदारांना आदेश

सत्ता स्थापन लांबल्यानंतर सर्व आमदारांना मुंबईतून परत पाठवण्यात आले. 

पक्षाकडून जेव्हा निरोप येईल तेव्हा मात्र तातडीने मुंबईत हजर राहा. 

निकालानंतर सर्व आमदारांना मुंबईत बोलवलं होतं, सर्व आमदारांना वांद्र्यातल्या ताज लॅड्स एन्ड मध्ये ठेवण्यात आलं होतं 

दोन दिवसापासून एकनाथ शिंदेंनी नाकारल्या सर्व गाठीभेटी

Live Update : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यातच , मुख्यमंत्रिपदावरून शिंदे नाराज असल्याची चर्चा

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यातच , मुख्यमंत्रिपदावरून शिंदे नाराज असल्याची चर्चा 

पुन्हा मुख्यमंत्री पद शिंदे यांनांच द्यावे अशी शिवसेना आमदार आणि खासदारांची मागणी 

Live Update : लोकसभेनंतर विधानसभेतही जोगेश्वरीमध्ये फेर मोजणीची मागणी

जोगेश्वरी पूर्व येथील विधानसभा निवडणुकीच्या फेर मतमोजणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या पराभूत उमेदवार निवडून मनीषा वायकर कोर्टात याचिका दाखल करणार...

Live Update : सांगलीची हवा सर्वात शुद्ध!

सांगली सर्वात आरोग्यदायी शहर ठरलं आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथील हवा सर्वात चांगली समजली जात आहे. सांगली कोल्हापूरातील हवेची गुणवत्ती चांगली असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निरीक्षण आहे. या जिल्ह्यांचा समावेश आरोग्यदायी शहरांमध्ये होतो. 

Live Update : उंच उडी प्रकारात महिला कॉन्स्टेबल शीतल पिंजरे यांना कांस्य पदक

73 व्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये रत्नागिरी पोलीस दलातील महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती शीतल पिंजरे यांनी उंच उडी प्रकारात कांस्य पदक प्राप्त केलं आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी अभिनंदन केलं आहे. तसेच 10 हजार रुपयांचं बक्षीस देखील जाहीर केलं आहे. ही स्पर्धा नवी दिल्ली येथे पार पडली.या स्पर्धे मध्ये संपूर्ण भारतातून एकूण 40 विविध पोलीस दलातील संघांनी भाग घेतला होता. या मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचा देखील सहभाग होता. शीतल पिंजरे यांनी उंच उडी या स्पर्धे प्रकारामध्ये 1.63 मीटर उंच उडी मारून आपलं नाव कांस्यपदकावर कोरून महाराष्ट्र पोलीस दलाची तसेच रत्नागिरी पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.

Live Update : भाजपा कार्यकारिणीतर्फे सदस्य नोंदणी अभियान प्रारंभ

रत्नागिरी जिल्हा भाजपा कार्यकारिणीतर्फे सदस्य नोंदणी अभियान स्वयंवर मंगल कार्यालयात पार पडलं. राज्यात दीड कोटी पक्ष सदस्यांची नोंदणी करण्याचं उद्दीष्ठ ठेवण्यात आलं असून, प्रत्येक विधानसभा मतदार संघात 50 हजार सदस्य नोंदणी करायची असून, त्यासाठी प्रत्येक सदस्याचे योगदान अपेक्षित आहे असं आवाहन भाजपाचे नेते रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केलं. प्रत्येक कार्यकर्त्यांने आपल्या कामाने आपली रेषा मोठी करा, त्यासाठी दुसर्‍याची पुसू नका असा सल्लाही त्यांनी दिला.

Live Update : तुळजाभवानी मंदिरातील 56 कोटींच्या विकासकामांचा लवकरच प्रारंभ

तुळजापूर तुळजाभवानी मंदिरातील 56 कोटी रुपयांच्या विकासकामांना लवकरच प्रारंभ होणार आहे. यासाठी मंदिरातील पिंपळाचा पार तसेच गोंधळी कट्ट्याच्या दगडांना नंबरिंग करण्यात आले आहे. तसेच होमकुंडासमोरील पायऱ्या काढून रस्त्याचे काम प्रारंभ करण्यात येणार आहे. कंत्राटदाराचे साहित्य येऊन पडले आहे. तुळजाभवानी मंदिरातील पिंपळाचा पार व गोंधळी कट्टा या ठिकाणी दगडावर नंबर टाकण्यात आले आहेत. या ठिकाणचे दगड काढून डॅमेज दगड बदलण्यात येणार आहेत. पार पुन्हा आहे तसाच बांधण्यात येणार आहे. अशी माहिती तुळजापूर देवस्थान समिती तहसीलदार तथा व्यवस्थापक माया अशोक माने यांनी दिली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com