जाहिरात
23 days ago
मुंबई:

आज उमेदवारी अर्ज (Nomination Form) दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून सर्वच मतदारसंघांमध्ये (Assembly Election 2024) मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. अद्यापही मविआ आणि महायुतीच्या सर्वच उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणाला घोषित केल्या जाणाऱ्या उमेदवारांना आज अर्ज भरावा लागणार आहे. त्याशिवाय महायुती आणि महाविकास आघाडीतील काही दिग्गज नेतेही आज आपला अर्ज सादर करतील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 किंवा 9 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 किंवा 9 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात  जाहीर सभा 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा पुणे दौरा 

पुण्यातील महायुतीच्या सर्व  8 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार एकत्रित सभा 

भाजपकडून शहरात अनेक केंद्रीय नेत्यांच्या सभेचं आयोजन

मराठवाड्यात लोकसभेप्रमाणे पुन्हा मराठा-ओबीसी संघर्ष? ओबीसी बहुजन आघाडीचे मराठवाड्यात 10 उमेदवार

ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडीने मराठवाड्यात उतरवले 10 उमेदवार.

नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर , बीड, लातूर  जिल्ह्यात ओबीसी बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात.

मनोज जरांगेंच्या उमेदवार यादी येण्यापूर्वी प्रकाश अण्णा शेंडगेंनी ओबीसी बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरवले.

ओबीसी बहुजन आघाडीकडून राज्यभरात एकूण 20 उमेदवार जाहीर. 

20 उमेदवारांपैकी 10 उमेदवार एकट्या मराठवाड्यात.

मराठवाड्यात लोकसभेप्रमाणे पुन्हा मराठा-ओबीसी संघर्ष?

शिंदेसेनेचे मनोज मोरे बंडखोरी करीत प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी

शिंदेसेनेचे मनोज मोरे बंडखोरी करीत प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी

धुळे शहर विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट समोर आला असून एकीकडे शहर विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीने भाजपला दिल्याने शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख असलेले मनोज मोरे हे नाराज झाले होते. मनोज मोरे हे बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी करतील असा अंदाज बांधला जात असताना आज त्यांनी थेट बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजपाचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपाचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी भाजपला सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे. सुधाकर शृंगारे हे 2019 मध्ये भाजपकडून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये विकासाची कामे केली. मात्र 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे शिवाजी काळगे यांनी त्यांचा दारुण पराभव केला होता. भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी काम केलं नसल्याची नाराजी त्यांच्यामध्ये होती त्यातूनच त्यांनी आज थेट भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय. त्यांच्या या जाहीर प्रवेशाने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलय. 

Live Update : माढा, करमाळा , सांगोला , पंढरपूर आणि मोहोळ मतदारसंघात मविआमध्ये बंडखोरी

माढा, करमाळा , पंढरपूर , सांगोला आणि मोहोळ अशा पाच मतदार संघात बंडखोरी पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने या पाचही मतदार संघात महाविकास आघाडीत बंडखोरी पाहायला मिळत आहे. 

Live Update : बडनेरा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत

बडनेरा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी करण्यात आली आहे..

भाजपचे तुषार भारतीय यांनी बंडखोरी करीत आज नामांकन दाखल केले..

जोरदार शक्तिप्रदर्शन करीत केला नामांकन दाखल..

त्यामुळे बडनेरा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे..

राणा विरुद्ध सर्व उमेदवार असा सामना बडनेरा विधानसभा रंगणार.

Live Update : अखेर ठरलं, जगदीश मुळीक वडगाव शेरीतून लढणार

अखेर ठरलं, जगदीश मुळीक वडगाव शेरीतून लढणार 

जगदीश मुळीक यांनी वडगाव शेरीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला 

पुण्यातील वडगाव शेरीत मैत्रीपूर्ण लढत 

वडगाव शेरीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांना मिळाली होती उमेदवारी

मात्र जगदीश मुळीक वडगाव शेरीतून निवडणुक लढवण्यास होते आग्ग्रही

Live Update : नवाब मलिक हे अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार

नवाब मलिक हे अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून लढण्याची शक्यता

नवाब मलिकांचं मोठं शक्तिप्रदर्शन

तासगाव विधानसभा निवडणुकीसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ जन आशीर्वाद सभा

भाजपच्या तृप्ती सावंत यांना मनसेकडून वांद्रे पूर्वेतून उमेदवारी

भाजपच्या तृप्ती सावंत यांना मनसेकडून वांद्रे पूर्वेतून उमेदवारी

लाडक्या लेकींनी दिल्या आईला शुभेच्छा, नमिता मुंदडांनी शेअर केला व्हिडिओ...

Live Update : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे भाजपचे नाराज नेते श्रीनाथ भिमाले यांच्या भेटीला

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे भाजपचे नाराज नेते श्रीनाथ भिमाले यांच्या भेटीला

भिमाले पर्वती मतदार संघातून लढण्यासाठी होते इच्छूक

पर्वतीमधून भाजपकडून पुन्हा माधुरी मिसाळ यांना उमेदवारी

मिसाळ यांना उमेदवारी दिल्याने श्रीनाथ भिमाले नाराज 

समजूत काढण्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ त्यांच्या भेटीला

Live Update : चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल

चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. येथून दोघेही कामठीकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना होणार आहेत.

जामनेर मतदारसंघातून भाजपचे नेते गिरीश महाजन आज सातव्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार

जामनेर मतदारसंघातून भाजपचे नेते गिरीश महाजन आज सातव्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी गिरीश महाजन यांचं औक्षण केलं आहे.

शिरुर हवेली मतदारसंघातून आज महायुतीचे उमेदवार माऊली कटके आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार

शिरुर हवेली मतदारसंघातून आज महायुतीचे उमेदवार माऊली कटके आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर शिरुर शहरात शक्तिप्रदर्शन करत सभा सुद्धा होणार आहे. आज सकाळी पत्नी व कुटुंबातील महिलांनी माऊली कटके यांना औक्षण केले. त्यानंतर कटके यांनी मतदारसंघातील विविध मंदिरात देवदर्शन केलं. पारंपरिक वाद्यांच्या तालावर त्यांचं स्वागत सुद्धा होत आहे.

Live Update : आज युगेंद्र पवारांच्या प्रचाराचा शुभारंभ, शरद पवारांच्या उपस्थित कन्हेरीत जाहीर सभा

काल बारामतीच्या कन्हेरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर आज युगेंद्र पवारांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. शरद पवारांच्या उपस्थित आज कन्हेरीत जाहीर सभा पार पडणार आहे

Live Update : महत्त्वाचे नेते आज उमेदवारी अर्ज करणार दाखल...

चंद्रशेखर बावनकुळे- भाजप- कामठी

नाना पटोले- काँग्रेस- साकोली

बाळासाहेब थोरात- काँग्रेस- संगमनेर

राधाकृष्ण विखे पाटील- भाजप- शिर्डी

रवींद्र चव्हाण- भाजप-डोंबिवली

सदा सरवणकर-अपक्ष- माहीम

अमित देशमुख- काँग्रेस-लातूर शहर

नवाब मलिक-अपक्ष-मानखुर्द

Live Update : नाशिक पूर्व मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गणेश गीते उमेदवारी अर्ज भरणार

नाशिक पूर्व मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गणेश गीते उमेदवारी अर्ज भरणार. यावेळी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. दोनच दिवसांपूर्वी गणेश गीते यांनी भाजपामधून शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली. तर दुसरीकडे नाशिक पश्चिम मतदार संघातून सुधाकर बडगुजर देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नाशिक शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतील. गेल्या काही दिवसांपासून नाशिक पश्चिम मतदारसंघ बंडखोरीमुळे चर्चेत आहे.

Live Update : नाना पटोले आज साकोली येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आज साकोली येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. मोठी शक्तिप्रदर्शन करत नाना पटोले आपल्या समर्थकांसह कार्यकर्तासह रॅलीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार आहेत.

माजी आमदार सुधाकर भालेराव आज उदगीर विधानसभेतून उमेदवारी अर्ज दाखल करणार

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार सुधाकर भालेराव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत...आज दुपारी 1.00 वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते तहसील कार्यालय भव्य रॅली काढत मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे.. तर नगरपरिषद मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि रोहित पवार संबोधित करणार आहेत... उदगीर विधानसभेसाठी यावेळी शरदचंद्र पवार पक्षाने चोरतात तयारी करत सुधाकर भालेराव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले..उदगीर विधानसभेत यावेळी तिरंगी लढत होणार आहे...

Live Update : भाजपकडून गिरीश महाजन सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात, आज उमेदवारी अर्ज भरणार

जामनेर मतदारसंघात भाजप नेते गिरीश महाजन आज करणार उमेदवारी अर्ज दाखल 

जामनेर शहरात भव्य रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्श करत गिरीश महाजन भरणार उमेदवारी अर्ज 

भाजपकडून गिरीश महाजन सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात 

गिरीश महाजन यांच्या उमेदवारी अर्ज भरताना महायुतीचे नेते ही राहणार उपस्थित

भाजपला मोठा धक्का..ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी अकोला पश्चिममधून अपक्ष अर्ज दाखल करणार

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी अकोला पश्चिममधून अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळाल्याने आलिमचंदानी नाराज आहेत.. मात्र काल विजय अग्रवाल यांच्या उमेदवारी रॅलीमध्ये सहभागी होऊन आज अपक्ष अर्ज भरणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का असणार आहे. भाजपचे प्रदेश सदस्य डॉक्टर अशोक ओळंबे यांनी प्रहार मध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर आता भाजपमध्ये अकोला पश्चिम मधून हा दुसरा बंड भाजपकडून होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com