जाहिरात
1 month ago
मुंबई:

राज्यात विधानसभा निवडणुकीचं (Vidhan Sabha Election) रणशिंग फुंकलं आहे. आज 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 30 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येईल. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत आहे. अद्याप सर्व पक्षांच्या उमेदवारांची यादी समोर आलेली नाही. आतापर्यंत केवळ भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान पुण्यात एका गाडीत 5 कोटींची कॅश सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. संजय राऊतांनी यामागे शिंदे सरकारच्या एका नेत्याला टीका केला आहे.  

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरे 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरे 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार. तर मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे 28 ऑक्टोबरला वरळीमधून अर्ज दाखल करणार. 24 ऑक्टोबरला वरळीमधील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार.

उद्या शिवसेनेच्या आमदारांना एबी फॉर्म देण्याची शक्यता

उद्या शिवसेनेच्या आमदारांना एबी फॉर्म देण्याची शक्यता

अनेक आमदारांना उद्या मुंबईत येण्याचे निरोप देण्यात आले आहे

शिवसेनेकडून अद्याप यादी जाहीर करण्यात आलेली नाही..

त्यामुळे शवसेना यादी जाहीर करणार की थेट एबी फॉर्म देणार हे गुलदस्त्यात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार

देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार

भाजपच्या दुसऱ्या यादीवर ही आज अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

देवळाली मतदारसंघातून विद्यमान आमदार सरोज आहेर यांना दुसऱ्यांदा राष्ट्रवादीकडून उमेदवारी

नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून विद्यमान आमदार सरोज आहेर यांना दुसऱ्यांदा पक्षाकडून उमेदवारी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आले  एबी फॉर्म. अजित पवार यांनी दिले सरोज आहेर यांना एबी फॉर्म. सरोज अहिरे यांच्यावर पक्षाने दाखवला दुसऱ्यांदा विश्वास.

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप विरुद्ध शिवसेना? संजय केळकरांना मीनाक्षी शिंदे देणार आव्हान

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप विरुद्ध शिवसेना? संजय केळकरांना मीनाक्षी शिंदे देणार आव्हान

ठाणे विधानसभेसाठी मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याधिकारी कार्यलयातून फॉर्म घेतला आहे.  मीनाक्षी शिंदे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्गीय आहेत. शिवसेनेत त्यांना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख हे पद असून त्या ठाण्याच्या माझी महापौरही आहेत.  भाजप संजय केळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णयावर मीनाक्षी शिंदे ठाम आहेत. 

शेकापकडून रायगड जिल्ह्यातील 4 उमेदवार जाहीर

शेकापने रायगड जिल्ह्यातील 4 उमेदवार जाहीर केले आहेत. सांगोल्यातील कार्यकर्त्यांशी उद्या चर्चा करुन सांगोल्यातील उमेदवार ठरणार आहे.. सांगोल्यातून बाबासाहेब देशमुख इच्छुक आहेत.


रायगडमधील ठरलेले उमेदवार 

अलिबाग-चित्रलेखा पाटील

पेण-अतुल म्हात्रे

उरण-प्रितम म्हात्रे

पनवेल-बाळाराम पाटील

सचिन वाझेला हायकोर्टाचा मोठा दिलासा

सचिन वाझेला हायकोर्टाचा मोठा दिलासा

अनिल देशमुखांशी संबंधित दरमहा 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात जामीन मंजूर

जामिनाच्या अटीशर्ती मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाला निश्चित करण्याचे निर्देश

अनिल देशमुखांसह याप्रकरणातील इतर आरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर झाल्याचा दावा करत सचिन वाझेनं केली होती जामिनासाठी याचिका

मात्र मनसूख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणातील कैदेमुळे वाझेचा मुक्काम तूर्तास कारागृहातच राहणार

Live Update : अजित पवार यांना पुन्हा एकदा धक्का, अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे हातात शिवबंधन बांधणार

अजित पवार यांना पुन्हा एकदा धक्का.

अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे उद्या मुंबई येथे हातात शिवबंधन बांधणार. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात ते प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला रामराम ठोकून ते उद्या दुपारी 2 वाजता करणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. 

भारतीय चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय चित्रपटांबद्दल जगभरात आदर - करिना कपूर

भारताबद्दल , इथल्या संस्कृतीबद्दल अनेकांना कुतूहल असतं. भारताबद्दल ऐकल्यानंतर ते सगळे म्हणतात की आम्हालाही भारतात यायचं आहे. इथल्या असंख्य गोष्टी आहेत ज्या अभूतपूर्व आहेत. भारतीय चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय चित्रपटांबद्दल जगभरात आदर आहे.   

करिना कपूर, अभिनेत्री

भारतीय चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय चित्रपटांबद्दल जगभरात आदर - करिना कपूर

भारताबद्दल , इथल्या संस्कृतीबद्दल अनेकांना कुतूहल असतं. भारताबद्दल ऐकल्यानंतर ते सगळे म्हणतात की आम्हालाही भारतात यायचं आहे. इथल्या असंख्य गोष्टी आहेत ज्या अभूतपूर्व आहेत. भारतीय चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय चित्रपटांबद्दल जगभरात आदर आहे.   

करिना कपूर, अभिनेत्री

भारतीय फॅशन क्षेत्रातील रंग जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतात - करिना कपूर

भारतीय वेशभूषा परिधान केल्यानंतर जगात कुठेही गेलात तर तुम्ही लक्ष वेधून घेता. जगभरातील सगळ्यांना, सगळ्या संस्कृतीच्या लोकांना छान रंगाच्या साड्या, लेहंगा घालाव्याशा वाटतात.कुर्ता सलवार घालणं मला वैयक्तिकरित्या आवडतं. 

करिना कपूर, अभिनेत्री

करिना कपूर NDTV World Summit 2024 मध्ये

करिना कपूर NDTV World Summit 2024 मध्ये

NDTV World Summit : ग्रोचे सहसंस्थापक ललित केशरेंनी दिला अर्थसल्ला

ग्रो ही भारतीय कंपनी आहे, कंपनीचे ग्राहकही भारतीय आहे. त्यामुळे भारताबाहेर ही कंपनी असणे योग्य नव्हते. आयपीओ येईल, मात्र कधी येईल हे आताच सांगणे कठीण आहे. 

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड चांगले आहे. त्यात बरेच नावीन्यपूर्ण गोष्टी होत आहेत. नवे उत्पादने आणण्याऐवजी आहे ती उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न असेल. तंत्रज्ञानामुळे फिनटेक कंपन्यांनां ग्राहकांना सेवा देणे स्वस्त आणि सोपे असते. आणि यात मोठ्या सुधारणेचा वाव आहे. 

वित्त सेवांमध्ये विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. तो विश्वास वाढत गेला की ब्रँड तयार होतो. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करणं हे काहीसं कठीण असतं कारण ग्राहकांच्या अपेक्षा, गरजा वाढत असतात. मी देशभर फिरतो आणि ग्राहकांच्या अपेक्षा जाणून घेतो. ग्राहकांकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्यानंतर त्यावर बरंच विचारमंथन होतं.

उच्च तंत्रज्ञानाच्या आधारे काही गोष्टी उभ्या करत असताना काही अडचणी येणं हे स्वाभाविक आहे. मात्र ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आम्हाला ऊर्जा मिळते. नकारात्मक गोष्टी अधिक ठळकपणे दाखवल्या जातात. ग्राहकांकडून अनेक गोष्टी सांगितल्या जातात, सल्ले मिळतात. ग्राहक हे मोकळेपणाने मते मांडत असतात.     

Live Update : संदीप नाईकांचा शरद पवार गटात प्रवेश

Live Update : संदीप नाईकांचा शरद पवार गटात प्रवेश 




NDTV World Summit : GROWW च्या प्रवासाला कशी झाली सुरुवात? ललित केशरे म्हणाले...

मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच शेअर बाजारात गुंतवणुकीला सुरुवात केली होती. समविचारी मित्र भेटले.  तंत्रज्ञानाचा वापर करून लाखो गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचता येऊ शकते हे कळाले आणि तिथूनच ग्रो च्या प्रवासाला सुरुवात झाली. 

ललित केशरे, सह संस्थापक , GROWW

संदीप नाईक लवकरच शरद पवारांच्या गटात प्रवेश करणार

संदीप नाईकांचा निर्धार मेळावा : संदीप नाईक लवकरच शरद पवारांच्या गटात प्रवेश करणार

NDTV World Summit : अभिनेत्री अनुसूया गुप्ताने सांगितला कान्स फिल्म फेस्टीवलमधला अनुभव

Live Update : अजित पवारांना नवे चिन्ह दिले जावे, शरद पवारांच्या वकिलांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरण : सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली असून शरद पवारांच्या वकिलांनी अजित पवारांना नवे चिन्ह दिले जावे, अशी मागणी केली. अजित पवारांनी अजून त्यांचं प्रतिनिवेदन न्यायालयात सादर केलेलं नाही, हे नमूद केलं. त्यावर आमच्या उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरले आहेत. त्यामुळे या अर्जाला काही अर्थ उरत नसल्याचं अजित पवारांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वाशीच्या दिशेने रवाना

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वाशीच्या दिशेने रवाना झाले असून ते 

संदीप नाईक यांच्या पक्षप्रवेशास उपस्थित राहणार आहेत. 

महिलांवर अत्याचार करणाऱ्या मानसिकतेविरोधात लढावे लागेल - विजया राहाटकर

जबाबदारीचं पद आहे. जबाबदारीला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन. यापूर्वी राज्य महिला आयोगाचं काम पाहिलं. आता पुन्हा राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळतेय.  महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात क्रुरता आणि विकृती आहे. या मानसिकतेविरोधात लढावे लागेल. धाक बसेल, शिक्षा होईल अशी पावलं उचलावी लागतील. ॲडसिड विक्टीमसाठी काम करणं गरजेचं आहे. या प्रकरणात महिलेच्या मनावर खूप जखमा होतात. - विजया राहाटकर, राज्य महिला आयोग

लॉकडाऊनमध्ये काही करण्यासारखं नव्हतं, त्यानंतर माझ्या करिअरची सुरुवात झाली - मानसी महेश्वर, दिग्दर्शक, अॅनिमेटर

लॉकडाऊनमध्ये काही करण्यासारखं नव्हतं, तेव्हा मी कला क्षेत्रात काम करण्यास सुरू केली आणि अशा प्रकारे माझ्या करिअरला सुरुवात झाली - मानसी महेश्वर, दिग्दर्शक, अॅनिमेटर 

NDTV World Summit : सध्याच्या परिस्थितीत भाषांचा कोणताही अडथळा जाणवत नाही - दिग्दर्शक आणि लेखक चिदानंद एस. नाइक

सध्या चित्रपट क्षेत्रात भाषांचा कोणताही अडथळा जाणवत नाही. मी केलेला मल्याळम चित्रपटही मोठ्या प्लॅमफॉर्मवर पुरस्कार घेऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत भाषांचा कोणताही अडथळा जाणवत नाही. त्यामुळे अधिक गोष्टी सांगण्यावर भर दिला जातोय. - दिग्दर्शक आणि लेखक चिदानंद एस. नाइक

Live Update : अनसुया सेनगुप्ता NDTV वर्ल्ड शिखर संमेलनात सामील

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविलेल्या अनसुया सेनगुप्ता NDTV वर्ल्ड शिखर संमेलनात सामील झाली.  

Live Update : मनसेने आतापर्यंत जाहीर केलेले विधानसभेचे उमेदवार...

मनसेने आता पर्यंत जाहीर केलेले विधानसभेचे उमेदवार...

१) बाळा नांदगावकर-शिवडी 

२) राजू पाटील - कल्याण ग्रामीण 

३) अविनाश जाधव -ठाणे शहर 

४)दिलीप धोत्रे - पंढरपूर

५) संतोष नागरगोजे- लातूर ग्रामीण 

६) प्रमोद कुटे - हिंगोली

७) मंदिप रोडे - चंद्रपूर

८) सचिन भोयर - राजुरा

९)राजू उंबरकर - वणी

Live Update : NDTV वर्ल्ड शिखर संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात

पाच कोटींची कॅश माझी, सांगोल्यातील कंत्राटदाराचा दावा

पुणे बंगळुरू राष्ट्रीय (Pune Crime News) महामार्गावर पुणे ग्रामीण पोलिसांना सापडलेली पाच कोटी रुपयांची कॅश कंत्राटदाराने आपली असल्याचा दावा केला आहे. सांगोल्यातील  नदाफ नावाच्या व्यक्तीने हा दावा केला आहे.  आपण ठेकेदार असल्यामुळे हे पैसे आपले असल्याचा दावा नदाफ नावाच्या व्यक्तीने केला आहे. 21  ऑक्टोबर रोजी रात्री पोलिसांनी तब्बल पाच कोटींची रक्कम जप्त केली होती. 

पुणे ग्रामीण पोलिसांनी आयकर विभागाकडे रक्कम सोपवली आहे. पुण्यात एसबीआयच्या ट्रेझरी ब्रांचच्या लॉकरमध्ये ही रक्कम जप्त करून ठेवण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कारवाईनंतर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाची संयुक्त कारवाई करण्यात आली. मुंबईवरून सांगोल्याच्या दिशेने पाच कोटी रुपये जात असताना पोलिसांनी जप्त केले. 

संदीप नाईकांचा आज निर्धार मेळावा, राष्ट्रवादीत वेगळी चूल मांडणार

संदीप नाईकांचा आज निर्धार मेळावा, राष्ट्रवादीत वेगळी चूल मांडणार

भाजप आमदार गणेश नाईक यांना ऐरोली मधून उमेदवारी मिळालीय.. गणेश नाईक यांचा मुलगा आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना बेलापूर मधून तिकीट मिळाली नसल्याने ते भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात किंवा अपक्ष लढण्याची शक्यता आहे.. त्याच अनुषंगाने आज वाशीतील विष्णुदास भावे मध्ये त्यांनी निर्धार मेळावा ठेवलाय.. नवी मुंबईतील २५ माजी नगरसेवक देखील भाजपला रामराम ठोकत संदीप नाईकांसोबत जाणार आहेत..

Live Update : मनसेची पहिली उमेदवारांची यादी आज जाहीर होणार

मनसेची पहिली उमेदवारांची यादी आज जाहीर होणार

मनसे नेते अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित आहे. आजच्या पहिल्या यादीत अमित ठाकरे यांचे नाव जाहीर होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील 3 हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 3 हजार 500 रूपये सानुग्रह अनुदान आणि 12 हजार 800 रुपये फेस्टिवल रक्कम ॲडव्हान्स देण्यात येणार आहे. अग्रमी रक्कम आणि सानुग्रह अनुदान मिळून महापालिकेच्या तिजोरीवर 2 कोटी 14 लाख 17 हजार रुपयांचा बोजा पडणार आहे. विविध कामगारांच्या संघटनेने सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी प्रशासक जी. श्रीकांत यांच्याकडे केली होती. त्यामूळे प्रशासकांनी त्यांची मागणी मान्य करत या तीन हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com