जाहिरात

महाबळेश्वरमध्ये का पसरली होती रोगराई? अभ्यासातून समजली धक्कादायक माहिती

Disease in Mahabaleshwar : महाबळेश्वरला तुम्ही किंवा तुमच्या घरातील/ मित्रपरिवारातील मंडळी जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 

महाबळेश्वरमध्ये का पसरली होती रोगराई? अभ्यासातून समजली धक्कादायक माहिती

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
Disease in Mahabaleshwar : महाबळेश्वर हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. सातारा जिल्ह्यातल्या या थंड हवेच्या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. विशेषत: महाराष्ट्रातील लग्न झालेल्या अनेक जोडप्यांची हानीमूनसाठी महाबळेश्वरही पहिली पसंती असते. महाबळेश्वरला तुम्ही किंवा तुमच्या घरातील/ मित्रपरिवारातील मंडळी जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 

महाबळेश्वरमध्ये का पसतीय रोगराई?

महाबळेश्वरमध्ये अनेक वर्षांपासून स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉइड या विकारांना सामोरे जावे लागत होते. या रोगाचं  कारण समोर आलं आहे. महाबळेश्वरमधील पर्यटकांचं आकर्षण ठरणाऱ्या घोड्यांची विष्ठा हे या आजाराचे प्रमुख कारण आहे, अशी माहिती अभ्यासाचून समोर आली आहे. 

पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेतील शाश्वत विकास केंद्राच्या (सीएसडी) माध्यमातून 'आरोग्य जोखीम मूल्यांकन' संशोधन प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत महाबळेश्वर येथे संशोधन करण्यात आले. डॉ. प्रीती मस्तकार यांच्या नेतृत्वाखालील टिमचा अभ्यास केला. त्यामध्ये घोड्यांची विष्ठा महाबळेश्वरच्या वेण्णा तलावामध्ये मिसळत असल्याचं सिद्ध झालंय. या अहवालानंतर सातारा जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं. 

वेण्णा तलावाच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याचं काम पूर्ण झालं आहे. पण, अजूनही 200 घोडे तलावाजवळच आहेत. हे घोडे आणि पिण्याच्या पाण्यात उतरत असलेले पर्यटक महाबळेश्वर आणि पाचगणीतल्या रोगराईचे कारण आहे, अशी माहिती या अभ्यासातून समोर आलीय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

9 वर्षांपासून दुर्लक्ष

महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही नगरपालिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्या 9 वर्ष साफ केल्याच नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे ट्रिटमेंट प्लँट बंद होते. 

घोड्यांची विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळल्याने पाणी दूषित होऊन अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग,  बुरशीजन्य संसर्ग  आणि टायफॉइड अशा आजारांची लागण होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. 

महाबळेश्वरमध्ये अनेक वर्षांपासून स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉइड या विकारांना सामोरे जावे लागत आहे. त्याचे कारण घोडे असल्याचे पहिल्यांदाच उघड झालं आहे.  घोड्यांची विष्ठा पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांत मिसळली जात असल्याचे, पाण्याच्या माध्यमातून ती नागरिकांच्या पोटात जाऊन आजार होत असल्याचे दिसून आले.

( नक्की वाचा : गोव्याचे महाबळेश्वर कनेक्शन, फिरायला जाता मग महाबळेश्वर प्रमाणेच... )

संशोधन प्रकल्पात महाबळेश्वर, पाचगणी या दोन्ही शहरांचा पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेल्या वेण्णा तलावाच्या पाण्यासह इतर सर्व स्रोत, जलशुद्धीकरण केंद्रे, घरे, व्यावसायिक आस्थापना आणि भूजल यांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली.  त्यात पिण्याच्या पाणी, भूजल नमुन्यांमध्ये उच्च प्रमाणात प्रदूषण दिसून आले. 

वेण्णा तलाव आणि महाबळेश्वरमधील सर्व रस्त्यांवर आणि पाण्याच्या पाइपलाइनलगत घोड्यांचा विष्ठायुक्त कचरा आढळतो.  घोड्यांच्या विष्ठेमध्ये इतर प्रदूषणाव्यतिरिक्त विषाणू आणि जीवाणू असल्याने पाणी दूषित होऊन ते आजारांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे सिद्ध झालं आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
सोलापूरमध्ये मनोज जरांगेंविरोधात मराठा समाजाचं आंदोलन, या 11 प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने आक्रमक
महाबळेश्वरमध्ये का पसरली होती रोगराई? अभ्यासातून समजली धक्कादायक माहिती
aimim-announces-5-candidates-maharashtra-assembly-elections-2024
Next Article
Maharashtra Assembly Election 2024 : 'या' पक्षाकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर