जाहिरात
This Article is From May 26, 2025

Mahabaleshwar Rain : वेड लावणारं महाबळेश्वर! प्रसिद्ध लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागला, मन मोहून टाकणारा Video

धबधब्याचं सौंदर्य डोळ्यांत साठवण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत.

Mahabaleshwar Rain : वेड लावणारं महाबळेश्वर! प्रसिद्ध लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागला, मन मोहून टाकणारा Video

महाराष्ट्रातील नागरिकांच्या आवडत्या थंड हवेच्या ठिकाणांमध्ये महाबळेश्वरचं नाव अग्रस्थानी असतं. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे साताऱ्यातील महाबळेश्वरचं सौंदर्य खुलून आलं आहे. महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जाणारं महाबळेश्वर पुन्हा एकदा निसर्गाच्या सौंदर्यानं नटलं आहे. महाबळेश्वरमधील वेण्णा नदीवरील प्रसिद्ध लिंगमळा धबधबा आज ओसंडून वाहू लागला आहे. हा संपूर्ण परिसरात पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर पसरल्याचं दिसून येत आहे. याशिवाय अधून मधून पडणाऱ्या पावसाच्या धारा यामधून येथील निसर्ग खुलून दिसत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाबळेश्वरमध्येही विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच तालुक्यामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे. साताऱ्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने शेती, ओढे, नाले  सगळं काही पाण्याखाली गेलंय आणि याच दरम्यान लिंगमळाचा धबधबा फेसाळून वाहताना पर्यटकांना आपलं वेड लावतोय.

Mumbai Rain : मे महिन्याच्या पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला; रस्ते वाहतुकीवर परिणाम, रेल्वेही उशीराने

नक्की वाचा - Mumbai Rain : मे महिन्याच्या पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला; रस्ते वाहतुकीवर परिणाम, रेल्वेही उशीराने

धबधब्याचं सौंदर्य डोळ्यांत साठवण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. पावसामुळे रस्त्यांची स्थिती बदलत चालली असली तरी धबधब्याचं हे रूप पाहण्यासाठी आलेले पर्यटक निसर्गाच्या प्रेमात हरवले आहेत. प्रशासनाकडून मात्र पर्यटकांना सुरक्षित अंतर राखण्याचं आणि सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. धबधब्याची ही जादू, निसर्गाचा हा आविष्कार पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com