जाहिरात
10 days ago

Maharashtra Assembly Monsoon Session Live Updates: आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. 30 जून ते 18 जुलैपर्यंत यंदाचे पावसाळी अधिवेशन चालणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने हिंदी भाषेचा जीआर मागे घेतला असला तरी शक्तीपीठ महामार्ग, शेतकरी कर्जमाफी तसेच लाडकी बहीणचा मुद्दाही चर्चेत आहे. याच मुद्द्यावरुन अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळणार आहे. 

Marathi News LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ते 9 जुलै दरम्यान पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ते 9 जुलै दरम्यान पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाला या देशाला भेट देणार आहेत.

मोदींचा हा दौरा पश्चिम आफ्रिकेपासून सुरू होणार आहे

मोदी 2-3 जुलै 2025 ला घानाला भेट देणार आहेत..

घानाच्या या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 03 ते 04 जुलै 2025 ला घानाहून त्रिनिदाद आणि टोबॅगोला दौऱ्यावर जाणार आहेत…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तिसऱ्या टप्प्यात 4 आणि 5 जुलैला अर्जेंटीना दौऱ्यावर असतील…

6 आणि 8 जुलैला ब्राझीलमधील रियो दि जनेरियो येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. 

ब्रिक्स देशाच्या या परिषदेनंतर पंतप्रधान 09 जुलैला नामीबियाच्या दौऱ्यावर असतील.

Marathi News LIVE : मुंबई काँग्रेसच्या महापालिका निवडणुकीसाठी बनवलेली समिती बदलली

मुंबई काँग्रेसच्या महापालिका निवडणूकी यादीत बदल करण्यात आले आहेत

चंद्रकांत हांडोरे,नसीम खान आणि भाई जगताप यांच्या नावांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे

आज दिल्लीत प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत यादी बद्दल नाराजी देखील व्यक्त करण्यात आली होती

नंतर एक सुधारित यादी जाहीर केली आहे आणि या यादीत या तीन नेत्यांची नावे प्रथम देण्यात आली आहे

सोयगाव खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलचा दणदणीत विजय

सोयगाव खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलचा दणदणीत विजय 

17 पैकी 13 जागेवर आमदार अब्दुल सत्तारांच्या  पॅनलने बाजी मारली 

रविवार खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी मतदान झाले.  दरम्यान आज मतमोजणी पार पडली

सत्तारांच्या पॅनलने विजय मिळवताचं सिल्लोड आणि सोयगाव कार्यालयासमोर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला

तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकमेकास पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला . 

Marathi News LIVE : नागपूर दंगलीतील तब्बल 80 आरोपींना जामीन मंजूर

नागपूर दंगलीतील तब्बल 80 आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.  17 मार्च 2025 रोजी घडलेल्या नागपूर दंगलीच्या संदर्भातील महत्वाचा निर्णय कोर्टाने दिला आहे.  सर्व ऐंशी आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए आर कुलकर्णी यांनी हा निर्णय  दिला आहे. उद्या किंवा परवा मध्यवर्ती कारागृहातून आरोपी सुटणार आहेत.  मात्र सूत्रधार फहीम खान यांच्या जामीनाविषयी निर्णय 4 जुलै रोजी होणार आहे. 

Marathi News LIVE : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी दिला राजीनामा

कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटात नाराजी नाट्य सुरू झाला आहे. उपनेते संजय पवार यांनी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर खळबळ उडाली. नवीन जिल्हा प्रमुख निवडीनंतर या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. संजय पवार यांनी याबाबत भूमिका जाहीर करताना पक्षातील अंतर्गत घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी अपेक्षित असं काम वरिष्ठ पातळीवर झालेलं नाही, कोणत्याही निर्णयात पदाधिकारी असो वा कार्यकर्ता यांना घेतले जात नाही म्हणूनच राजीनामा देणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत तीन ठराव पास

१ ऑपरेशन सिंदूर पंतप्रधानाचा आभाराचा ठराव सहमत

२ केंद्र सरकारच्या जातीय जनगणना निर्णयाला शिवसेनाच्या पाठिंब्याचा ठराव सहमत

३ मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना नेहमी आग्रही असल्याचा ठराव सहमत

असे आता पर्यंत तीन ठराव सहमतझाले

थोड्या वेळात एकनाथ शिंदे मुख्य नेते निवड ठराव बैठकात मांडण्यात येणार

Marathi News LIVE : भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांनी भरला अर्ज

भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा अर्ज रवींद्र चव्हाण यांनी भरला आहे. त्यांच्या बरोबर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस ही उपस्थित आहेत.   

LIVE Updates: जनसुरक्षा कायद्याविरोधात आझाद मैदानावर आंदोलन, उद्धव ठाकरेंची उपस्थिती

महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविरोधात मुंबईमध्ये आंदोलन सुरु आहे. मुंबईतील आझाद मैदानावर उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीतील नेते या आंदोलनात सहभागी झालेत. 

Maharashtra Assembly Session LIVE: अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी- विरोधकांचे आंदोलन

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री  ठाकरे गटाविरोधात आंदोलन करत आहेत. त्याचबरोबर विरोधकांनीही विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु केले आहे. 

Maharashtra Assembly Live Update: गोपीचंद पडळकर वारकऱ्यांच्या वेशात विधानभवनात दाखल

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात आहे. अधिवेशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार दाखल झाले आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर हे वारकरी वेशामध्ये दाखल झाले आहेत.

LIVE Updates: अजित पवार गटाचे नेते अपूर्व हिरे भाजपच्या वाटेवर

- भाजपचे धक्कातंत्र सुरूच 

- माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते अपूर्व हिरे भाजपच्या वाटेवर 

- 2 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

- अपूर्व हिरे शिक्षक मतदार संघाचे होते आमदार

- 2019 मध्ये अपूर्व हिरे यांनी भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात नाशिक पश्चिम मतदारसंघातूनही लढवली होती निवडणूक

LIVE Updates: दिल्लीत आज महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची बैठक

दिल्लीत आज ३० जूनला महाराष्ट्र कॉंग्रेस पक्षाची बैठक

आगामी काळात महाराष्ट्र कॉंग्रेस पक्षात होणार मोठे फेरबदल 

अनेक नेत्यांवर पक्षातील महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात तसंच महाराष्ट्रातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राजधानी दिल्लीत बैठक

कॉंग्रेसचं यंदाचं वर्ष संघटन पर्व असल्यानं महाराष्ट्रात संघटन मजबूत करण्यावर भर देणार

बैठकीसाठी दिल्लीत आलेले नेते…

हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष 

विजय वड्डेटीवार, कॉंग्रेस नेते

भाई जगताप, माजी मुंबई अध्यक्ष

वर्षा गायकवाड, मुंबई अध्यक्ष

यशोमती ठाकूर, कॉंग्रेस नेत्या

मानिकराव ठाकरे, कॉंग्रेस नेते

LIVE Updates: नाशिकच्या बिडी कामगार परिसरात तिन अल्पवयीन मुले तलावात बुडाले

- नाशिकच्या बिडी कामगार परिसरात तिन अल्पवयीन मुले कृत्रिम तलावात बुडाले 

- बांधकाम साईटवर तयार केलेल्या तलावात पोहण्यासाठी गेल्याने पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती

- काल दुपारपासून तिघे होते बेपत्ता, तलावाच्या बाजूला कपडे आढळून आल्याने लागला शोध 

- तलावातून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू

- घटनेचा आडगाव पोलिसांकडून तपास सुरू

LIVE Updates: हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली बैठक

हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली आज महत्त्वाची बैठक 

 मनसेचे नेते, सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकारी राहणाऱ बैठकीसाठी उपस्थित 

 सकाळी दहा वाजता शिवतीर्थ निवासस्थानी बैठक 

 या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार 

 उद्धव ठाकरे यांनी पाच जुलै चा मोर्चा रद्द झाला असला तरी जल्लोष केला जाणार सभा किंवा मेळावा घेतला जाणार  त्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं अस आवाहन केलेल आहे 

 या जल्लोषासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का ?

 राज ठाकरे आजच्या बैठकीनंतर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष

LIVE updates: शिवेसना पक्षाची आज राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक

शिवेसना पक्षाची आज राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक 

मुंबईत बैठकीच आयोजन 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक 

बैठकीत नवीन कार्यकारिणी तसंच महत्वाचे ठराव मंजूर करण्यात येणार 

एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून निवड होण्याची शक्यता

LIVE Updates: पावसाळ्यात सातपुड्यातील नैसर्गिक सौंदर्य बहरलं

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सरत असलेल्या मुसळधार पाऊस पावसामुळे सातपुड्याचे नैसर्गिक सौंदर्य खुललं असून सातपुड्यातील अनेक लहान-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहे त्यातीलच एक तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या वाल्हेरी धबधबा सध्या पर्यटकांना आकर्षित करत आहेत पसरलेले धबधबे आणि वर्षा पर्यटनाचा आनंदासाठी महाराष्ट्र गुजरात यासह मध्य प्रदेश राज्यातील पर्यटक सध्या सातपुड्यात दाखल होत आहेत. वाल्हेरी धबधब्यावर सध्या पर्यटकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे...

Live Updates: मराठी अस्मितेचा विजय झाला: हर्षवर्धन सपकाळ

हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रभर निर्माण झालेल्या जनआक्रोशासमोर अखेर महाभ्रष्ट महायुती सरकारला नमते घ्यावे लागले. विरोधी पक्षांनी घेतलेला ठाम पवित्रा, मराठी भाषाप्रेमी नागरिक संस्थांचा जोरदार विरोध आणि सोशल मीडियावर पेटलेली लाट या सर्वांच्या परिणामी सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही शासन आदेश रद्द केले आहेत, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. 

LIVE Updates: संदीपान भूमरेंच्या चालकाला चौकशीसाठी बोलावलं

सालारजंग जमिनीच्या हिबानामा प्रकरणात संदीपान भूमरेंच्या चालकाला चौकसाठी बोलावलं

आर्थिक गुन्हे शाखेकडून १५० कोटी रुपये किमतीच्या जमिनीच्या वादग्रस्त व्यवहाराची चौकश

भूमरेंचा चालक जावेद रसूल शेखला नोटीस देत आज बोलावलं चौकसाठी

हैदराबाद येथील सालारजंग घराण्याचे वंशज मीर महेमूद अली खानला देखील नोटीस

यापूर्वी देखील नोटीस देऊन बोलवण्यात आले होते

भूमरेंचा चालक चौकशीसाठी उपस्थित राहणार का?

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com