जाहिरात

Budget Session 2025: शिंदेंच्या कामांना स्थगिती का? अखेर मुख्यमंत्री बोलले; वाचा मोठे मुद्दे

Maharashtra Assembly Budget Session: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात अतिशय आदरभाव असलेले हे सरकार आहे, आम्ही कधीही छत्रपतींच्या कुटुंबाला दाखले मागितले नाहीत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

Budget Session 2025:  शिंदेंच्या कामांना स्थगिती का? अखेर मुख्यमंत्री बोलले; वाचा मोठे मुद्दे

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस असून विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवरुन सविस्तर उत्तरे दिली. तसेच दावोस करारवरुन होणारी टीका आणि सरकारमध्ये सुरु असलेल्या स्थगितीच्या बातम्यांवरुनही विरोधकांवर निशाणा साधला. 

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

"जनतेने दिलेला दणदणीत जनादेश तर आहेच, त्यासोबतच भारतरत्न आंबेडकरांनी दाखवलेल्या संविधाने मार्गाने चालण्याचा हा जनादेश आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही आपल्या सर्वांची दैवते आहेत गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे काम सुरु आहे. १२ किल्ले हे हेरिटेज करण्याचे काम सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात अतिशय आदरभाव असलेले हे सरकार आहे, आम्ही कधीही छत्रपतींच्या कुटुंबाला दाखले मागितले नाहीत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

"सध्या माध्यमांची एक आवडती बातमी झाली आहे. काहीही झालं की फडणवीसांनी शिंदेंच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली ही एक पेड बातमी झाली आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा, स्थगिती देण्याकरिता मी उद्धव ठाकरे नाही. यापूर्वीदेखील मी सांगितलं आहे, जे जे राज्याच्या हिताचं आहे ते सुरु करताना घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी ही आमच्या तिघांची आहे. ज्याठिकाणी काही गडबड आढळेल त्याठिकाणी चर्चा करुनच निर्णय होईल," असं ठरवलं आहे. मात्र त्या खात्याच्या मंत्र्याने स्थगिती दिली तर फडणवीसांचा दणका, शिंदेंच्या खात्यांना स्थगिती दिली, अशा बातम्या येतात. क गोष्ट सांगतो, हे समन्वयाने चालणारे सरकार आहे. असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. 

"दावोसमध्ये आपण 63 सामंजस्य करार केले,त्यांपैकी  निम्म्या प्रकल्पांवर काम सुरु आहे. जयंतराव तुमचा प्रोब्लेम आहे, तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या लोकांसोबत चुकीच्या गोष्टी सांगतात. तुम्ही दादांचा ऐकत नाही तो तुमचा प्रोब्लेम आहे. रोहित पवार, वरुणने शंका केली तर समजू शकतो मात्र तुमच्या साारख्या नेत्यांनी राज्यातील गुंतवणुकीवर शंका उपस्थित करु नये. साऱ्यांची शंकांची अशी मागू नको उत्तरे, असताच शंकेखोर त्यांचे कधी झाले बरे..." अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी लगावली.

(नक्की वाचा- Budget Session 2025: फक्त घोषणा, धनंजय मुंडेंनी खरंच राजीनामा दिला का? सभागृहात राडा)

तसेच  दाओसला जाऊनच का करार केले, अशा टीका होतात. 2022मध्ये दावोसला कोण गेले होते? आदित्य ठाकरे गेले होते ना.. तिथे 80,000 कोटींचे करार केले. ते भारतीय कंपन्यांसोबतच केले आहेत. दावोसमध्ये फक्त महाराष्ट्राचीच चर्चा पाहायला मिळते. त्यामुळे त्याकडे संकुचित बुद्धीने पाहू नका. महाराष्ट्रातील नेतेच गुजरात आघाडीवर असं म्हणतात, त्यामुळे त्यांनी प्रचारावर का खर्च करावा? असंही मुख्यमंत्री म्हणाले. 

एचएसआरपी नंबर प्लेटबाबत महत्त्वाची माहिती..

एचएसआरपी नंबर प्लेटचे दर आपल्या राज्यात जास्त असल्याचे सांगितले जात आहे. मात्र इतर राज्यांच्या दरासोबत तुलना करुन आपण याचे दर ठरवले आहेत.यामध्ये एक कमिटी नेमून हे काम केले आहे.यासंदर्भात आपण बघितलं तर काही राज्यांनी फिटमेस आणि लेट चार्जेस वेगळे दाखवलेत, आपण एकत्रित केले आहे. दुचाकीसाठी 420 पासून 480 पर्यंत आहेत, महाराष्ट्रात 450 आहेत तीनचाकीसाठी इतर राज्यांमध्ये 450 ते 550 आहेत, महाराष्ट्रात 500 आहेत. चारचाकी 800 आपले 745 जड वाहनांसाठी 690 ते 800 आहेत, आपले 745 आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: