
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये पनीरच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध विभागाने तब्बल 1400 किलो पनीर जप्त करत कारवाई केली होती. याच पनीरच्या भेसळीचे पडसाद विधानसभेत उमटले. या पनीर भेसळीच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजप आमदाराने विधानसभेत आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय जनता पक्षाचे श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी भेसळयुक्त पनीर विक्रीच्या मुद्द्यावरुन प्रशासनाला धारेवर धरले. आपल्या रोजच्या जेवनातले 70 ते 75% टक्के पनीर हे कृत्रीम असल्याचे सांगत त्यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे त्यांनी तक्रारही केली.
केंद्र सरकारचा चीज बनवण्यासाठीचा एक कायदा आहे. आपण याबाबत जनजागृती करणे गरजेचे नाही. आपल्या रोजच्या जेवनातले 70 ते 75% टक्के पनीर हे कृत्रीम आहे. ते दुधापासून बनवलेले नाही. हे पनीर फक्त दुधाची पावडर आणि व्हेजिटेबल फॅक्ट टाकून बनवले आहे. एकाबाजूला पनीर तर दुसरीकडे पनीर सारखे दिसणारे ऍनॉलॉग चीज आहे, असे आमदार पाचपुते यावेळी म्हणाले.
Beed Crime : बीडमधील पाचवा संतापजनक Video; आता तर क्रौर्याची हद्दच गाठली!
तसेच यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे बनावट पनीरही दिले. आपल्या लहान मुलांना आपण अन्न म्हणून पनीरच्या नावाखाली विष खाऊ घालत आहे, हे तेलाचे गोळे आहेत, असे म्हणत विक्रमसिंह पाचपुते यांनी संताप व्यक्त केला. मी प्रश्न मांडला तर कारवाई करण्यात आली. पुणे तसेच चंद्रपूरमध्ये तब्बल 15 लाखांचे पनीर सापडले. ही बाब गंभीर आहे. याविरोधात कोणताही कठोर कायदा नाही. हा माझ्या एकट्याच्या मतदारसंघाचा प्रश्न नाही, तुम्ही पनीर खाऊन पाहा.. अशा शब्दात विक्रमसिंह पाटणकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.
नक्की वाचा - Road Accident : रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रशासन अलर्टवर; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world