Breaking : पूजा खेडकर यांना मोठा दिलासा, तूर्तास अटक नाही!
UPSC प्रकरणात फसवणूक करणाऱ्या पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीनावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. दरम्यान पूजा खेडकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना तत्काळ अटक करण्याची गरज नाही. चौकशी सुरू असताना अटकेची आवश्यकता नसल्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तूर्तास तरी पूजा खेडकर यांची अटक टळली आहे. पूजा खेडकर प्रकरणातील पुढील सुनावणी 21 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. दरम्यान आजच्या सुनावणीवेळी पूजा खेडकरांनी आई-वडिलांचं नाव वारंवार बदलल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय त्यांनी आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याची खोटी बातमी दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे यात पूजाच्या आई-वडिलांचाही सहभाग आहे. कारण दोघेही सोबतच राहत असल्याची माहिती आहे. UPSC च्या एका मॉक मुलाखतीदरम्यान पूजा खेडकर यांनी आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचं सार्वजनिकपणे सांगितलं होतं.
This is a breaking news story. Details will be added soon. Please refresh the page for latest version.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world