Ajit Pawar Passes Away:अजित पवारांच्या अपघातापूर्वी काय घडलं? धक्कादायक माहिती समोर, पायलटने मेडे कॉल केला अन्

Ajit Pawar Passes Away: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

जाहिरात
Read Time: 1 min
"Ajit Pawar Death: अपघातापूर्वी धक्कादायक माहिती समोर आली"
PTI

Ajit Pawar Passes Away: महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताशी संबंधित मोठी माहिती समोर आलीय. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोल कक्षाला याबाबत माहिती दिली. पायलटने मेडे कॉल करून इमर्जन्सी लँडिंग करण्याबाबत परवानगी मागितली. एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून परवानगी मिळाल्यानंतर पायलटने इमर्जन्सी लँडिंग केले. लँडिंगदरम्यान विमान जमिनीवर आदळलं आणि मोठा स्फोट झाला. AAIB या अपघाताची चौकशी करणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिलीय. AAIBच्या चौकशीनंतर विमान अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. 

(नक्की वाचा: Ajit Pawar Passes Away: अजित पवारांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक, PM नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी वाहिली श्रद्धांजली