गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (DGP Rashmi Shukla Transfers) यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी हटवण्याची मागणी जोर धरत होती. महाविकास आघाडीकडून त्यांना पदावरुन हटवण्यात यावं अशी मागणी केली जात होती. अखेर मविआच्या मागणीला यश आलं असून राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात आदेश दिले होते.
विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना का हटवलं नाही, यावरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर ताशेरे ओढले जात होते. विरोधकांच्या फोन टॅपिंक प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना निवडणूक प्रक्रियेत कुठेही नियुक्ती करू नये अशी मागणी केली जात आहे.
नक्की वाचा - विधानसभा लढवण्यावर ठाम होते, जरांगे पाटलांनी अचानक निर्णय का बदलला? निवडणुकीतून का घेतली माघार?
Acting on the complaints from INC and other parties, Election Commission of India orders transfer of Rashmi Shukla, DGP Maharashtra with immediate effect with directions to Chief Secretary to hand over her charge to the next senior most IPS officer in the cadre. The Chief… pic.twitter.com/DqocropZo0
— ANI (@ANI) November 4, 2024
काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी रश्मी शु्क्ला यांची बदलीसाठी निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवलं होतं. यावेळी त्यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. राज्यातील निवडणूक निष्पक्ष व्हावी यासाठी त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world