जाहिरात

Government Jobs 2025: राज्य शासनाच्या 'या' विभागात 903 पदांवर मोठी भरती; नोकरीसाठी कोण पात्र? वाचा सविस्तर

Government Jobs 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात गट ‘क’ संवर्गातील भूकरमापक (Surveyor) पदांच्या 903 जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

Government Jobs 2025:  राज्य शासनाच्या 'या' विभागात 903 पदांवर मोठी भरती; नोकरीसाठी कोण पात्र? वाचा सविस्तर
पुणे:

Government Jobs 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात गट ‘क' संवर्गातील भूकरमापक (Surveyor) पदांच्या 903 जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 01 ते 24 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील भूमी अभिलेख विभागात भूकरमापक संवर्गात एकूण 1,160 पदे रिक्त आहेत, त्यापैकी 903 पदे सरळसेवेने भरली जाणार आहेत. भरतीची ऑनलाईन परीक्षा 13 आणि 14 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.

विभागनिहाय रिक्त पदांचा तपशील (903 पदे)


या भरतीमध्ये राज्यातील सहा विभागांमधील पदांचा समावेश आहे:

विभाग                               रिक्त पदे (संख्या)
कोकण (मुंबई)                             259
छत्रपती संभाजीनगर                      210
नाशिक                                       124
अमरावती                                     117
नागपूर                                         110
पुणे                                               83
एकूण                                           903


( नक्की वाचा : Arattai ॲपचे वैशिष्ट्य काय? व्हॉट्सॲपला टक्कर देणाऱ्या 'स्वदेशी' ॲपबद्दलची A to Z माहिती इथं वाचा! )
 

शैक्षणिक पात्रता

  • भूकरमापक पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खालीलपैकी एक पात्रता असणे आवश्यक आहे:
  • मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) धारक. किंवा
  • माध्यमिक शालांत परीक्षेनंतर (SSC) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ITI) सर्वेक्षक (Surveyor) व्यवसायाचे प्रमाणपत्र धारक.
  • अर्ज प्रक्रिया आणि निवड पद्धत
  • ऑनलाईन अर्ज: उमेदवार आपले अर्ज भूमी अभिलेख विभागाची अधिकृत संकेतस्थळे https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ आणि https://mahabhumi.gov.in यावर ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात.
  • निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.

गुणवत्ता यादी: परीक्षेतील गुणांनुसार, विभागनिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

अंतिम निवड: त्यानंतर सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार कागदपत्र पडताळणी करून विभागनिहाय अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.

पात्रताधारक उमेदवारांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com