जाहिरात

Free Army Training: सैन्यात अधिकारी होण्याचं स्वप्न पुर्ण होणार! राज्य सरकारतर्फे मोफत प्रशिक्षण; कुठे आणि कसा कराल अर्ज?

राज्यभरातील युवक व युवतींसाठी 20 जानेवारी 2025 ते एप्रिल 2025 पर्यंत सीडीएस प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये मोफत प्रशिक्षणासह राहण्याची तसेच जेवणाचीही सोय असेल

Free Army Training: सैन्यात अधिकारी होण्याचं स्वप्न पुर्ण होणार! राज्य सरकारतर्फे मोफत प्रशिक्षण; कुठे आणि कसा कराल अर्ज?

मुंबई: भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये भरती होण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी भरती
होण्यासाठी पात्र उमेदवारांना कम्बाईंड डिफेन्स सर्विसेस या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्र शासनामार्फत
राज्यभरातील युवक व युवतींसाठी 20 जानेवारी 2025 ते एप्रिल 2025 पर्यंत सीडीएस प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये मोफत
प्रशिक्षणासह राहण्याची तसेच जेवणाचीही सोय असेल अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यामध्ये मुंबई शहरासह जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कार्यालय, कल्याण येथे 6जानेवारी 2025
रोजी मुलाखतीसाठी सकाळी 10 ते दुपारी ते 3 वाजेपर्यंत हजर रहावे. यावेळी  Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवरील सी.डी.एस.-६४ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या)
 प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट सोबत ठेवाली. 

उमेदवारांना सी.डी.एस.वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. 
  2. उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी. डी. एस. (CDS) या परीक्षेकरिता ऑनलाईन द्वारे अर्ज केलेला असावा.

दरम्यान, अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व  प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र.  ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सअॅप क्र. 9156073306 (प्रवेश मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.

ट्रेंडिंग बातमी - Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याच एन्काऊंटर केला तर 51 लाखाचं बक्षिस अन्...