Maharashtra LIVE Updates: राज्यभरात मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. मराठवाड्यात पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसात शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असून 30 लाख हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे. या जलप्रलयाने बळीराजा संकटात सापडला असून सर्व मंत्र्यांकडून सध्या पाहणी सुरु आहे.
Amravati LIVE Updates: नाना पटोलेंना धक्का, विश्वासू शिलेदार भाजपमध्ये
काँग्रेसचे माजी प्रदेश संघटन सरचिटणीस आणि नाना पटोले यांचे विश्वासू देवानंद पवार भाजपमध्ये...
यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठा धक्का...
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित केला प्रवेश...
प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार झाले भाजपवासी...
विचारधारेच्या नावाखाली काँग्रेस बहुजनांचा छळ करतोय, हे मी अनुभवलं..
ज्या पक्षात सामाजिक न्याय मिळत नसेल तिथे राहून काय उपयोग, देवानंद पवार यांची प्रतिक्रिया...
LIVE Update: येवल्यात आदिवासी बांधवांचा मोर्चा
हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत बंजारा , धनगर, कैकाडी या जातींना आदिवासी प्रवर्गात आरक्षण देऊ नये यासह विविध मागण्यांसाठी नाशिकच्या येवल्यात आदिवासी बांधवांच्यावतीने एकलव्य आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.काही नेते दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्या करत असून अशा नेत्यांवर ॲट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांनी सहभाग घेत येवला तहसीलदारांना निवेदन दिले.
LIVE Update: पाचव्या दिवशी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आज भाविकांनी गर्दी केली. शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात मोठ्या संख्येने राज्यभरातून भाविक कोल्हापुरात दाखल होत आहेत. आजच्या पाचव्या दिवशी दुपारपर्यंत दीड लाखहुन अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतलं. मंदिराच्या चारीही बाजूने भाविकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. पोलीस आणि देवास्थन समीतीने भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी विविध बदल केले. याचा उपयोग भाविकांना दर्शन आणि वाहन पार्किंगसाठी होत आहे.
LIVE Update: जळगावमध्ये भीषण अपघात, 3 तरुणांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या पूर्णाड फाट्यावर भीषण अपघात
भरधाव डंपरने दुचाकीला दिली धडक , अपघातात तीन जण जागीच ठार
अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरची तोडफोड करत डंपर पेटवला
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर मिळवले नियंत्रण..
LIVE Update: समीर वानखेडेंना धक्का, कोर्टाने याचिका फेटाळली
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. उच्च न्यायालयाने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने नेटफ्लिक्स शोवरून त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी करण्यास नकार दिला.
वानखेडे यांनी त्यांच्या याचिकेत सुधारणांसह न्यायालयात पुन्हा जाण्याची परवानगी मागितली. उच्च न्यायालयाने परवानगी दिली.
LIVE Update: एमपीएसीच्या परिक्षा ठरल्याप्रमाणेच होणार
एमपीएसीच्या परिक्षा ठरल्याप्रमाणेच होणार
पुरपरिस्थीतीमुळे काही विद्यार्थ्यांनी परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती
रविवारी होणाऱ्या परिक्षेच्या एमपीएसीकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
एमपीएससीने वेळापत्रक परीक्षा नियोजनाचे तपशील परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहेत.
पूर परिस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती
आयोगाने काढलेल्या परिपत्रकानुसार तूर्तास परीक्षा पुढे ढकलण्याची कुठली चिन्हे नसल्याचे दिसून येत आहे.
या परिपत्रकामध्ये आयोगाने परीक्षा संदर्भात महत्त्वाच्या सूचना विद्यार्थ्यांसाठी दिले आहेत
Pune LIVE Update: पुण्यात स्वच्छता ही सेवा उपक्रम
पुण्यात स्वच्छता ही सेवा उपक्रम
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम उतरले रस्त्यावर
महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उचलला ९२ टन ओला-सुका कचरा, राडारोडा
स्वच्छता ही सेवा या मोहिमेत जवळपास ३ हजार ३०० जण झाले सहभागी
शहराच्या वेगवेगळ्या भागांत अस्वच्छता, ठिकठिकाणी पडलेला कचरा, राडारोडा, रस्त्याच्याकडेला असलेला गाळ, माती याबाबत आयुक्तांकडे वारंवार तक्रारी येतात. त्यानुसार आयुक्त त्याबाबत सूचना संबंधित विभागांना देतात.
त्यानंतरही शहरातील प्रश्न सुटत नसल्याने आयुक्तांनी महापालिकेच्या सर्व विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना घेऊन संयुक्तपणे 'स्वच्छता ही सेवा' या उपक्रमाअंतर्गत 'एक दिवस, एक तास, एक साथ श्रमदान' या संकल्पनेनुसार गुरुवारी स्वच्छता अभियान राबविले
नदीपात्रातील भिडे पूल ते ओंकारेश्वर मंदिर परिसरात ही मोहीम राबविण्यात आली
LIVE Update: मुंबई उपनगरावर येणार कबूतर खाण्याचा भार
- मुंबई उपनगरावर येणार कबूतर खाण्याचा भार
- मुंबई महापालिका उपनगरात 13 नवे कबूतरखाणे सुरू करण्याच्या विचाराधीन
- लोकवस्तीपासून 500 मिटरवर असणार नवे कबूतर खाणे
- वॉर्ड अधिकारी कबूतर खानासाठी जागांच्या शोधात
- एन वॉर्ड: अंधेरी-घाटकोपर मार्गावर नवी जागा, पी उत्तर: मालाडमधील मोकळी जागा, एस वॉर्ड : विक्रोळीतील टागोरनगरमध्ये पर्याय
LIVE Update: ब्रेकिंगः CM देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार
ब्रेकिंगः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार
राज्यातील ओला दुष्काळाची माहिती देणार
फडणवीस दोन महत्त्वाच्या मागण्या पंतप्रधान मोदींकडे करणार
१. केंद्र सरकारने ओला दुष्काळग्रस्त भागाला तातडीने मदत करावी
२. केंद्र सरकारने राज्याला पॅकेज जाहीर करावे
राज्याने दोन हजार कोटी पेक्षा जास्त निधी वितरीत केला आहे.
आता केंद्र सरकारनं मदत करावी
फडणवीस करणार मागणी
LIVE Update: अजित पवारांचा भाजपला दे धक्का
अजित पवारांचा भाजपला दे धक्का
पुणे जिल्ह्यातील अनेक भाजप मधील पदाधिकारी यांचा अजित पवार यांच्या उपथितीत प्रवेश होणार
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची मोर्चे बांधणी सुरु
भाजपा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी मधील शेकडो जणानी केला अजित पवारांच्या राष्ट्रवादित प्रवेश
LIVE Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणा बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल
24 सप्टेंबर रोजी बार्शी तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना
बार्शी तालुक्यातील दहिटणे गावातील शेतकरी लक्ष्मण काशिनाथ गवसाने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय
तर कारी गावातील शेतकरी शरद भागवत गंभीर यांनी देखील गळफास घेऊन आत्महत्या केली
LIVE Update: पुण्यातील अनेक ठिकाणी महानगरपालिकेकडून अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई
पुण्यातील अनेक ठिकाणी महानगरपालिकेकडून अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई
पुण्यातील बिबवेवाडी, कोंढवा आणि येवलेवाडी परिसरात महापालिकेने केली अतिक्रमण विरोधी कारवाई
अनधिकृत आस्थापनांवर महापालिकेने चालवला हातोडा
याआधी नोटीस देऊन देखील अतिक्रमण न काढल्याने महापालिकेने केली कारवाई
फुटपाथ वरती असलेले पत्र्यांची शेड ,दुकाने, लहान टपऱ्या आणि अनधिकृत बांधकामांवर देखील महापालिकेने केली कारवाई
LIVE Updates: तुषार गांधी यांची २९ सप्टेंबर पासून दीक्षाभूमी ते सेवाग्राम पदयात्रा
- महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांची २९ सप्टेंबर पासून दीक्षाभूमी ते सेवाग्राम पदयात्रा
- खा. शरद पवार आणि कॅाग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होणार सहभागी
- सामाजिक न्याय, शांतता आणि लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी पदयात्रा
- ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, अरविंद सावंत होणार सहभागी
- दोन ॲाक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंती निमित्त सेवाग्राम येथे पदयात्रेची समारोपीय सभा
LIVE Updates: जुगारावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तलवारीने हल्ला
जुगारावर कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तलवारीने हल्ला... तीन पोलीस कर्मचारी जखमी
- तलवार हल्ल्यात तीन पोलिस कर्मचारी जखमी
- जुगार चालू असल्याच्या माहितीवरून पोलीस गेले होते कारवाईसाठी
- कारवाईदरम्यान पोलीस कर्मचारी व आरोपींमध्ये झाली होती हातापायी
- अचानक झालेल्या तलवारीच्या हल्ल्यामुळे उडाली खळबळ
- घटनेची माहिती मिळताच राखीव पोलिस दल, स्थानिक पोलिस झाले घटनास्थळी दाखल
LIVE Updates: नागपूर जिल्हा वक्फ अधिकारी तौफीक अहमद निलंबित
जिल्हा वक्फ अधिकारी, नागपूर म्हणून कार्यरत असलेले श्री. तौफीक अहमद शफीक अहमद यांना महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी तसेच मंडळाची प्रतिमा अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
LIVE Updates: 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसात वाढ अपेक्षित
विविध भागांमध्ये पावसात वाढ आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावीत
दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील घाट परिसरात नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे
बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात किमान 5 ऑक्टोबर पर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही.
LIVE Updates: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल्ल लोढाच्या मालमत्तेवर ईडीची छापेमारी!
प्रफुल्ल लोढाच्या जळगाव, जामनेर व फत्तेपूर येथील मालमत्तेवर ईडीने छापेमारी करून तब्बल 10 ते 12 तास चौकशी केल्याची माहिती
छापेमारीत ईडीच्या पथकाने काही महत्त्वाचे दस्तावेज व कागदपत्रे ही तब्येत घेतल्याचीही माहिती
प्रफुल्ल लोढावर अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशन साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये हनीट्रॅप सह 2 अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे व पिंपरी चिंचवड मधील बावधन पोलीस स्टेशनमध्ये महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल
हनीट्रॅप व अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी प्रफुल्ल लोढाला केली होती अटक
मुंबई पोलिसांकडूनही प्रफुल्ल लोढाच्या मालमत्तेवर छापेमारी करून लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक डिवाइस व इतर काही दस्तावेज करण्यात आले होते जप्त