
Maharashtra Heavy Rainfall School Holidays: मुंबई, पुण्यासह राज्याभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या मुसळधार पावसाने मुंबईसह, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ठाणे, नवी मुंबईमधील शाळांना सुट्टी!
ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी/खाजगी प्राथमिक/माध्यमिक शाळा, जि.प. शाळा, न.पा. शाळा, अनुदानित/विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, महाविद्यालये, आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना , दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर 20 ऑगस्ट 2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Mumbai Rain LIVE Update: मुंबईत पावसाची हजेरी! प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
लोणावळ्यासह पुणे जिल्ह्यातील या शाळांना सुट्टी!
महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने 'रेड अलर्ट' जारी केला आहे. यामुळे लोणावळा शहर आणि आजूबाजूच्या परिसरातही मुसळधार पाऊस पडत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून, लोणावळा नगरपरिषदेने शहरातील सर्व माध्यमांच्या, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना बुधवारी, २० ऑगस्ट आणि गुरुवारी, २१ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर केली आहे. सोबतच पुणे जिल्ह्यातील भोर वेल्हा मुळशी मावळ जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
रायगड, सांगलीमध्येही शाळांना सुट्टी!
रायगडच्या पनवेल महानगर पालिका हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये, आश्रम शाळा, व्यवसाय आणि प्रशिक्षण केंद्रांना आज (20 ऑगस्ट) सु्ट्टी जाहीर करण्यात आली आहे.सांगलीमध्येही पावसाचा हाहाकार पाहायला मिळत असून मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यासह महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना 20 व 21 ऑगस्ट रोजी सुट्टी देण्यात आली आहे.
Mumbai Rains: मुंबईला अतिमुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट'; IMD च्या इशाऱ्याने धास्ती वाढली
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world