जाहिरात

Liquor Ban: मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! 'या' जिल्ह्यांमध्ये 4 दिवस दारुविक्री बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

दोन दिवसांवर आलेल्या या निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झालं आहे. अशातच नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदीचे आदेश दिले आहेत.

Liquor Ban: मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! 'या' जिल्ह्यांमध्ये 4 दिवस दारुविक्री बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Nashik Sale of liquor banned: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विधानपरिषदेसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे तर २२ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. दोन दिवसांवर आलेल्या या निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झालं आहे. अशातच नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदीचे आदेश दिले आहेत.

पवनराजे हत्याकांड निकाल पुन्हा लांबला! ओमराजेंच्या डोळ्यात पाणी, फाशीची मागणी करत म्हणाले...

नाशिक जिल्ह्यात मद्यविक्री बंद

नाशिक विधान परिषद निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यामध्ये चार दिवस मद्यविक्री बंदी लागू करण्यात आली असून, याबाबतचे अधिकृत आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

आज (१६ जून) दुपारी चार वाजेपासून मद्यविक्री बंदीच्या कालावधीची सुरुवात होणार आहे. ही बंदी १८ जून रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत लागू राहील. याव्यतिरिक्त, २२ जून रोजी मतमोजणीच्या दिवशीही संपूर्ण जिल्ह्यात सर्व प्रकारची मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ६२३ मतदारांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून, मतदानाची टक्केवारी आणि निष्पक्षता जपण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

दरम्यान, ​जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ५४ आणि ५८ अन्वये दोषींवर गुन्हे दाखल केले जातील. निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उत्पादन शुल्क विभागालाही विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Sanchita Ugale: 'टॉर्चर, छळ, डिप्रेशन', संचिता उगले मृत्यू प्रकरणात धक्कादायक वळण, वडिलांनी सगळ सांगितलं

सोलापूरातही मद्यविक्री बंद

दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातही दारुविक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील संबंधित भागांमध्ये चार दिवस दारूविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जारी केले आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com