
Maharashtra Rain School Holidays News: गेल्या 24 तासांपासून मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सोमवारी बरसलेल्या तुफान पावसाने मुंबईकरांची अक्षरश: दाणादाण उडाली. आजही मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर मुंबईसह अनेक जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
कोकण विभागातील शाळांना सुट्टी!
कोंकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांतील सर्व वरिष्ठ अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांना दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीरकेली आहे याबाबतचे परिपत्रक संचालक, उच्चशिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी जाहीर केले आहे. याआधी मुंबई महानगर क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
अकरावी प्रवेशाबाबत मोठा निर्णय!
तसेच राज्यात विविध ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अकरावीला प्रवेश घेणान्या विद्यार्थयाची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाने विद्यर्थयाना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश् घेण्याठी दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार 11 ते 20 ऑगस्टपर्यत असलेली मुदत 22 ऑगस्टपर्यत वाढविण्यात आली आहे.
या जिल्ह्यात सुट्टी जाहीर!
- मुंबई
- मुंबई उपनगर
- नवी मुंबई
- ठाणे
- कल्याण
- पालघर
- रायगड
- रत्नागिरी
आज कुठे कुठे रेड अलर्ट:
दरम्यान, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक (घाट), पुणे (घाट), सातारा (घाट) येथे पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंट अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world