जाहिरात
2 hours ago

Maharashtra Live Blog: राज्यामध्ये सध्या बीडमधील संतोष देखमुख हत्या प्रकरण आणि परभणी हिंसाचाराचे प्रकरण गाजत आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अशिवेशनातही यावरुनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले होते. आज काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे परभणी दौऱ्यावर आहेत. परभणी हिंसाचारावेळी अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाची त्यांनी भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. आरएसएसची विचारधारा संविधान संपविण्याची भूमिका यांची आहे. मुख्यमंत्री कुणाला वाचविण्याचे काम करत आहे? सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे!, अशी मागणी राहुल गांधीनी केली आहे. 

Live Update : मुंबईतील मानखुर्द भागात NIA ची मोठी कारवाई, एक दहशतवादी अटकेत

मुंबईतील मानखुर्द भागात NIA ची मोठी कारवाई

एनआयएने बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित एका दहशतवाद्याला अटक केली आहे 

जतिंदर सिंग नावाच्या दहशतवाद्याला एनआयएने आज मुंबईतील मानखुर्द परिसरातून अटक केली. 

 

एनआयएची टीम या दहशतवाद्याला मुंबईहून चंदीगडला घेऊन जात आहे.

चंदिगड न्यायालयात पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल

एनआयए पंजाब दहशतवादी कट प्रकरणाचा तपास करत होती, आज या प्रकरणाच्या तपासात जतिंदर सिंगला मुंबईतील मानखुर्द परिसरातून अटक करण्यात आली. 

जतिंदर सिंग हा दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांना शस्त्र पुरवायचा.

एनआयएच्या तपासात असेही समोर आले आहे की, जतिंदर सिंगने हे शस्त्र खासदार बलजीत सिंग उर्फ ​​राणाभाई याच्याकडून खरेदी केले होते.

Live Update : संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना 15 दिवस पुणे जिल्ह्यात बंदी करा, सचिन खरात यांची मागणी

भीमा कोरेगाव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना 15 दिवस पुणे जिल्ह्यात  बंदी करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याकडे केली आहे.

1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिक येत असतात. परंतु मध्यंतरी 2018 ला या परिसरामध्ये दंगल झाली होती आणि संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोघांवरही या प्रकरणात गुन्हे दाखल होते. त्यामुळे हा कार्यक्रम शांततेत होण्यासाठी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पंधरा दिवसाची पुणे जिल्हा बंदी करा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.

Live Update : सतीश वाघ हत्या प्रकरणातील फरार आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक

सतीश वाघ हत्या प्रकरणातील फरार आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक

मुख्य आरोपीला पुणे पोलिसानी केली अटक 

धाराशिव जिल्ह्यातील कळंबमधून मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

सतीश वाघ प्रकरणात एकून 5 आरोपी अटकेत

Live Update : म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ    

 

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 2264 सदनिकांच्या विक्रीकरिता जाहीर सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून 6 जानेवारी 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.         

Live Update : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन, वयाच्या 90 व्या वर्षी प्राणज्योत मालवली

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन, वयाच्या 90 व्या वर्षी प्राणज्योत मालवली

Live Update : तुला काम जमत नाही काम सोडून दे, अजित पवारांनी कंत्राटदाराला झापलं

तुला काम जमत नाही काम सोडून दे, बलिदानस्थळाच्या आराखडा कामाच्या कंत्राटदाराला अजित पवारांनी झापलं

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळाच्या विकास आराखडा कामाची पाहणी करत असताना अजित पवारांनी कंत्राटदाराला चांगलंच सुनावलं.  

छत्रपती संभाजी महाराज आमचे दैवत आहेत. बलिदान स्थळाच्या स्मारकाचा विकास आराखडा आम्ही मंजूर केलाय. तुला काम जमत नाही, तू काम सोडुन दे. दुसरा कंत्राटदार पाहतो अशा शब्दात अजित पवारांनी कंत्राटदाराला चांगलेच सुनावत काम सोडून द्यायला सांगितलं.  

Live Update : कल्याण न्यायालयात न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

कल्याण न्यायालयात न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

चप्पल भिरकावणाऱ्या किरण भरम विरोधात गुन्हा दाखल

महात्मा फुले पोलिसांनी सुरू केला तपास

Live Update : महाराष्ट्रातील सर्व विभागीय महसूल कार्यालये पासपोर्ट कार्यालयासारखी करणार

महाराष्ट्रातील सर्व विभागीय महसूल कार्यालये पासपोर्ट कार्यालयासारखी करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची नागपुरात घोषणा

Live Update : तर अशांच्या घरात घुसून आम्ही ही धुडगूस घालू - आमदार अमित गोरखे

भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी हिवाळी अधिवेशना दरम्यान मद्यपी पर्यटकांकडून गडकिल्ल्यांचं पावित्र्य भंग केल्या जात असल्याचे प्रकार वाढत असल्याचं सांगत या मुद्द्याकडे सभागृहाचं लक्ष वेधलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या नव वर्षाच्या स्वागतासाठी जर कुणी पर्यटक गड किल्ल्यांवर जाऊन पार्टी करत धुडगूस घालणार असाल तर अशांच्या घरात घुसून आम्ही ही धुडगूस घालू म्हणत गोरखे यांनी मद्यपी पर्यटकांना थेट इशाराच दिलाय

Live Update : सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे! - राहुल गांधी

सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. आरएसएसची विचारधारा संविधान संपविण्याची भूमिका यांची आहे. मुख्यमंत्री कुणाला वाचविण्याचे काम करत आहे? सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे!

Live Update : बदलापूरमध्ये यंदाही आगरी महोत्सव मोठ्या उत्साहात

बदलापूरमध्ये यंदाही आगरी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. 27, 28 आणि 29 डिसेंबर असे तीन दिवस कार्मेल शाळेशेजारील मैदानावर हा महोत्सव आयोजित करण्यात आलाय.

Live Update : देशाचे ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची मोठी घोषणा

देशाचे ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची मोठी घोषणा 

येत्या २५ जानेवारीला देशातल्या पहिल्या नदी जोड प्रकल्पाची मध्य प्रदेशात सुरुवात होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी कामाला सुरुवात करणार

Live Update : पूजा खेडकर सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता

पूजा खेडकर सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता

दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची सूत्रांची माहिती.

दिल्ली पोलीस कोणत्याही क्षणी पूजा खेडकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकते. 

अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी पूजा खेडकर सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती

Live Update : दिल्ली उच्च न्यायालयाचा पूजा खेडकर यांना मोठा झटका

दिल्ली उच्च न्यायालयाचा पूजा खेडकर यांना मोठा झटका 

पूजा खेडकर यांचा जामीन अर्ज फेटाळला

मागील काही दिवसांपासून पूजा खेडकर यांना कोर्टाने दिलासा दिला होता. 

युपीएससीने पोलिसांत दाखल केला होती तक्रार 

शिवाय युपीएससी कोर्टात याचिका केली होती

Live Update : राहुल गांधी परभणीत दाखल, सुर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेणार

राहुल गांधी परभणीत दाखल, सुर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेणार

Rahul Gandhi Maharashtra Visit: राहुल गांधी नांदेडमध्ये दाखल, परभणीकडे रवाना

काँग्रेसचे खासदार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नुकतेच राहुल गांधी यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले असून ते परभणीकडे रवाना झालेत. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत. 

Jalna News: जालन्यात 27 डिसेंबर रोजी काँग्रेसच्या निषेध मोर्चाचे आयोजन

जालन्यात 27 डिसेंबर रोजी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वकव्यायच्या निषेधार्थ जालन्यात 27 डिसेंबर 2024 रोजी काँग्रेस पक्षाकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील नूतन वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेस पक्ष निषेध करतो अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली. 

Chhagan Bhujbal Meet Devendra Fadnavis: नाराज छगन भुजबळ CM देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे नाराज आहेत. मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांनी अजित पवार यांच्यावर नाराजी दर्शवली आहे. अशातच आता ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Indepence Day 2025: यंदा कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ नाही, मोठ कारण समोर

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला  कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ नसेल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नसल्याची माहिती आहे. दरवर्षी विविध राज्यांना संधी दिले जाते. त्यामुळे महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर चित्ररथ तयार करण्यात आला होता. यंदा १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले.  गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, चंडीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि हरियाणा या राज्यांचा चित्ररथ दिसणार असून या यादीत महाराष्ट्राला तूर्तास स्थान मिळालेले नाही.

Shivshahi Bus Fire: मोठी दुर्घटना टळली! प्रवाशांनी भरलेल्या शिवशाही बसने घेतला पेट; कोणतीही जिवीतहानी नाही

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर धुळ्याहून शिरपुरच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसला आग लागून संपूर्ण शिवशाही बस जळून खाक झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास गोराणे फाट्याजवळ घडली. अचानक टायर फुटल्याने संपूर्ण बसने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील गोराणे फाट्याजवळ राज्य परिवहन महामंडळाची धुळ्याकडून शिरपूरकडे जाणारी विनावाहक शिवाशाही बसचा मागील टायर फुटल्याने संपूर्ण बसने पेट घेतला. चालक प्रदीप भरतसिंग पवार यांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने त्यांनी प्रसंग आवधान राखत तात्काळ सर्व बसमधील प्रवाश्यांना सुखरुप बाहेर काढले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत बसने पेट घेतली. घटनास्थळी जिंदाल पावर कंपनीची अग्निशमन वाहनाद्वारे आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती.

घटनेची माहिती मिळतच तात्काळ घटनास्थळी नरडाणा पोलिसांनी धाव घेत मदतकार्य केले. वेळीच चालकाने टायर फुटल्याने सर्व प्रवासींना बाहेर काढल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. यामुळे काही वेळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती, मात्र पोलिसांच्या मदतीने व स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक देखील सुरळीत करण्यात आली.

Nandurbar News: मोकाट कुत्र्यांचा हैदोस, ११ महिन्यांत ३०० पेक्षा अधिक जणांचे लचके तोडले

 नंदुरबार जिल्ह्यात डॉग बाइटच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांमध्ये जिल्ह्यात ३०० पेक्षा अधिक नागरिकांना कुत्रा चावल्यामुळे त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्याची नोंद आहे. या आकडेवारीनुसार रोज सरासरी १ जण डॉग बाइटचे शिकार होत आहेत. जिल्हाभरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या सुमारास नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला होण्याची भीती बळावली आहे. शहरातील अनेक रस्त्यावर कुत्र्यांचे झुंड दिसून येतात. रात्रीच्या वेळी एक नव्हे, तर अनेक कुत्रे वाहनावर धावून येतात. त्यामुळे वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Akola Accident: लग्नाच्या वऱ्हाडाची कार उलटली; एकाचा मृत्यू

अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात झाला आहे. हिवरखेड ते गोरधा दरम्यानच्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ लग्न आटोपून परतणाऱ्या लग्नाच्या मिरवणुकीची कार उलटल्याने भीषण अपघात झाला. कारमध्ये माटरगाव येथील एक कुटुंब आणि अन्य ५ जण प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान जखमीवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलीस ठाण्याचे अधिकारी गजानन राठोड यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना प्रथम तेल्हारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले व नंतर अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com