जाहिरात
2 days ago

बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असलेल्या वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असून सध्या त्याची सीआयडी चौकशी सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी होत आहे, त्यामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. 

बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात विभूती घेण्यासाठी चेंगराचेंगरी

भिवंडीत बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात विभूती घेण्यासाठी चेंगराचेंगरी झाली आहे. चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी हलक्या बळाचा वापर करून जमावाला पांगवण्याचा कसा प्रयत्न केला.

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसाचं बाळ चोरलं

नाशिकचा जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अवघ्या पाच दिवसाचं बाळ अज्ञातांनी चोरले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा रुग्णालयात तपासासाठी दाखल झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय आहे. 

Live Updates: संतोष देशमुख हत्या प्रकरणात घुले,सांगळे,सोनवणेला 14 दिवसांची पोलीस कोठडी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बीड पोलिसांनी घुले आणि सांगळेला पुण्यातून ताब्यात घेतले होते.

जम्मू कश्मीरमध्ये मोठा अपघात

जम्मू कश्मीरमध्ये मोठा अपघात झाला आहे. सैन्याचं वाहन बांदीपोरा इथं दरीत कोसळलं आहे. त्यात 4 जवान शहीद झाले आहेत. जखमींना श्रीनगरला हलवण्यात आलं आहे.   

Manoj Jarange Patil: सर्व आरोपी पुण्यातच कसे? धनंजय मुडेंना राज्यात फिरू देणार नाही: मनोज जरांगेंचा इशारा

धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात धमकी देण्यात आले. आता असे झालं तर धनंजय मुंडेला रस्त्यावर फिरू देणार नाही, हरामखोरला फिरू देणार नाही. त्रास झाला तर यांना घरात घुसू घुसून मारू,,,यांना एकदा आता बघायचं आहे. सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत. याचा अर्थ तुमचे नेते आरोपींना संभाळत आहे... फाशी होणारच आहे,,,चार्ज शीट कमी झालं आणि एकही आरोपी सुटला तर गोट्याने मारलं समजा, असे म्हणत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन सरकारला धारेवर धरले आहे. 

Suresh Dhas: आकाच्या आकांनाही आतमध्ये जावं लागेल... सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना टोला

* परभणी रगेल आहे, मी इथे 18 माहीने पालकमंत्री होतो.  ह्या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा कोम्बिंग ऑपेरेशनमध्ये मृत्यू झाला. विजय वाकोडे साहेब यांचा देखील मृत्यू झाला. म्हणून कोम्बिंग ऑपेरेशनची चौकशी झाली पाहिजे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री भेट देतील, आणि परभणीत देखील भेट देणार आहेत. अशोक घोरबंड ह्याची न्यायलीयन चौकशी झाली पाहिजे.

* विजय वाकोडे बाबा आम्हाला 100 टक्के सपोर्ट करायचे. आमचे बीड वाले जे मंडळी आहेत, ह्यांचं काय काय सांगावं.  आका, त्यांचे आका... काय काय सांगू?  हा आका आहे न हे तर आत गेलाच पाहिजे पण ह्याच्या आकाच्या आकाचं जर काही बाहेर आलं तर त्यांना ही आत जावं लागेल, असे म्हणत भाजप नेते सुरेश धस यांनी बीडमधील हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यासह अजित पवारांवरही निशाणा साधला. 

Santosh Deshmukh Murder Update: सरपंच संतोष देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्या तरुणाला अटक

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी त्यांचे लोकेशन देणारा मस्साजोग येथील सिद्धार्थ सोनवणे याच्या देखील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कल्याण येथून एका उसाच्या गाडीवर काम करत असताना मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आता पूर्णपणे उलगडा होण्यास मदत होणार आहे.

Parbhani Morcha: संतोष देशमुख हत्या प्रकरण! आरोपींच्या अटकेसाठी परभणीत मोर्चा

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी आज परभणीमध्ये सर्वधर्मीयांचा मोर्चा निघणार आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे, सुरेश धस यांच्यासह बीड- परभणीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यावेळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियानेही आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. 

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार, नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

अहिल्यानगर शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तीन माजी नगरसेवकांनी शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्याकडे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी नगर दक्षिण ची संपर्क पदाची जबाबदारी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर अहिल्यानगर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील अनेक नगरसेवक शिंदे गटात शिवसेनेमध्ये जाण्यासाठी इच्छुक होते काल त्यांच्या प्रवेशाला मुहर्त लागल... माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते ,नगरसेवक दत्ता जाधव, नगरसेवक प्रशांत गायकवाड, नगरसेवक दीपक खैरे या सर्व नगरसेवकांच्या प्रवेशाने अहिल्यानगर शहरातील शिंदे गट शिवसेनेची ताकद वाढली आहे.

शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व शहर प्रमुख सचिन शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला एक धक्का दिला असून... या सर्व नगरसेवकांच्या प्रवेशाने अहिल्यानगर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठे खिंडार पडल आहे... उरलेले शिवसैनिक येत्या काळात काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

Dharashiv News: धाराशिव परिसरातील हातलादेवी तलावात बुडून एकाचा मृत्यू;

धाराशिव शहरानजीक असलेल्या हातलादेवी तलावात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला असून यामुळे परिसरात खळबळ पसरली आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास धाराशिव बार्शी रोड वरून जाणाऱ्या काही नागरिकांना हातलादेवी तलावात काहीतरी तरंगत असल्याचे दिसून आले.

स्त्यापासून शंभर ते दीडशे फूट पाण्यामध्ये एका व्यक्तीचा फक्त चेहऱ्याचा भाग पाण्याच्या वरती तरंगत असल्याचे काही लोकांना दिसले.  प्रथमदर्शनी पाण्यात बुडून मृत्यू झालेला एक व्यक्ती पाण्यात तरंगत असल्याचे नागरिकांना दिसले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत..

Dharashiv News: धाराशिव परिसरातील हातलादेवी तलावात बुडून एकाचा मृत्यू;

धाराशिव शहरानजीक असलेल्या हातलादेवी तलावात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला असून यामुळे परिसरात खळबळ पसरली आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास धाराशिव बार्शी रोड वरून जाणाऱ्या काही नागरिकांना हातलादेवी तलावात काहीतरी तरंगत असल्याचे दिसून आले.

स्त्यापासून शंभर ते दीडशे फूट पाण्यामध्ये एका व्यक्तीचा फक्त चेहऱ्याचा भाग पाण्याच्या वरती तरंगत असल्याचे काही लोकांना दिसले.  प्रथमदर्शनी पाण्यात बुडून मृत्यू झालेला एक व्यक्ती पाण्यात तरंगत असल्याचे नागरिकांना दिसले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत..

Kalyan Crime: कल्याण अत्याचार प्रकरण: विशाल गवळी आणि पत्नीला 14 दिवसांची कोठडी

कल्याण ब्रेकिंग लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला आज पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केले यावेळी कोर्टाने दोघे आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. यादरम्यान तपास अधिकारी यांनी कोर्टासमोर  दोन महत्त्वाची माहिती दिली आहे.

 आरोपी विशाल गवळी यांनी त्याच्या मोबाईल फोन बुलढाणा येथील एका लॉज मॅनेजरला पाच हजार रुपये मध्ये विकला असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली आहे..  ज्या बॅगेत मृतदेह बापगाव परिसरात टाकले होते ती बॅग अजूनही सापडलेली नाही पोलिसांनी दिली कोर्टाला माहिती. पोलिसांनी तीन दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयाने दोन्ही आरोपींचे न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे

Ind Vs Aus: कांगारुंची दाणादाण, ऑस्ट्रेलियाचा डाव 181 धावांमध्ये गुंडाळला

भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये पाचवा कसोटी सामना सुरु आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांमध्ये गुंडाळला असून टीम इंडियाने चार धावांची आघाडी मिळवली आहे. 

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण: सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पडकल्याची माहिती

संतोष देशमुख हत्या प्रकरण: मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पोलिसांच्या ताब्यात- सूत्रांची माहिती  नेमकं कोणत्या आरोपींना पकडले हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन आरोपी वाढण्याची शक्यता, त्यापैकीही एकजण पकडल्या गेल्याची सूत्रांची माहिती.

Santosh Deshmukh Murder Update: संतोष देशमुख हत्या प्रकरण: SITकडून डॉक्टरसह चौघांची चौकशी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चौघांची कसून चौकशी केली. यामध्ये डॉ.संभाजी वायबसे व त्याच्या वकील पत्नीसह चौघांचा समावेश आहे. डॉक्टर वायबसे याने देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला घटनेच्या दिवशी संपर्क केल्याचा व पैसे पुरविल्याची चर्चा आहे. 

डॉक्टर वायबसे हे ऊसतोड कामगारांचे मुकादम म्हणून काम पाहतात व एखादा कामगार गायब झाल्यास ते सुदर्शन मुलीची मदत घेत असल्याचेही सांगण्यात आलेय.दरम्यान डॉक्टर दांपत्याला नांदेड येथून बीडमध्ये आणत ही चौकशी केली गेली तसेच इतर दोघांचीही चौकशी या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले सह कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे अद्यापही फरार आहेत.

Ulhasnagar News: उल्हासनगरच्या आशेळे गावातून बांग्लादेशी दाम्पत्याला अटक गुन्हे शाखेची कारवाई

उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे यांना गुप्त बातमीदारामार्फत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशेळे गाव मधील न्यू साईबाबा कॉलनी येथे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, पोलीस उप निरिक्षक प्रविण खोचरे, सचिन कुंभार, पोलीस कर्मचारी सुरेश जाधव, प्रकाश पाटील, रितेश वंजारी, संजय शेरमाळे, महिला पोलीस शिपाई मनोरमा सावळे यांच्या पोलीस पथकाने सापळा रचून मीना मुजिद खान आणि तिचा पती इमोन उर्फ मेहमूद खान असद खान या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना कायदेशीर कारवाईसाठी विठ्ठलवाडी पोलीसाना हस्तांतरित केले आहे.

Badlapur News: अनधिकृत बॅनर्समुळे बदलापूर शहराचं विद्रुपीकरण, चांद्रयान 2 च्या प्रतिकृतीला बॅनर्सचा विळखा

बदलापूर पूर्वेकडील कात्रप भागातल्या पेट्रोल पंप चौकात पालिकेनं चांद्रयान 2 ची प्रतिकृती साकारलीय. मात्र या प्रतिकृतीला राजकीय नेत्यांच्या बॅनर्सचा वेढा पडलाय. शहराच्या बहुतांश भागात अशी स्थिती पाहायला मिळतेय. एकीकडे चौक सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च केले जातायत. तर दुसरीकडे त्याच ठिकाणी नेत्यांचे बॅनर लागल्यामुळे शहराचं विद्रूपीकरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे या बॅनर्सच्या बाबतीत नगरपालिकेकडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतेय. न्यायालयानं अनेकदा अनधिकृत आणि होर्डिंग बाबत पालिका आणि महापालिकांना फटकारलंय. मात्र त्यातून काहीच बोध घेतला जात नसल्याचं चित्र बदलापुरात पाहायला मिळतंय.

Nandurbar News: जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 730 बाळांचा जन्म

21 व्या शतकातील रौप्य महोत्सवी वर्षाच्या पहिल्याच दिवशी नंदुरबार जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 730 बाळांनी जन्म घेतला आहे. जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढले असून, ते सरासरी 91.66 टक्के इतके आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व रुग्णालयांचा आढावा घेतला असता दिवसभरात एकूण 730 बाळांचा जन्म झाला आहे. त्यात जिल्हा रुग्णालयासह 13 ग्रामीण रुग्णालये, दोन उपजिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात एकूण 425 बाळांचा जन्म झाला आहे, तर जिल्ह्यातील ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीची सोय आहे अशा आरोग्य केंद्रांमध्ये दिवसभरात 305 बाळांनी जन्म घेतला आहे. या सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com