जाहिरात
2 hours ago

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस. गेल्या तीन दिवसांपासून हिवाळी अधिवेशनात बीड हत्या प्रकरण तसेच परभणी हिंसाचार प्रकरण गाजत असून विरोधक आक्रमक झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेतील भाषणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. याविरोधात काँग्रेसकडून देशभर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला उत्तर देताना भाजपानंही बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानासाठी आंदोलन सुरु केलं आहे. भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर आंदोलन करत असताना भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस भवनाच्या बाहेर राडा घातला. 

Live Update : संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर निदर्शनं करण्यास बंदी, सर्व खासदारांना सूचना

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा मोठा निर्णय

संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर निदर्शनं करण्यास बंदी, सर्व खासदारांना सूचना 

कोणतीही अडवणूक किंवा निदर्शनं न करण्याची सक्ती घालण्यात आली आहे.

Live Update : मुंबई बोट दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा 14 वर

मुंबई बोट दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा 14 वर 

 अजूनही शोध मोहीम सुरू आहे. आता सापडलेल्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही

Live Update : मुंबईच्या वांद्रे-वरळी सिलिंकवर वाहतुकीची मोठी कोंडी

मुंबईच्या वांद्रे-वरळी सिलिंकवर वाहतुकीची मोठी कोंडी 

गायक दलजीत याचा महालक्ष्मी रेस कोर्स येथे कार्यक्रम आहे 

त्यामुळे दक्षिण मुंबईकडे जाणारी मार्गिकेवर मोठी गर्दी झाली आहे

Live Update : धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल

धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल

Live Update : महान तबलावादक झाकीर हुसैन यांच्यावर आज अंत्यसंस्कार

महान तबलावादक झाकीर हुसैन यांच्यावर आज अंत्यसंस्कार होतील. अमेरिकीत सन फ्रँसिस्को शहरात ते सुपूर्द-एक- खाक होतील, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. हुसैन यांचे दीर्घ आजारानं 15 डिसेंबर रोजी निधन झाले होते.

Live Update : विराट-अनुष्का लंडनला शिफ्ट होणार?

विराट-अनुष्का लंडनमध्ये स्थाईक होणार असल्याचं विराटच्या कोचची माहिती, मात्र अद्यापही विरुष्काच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा 

Live Update : पुण्यातील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' पुन: नामकरण

पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, असं पुन्हा नामकरण करण्याबाबत शासकीय ठराव विधानपरिषदेत मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडला.

या ठरावाच्या माध्यमातून महाराष्ट्र विधान परिषद नियम 106 अनुसार लोहगाव विमानतळ, पुणे येथील विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुन्हा नामकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

Live Update : संसदेच्या बाहेरील भाजप नेत्याला धक्काबुक्की प्रकरणात राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

संसदेच्या बाहेर भाजप नेत्याला धक्काबुक्की प्रकरणात राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल...

कोणत्या कलमांखाली केली तक्रार...

-कलम 109- हत्येचा प्रयत्न

-कलम 115- जाणून बुजून दुखापत करणे

-कलम 117- जाणून बुजून गंभीर दुखापत करणे

-कलम 121- सरकारी कर्मचाऱ्याला दुखापत करणे

-कलम 351- गुन्हेगारी धमकी

-कलम 125- इतरांची सुरक्षा धोक्यात आणणे

Live Update : बीड प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार कणखर भूमिका

बीड प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार कणखर भूमिका 

बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्यात आली आहे.  

उद्या मुख्यमंत्री या विषयावर उत्तर देणार आहेत 

सीआयडी आयजी लेव्हल अधिकारी माध्यमातून चौकशी होण्याची शक्यता

Live Update : आझाद मैदानात पुन्हा राडा, भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने

आझाद मैदानात पुन्हा राडा, भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने

Live Update : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 : टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही, ICC कडून अधिकृत शिक्कामोर्तब

पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलनं (ICC) यावर शिक्कामोर्तब केलं आहे. या स्पर्धेतील भारताचे सामने त्रयस्थ ठिकाणी होतील. तर उर्वरित स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळली जाईल. 19 फेब्रुवारी 2025 पासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या आठ देशांच्या टीम सहभागी होणार आहेत.

Live Update : भिवंडीत उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

भिवंडी तालुक्यातील वडूनवघर गावातील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. वडूनवघर येथील उद्धवसेनेचे विभागप्रमुख प्रकाश पांडुरंग पाटील यांच्यासह 25 ते 30 कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाप्रसंगी भाजपाच्या वडुनवघर अध्यक्षपदी अमृत मढवी यांची निवड करण्यात आली.

Live Update : नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचं जेवण

नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचं जेवण, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामींनी दाखवली परिस्थिती

आमदार निवासात मिळत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या जेवणासंबंधी विधानसभा अध्यक्षांकडे प्रवीण स्वामी यांची लेखी तक्रार

 मागील चार दिवसांपासून आमदार निवासातील जेवणाबाबत अनेक तक्रारी आल्या समोर

Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेली कविता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेली कविता

महाराष्ट्र आता थांबणार नाही...

सोबत राहू एकदिलाने, 

घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, 

समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही,

महाराष्ट्र आता थांबणार नाही...

उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात

बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ

तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही,

महाराष्ट्र आता थांबणार नाही...

रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, 

सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे,

गतीला स्थगिती मिळणार नाही,

महाराष्ट्र आता थांबणार नाही...

विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल

मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल

मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही,

महाराष्ट्र आता थांबणार नाही...

जलयुक्त शिवार देईल नवजीवन,

नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन

राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही

महाराष्ट्र आता थांबणार नाही...

पाणंद रस्त्यांनी जोडू शेतशिवार

आनंदाचा शिधा देईल आधार उपाशी

पोटी कुणी झोपणार नाही, 

महाराष्ट्र आता थांबणार नाही...

लाडक्या बहिणींना मिळाला

स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत

प्रवासातून सन्मान लाडक्या लेकी

कधी दुःखी होणार नाही

महाराष्ट्र आता थांबणार नाही...

असेल विरोधकांचे कमी संख्याबळ,

सारे टिकवून ठेऊ लोकशाहीचे बळ

आमदाराचा मानसन्मान घटणार नाही 

महाराष्ट्र आता थांबणार नाही...

मुंबईतील काँग्रेस भवनाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा राडा

भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेस कार्यलयातील काचा फोडल्या. खुर्च्यांची तोडफोड केली. त्याचबरोबर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह अन्य काँग्रेस नेत्यांच्या पोस्टरवर शाईफेक केली. 

मुंबईतील काँग्रेस भवनाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा राडा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेतील भाषणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. याविरोधात काँग्रेसकडून देशभर आंदोलन सुरु आहे.

या आंदोलनाला उत्तर देताना भाजपानंही बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानासाठी आंदोलन सुरु केलं आहे. भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर आंदोलन करत असताना हा प्रकार घडला.

Live Update : मुंबईतील काँग्रेस भवनाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा राडा

मुंबईतील काँग्रेस भवनाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरु होतं. या आंदोलनाच्या दरम्यान भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस भवनाची तोडफोड करण्यात आली. 

यावेळी या कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. 

Live Update : कुर्ला बेस्ट बस अपघातात मृतांचा आकडा वाढला, उपचारादरम्यान 22 वर्षीय तरुण दगावला; 9 जणांचा मृत्यू

कुर्ला बस अपघातात उपचार सुरू असलेल्या तरुणाचा मृत्यू, मृतांचा आकडा 9 पर्यंत पोहोचला आहे. कुर्ला बेस्ट बस अपघातात 22 वर्षीय मेहताब शेख  जखमी झाले होते. आज शीव रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. 

Live Update : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, गोवा निर्मित 23 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केलीय...राज्यात विक्रीसाठी बंदी असलेली दारू अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातून ही दारू जप्त करण्यात आली असून यामध्ये वोडका, व्हिस्की, रम अशा तीन प्रकारची असून  23 लाख 37 हजार रुपयांचे  288 बॉक्स जप्त करण्यात आली आहेत.

Live Update : अमित शाहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा हिंगोलीत निषेध..

अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत संसदेमधील केलेल्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध नोंदवला जात आहे. हिंगोलीतसुद्धा रिपब्लिकन सेनेच्या वतीने अमित शहा यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. येथे अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात येत आहेत. 

Live Update : मंत्री संजय राठोड यांना वाशिमचे पालकमंत्री पद नको, वाशिममध्ये शिंदे सेनेकडूनच विरोध

मंत्री संजय राठोड यांना वाशिमचे पालकमंत्री पद नको, वाशिममध्ये शिंदे सेनेकडूनच विरोध

संजय राठोड विरुद्ध घोषणाबाजी...

संजय राठोड यांच्या विरुद्ध वाशिममध्ये शिंदे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक...

वाशिमच्या पाटणी चौकात शिवसेनेच्या वतीने निदर्शने....

भावना गवळी यांचा मंत्रिमंडळात समावेश करा...

Live Update : वसई विरार महापालिकेच्या पेल्हार प्रभाग समिती कार्यालयाच्या इमारतीला आग

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या पेल्हार प्रभाग समिती कार्यालयाच्या एका इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत कार्यालयातील बांधकाम आणि पाणीपुरवठा, तसेच आरोग्य विभागाचे महत्त्वाचे दस्तावेज, रेकॉर्ड जळून खाक झाले आहे.  पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती.  प्रथम दर्शनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता महापालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. 

Live Update : गेली पाच वर्ष महाराष्ट्रासाठी संक्रमणाची होती - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात आम्ही पहिल्यांदा पाहिलं कुणीतरी येतात आणि व्होट जिहादचा नारा देतात. 17 मागण्या तुम्हाला देतात आणि तुमचं तोंड उघड नाही? 

गेली पाच वर्ष महाराष्ट्रासाठी संक्रमणाची होती. आरोप प्रत्यारोप करण्यात आले. असा अनुभव कुणीच घेतला नाही. व्यक्तीगत मला आणि माझ्या कुटुंबाला टार्गेट करण्यात आलं. त्यामुळेच मला महाराष्ट्राच्या जनतेची सहानुभूती मिळाली.

-देवेंद्र फडणवीस

Live Update : हेच फेक नरेटिव्ह उद्धवस्त करायला मी आलोय - देवेंद्र फडणवीस

अतिरिक्त मतं आली कुठून विचारलं गेलं. त्याचं उत्तर निवडणूक आयोगानं दिलं. पण तरीही फेक नरेटिव्ह सुरू आहे. हेच फेक नरेटिव्ह उद्धवस्त करायला मी आलोय. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

Live Update : मी आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह भेदतो - देवेंद्र फडणवीस

मी आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह भेदतो. ते भेदून या जागेवर मी उभा आहे. जी आश्वासनं आम्ही दिली ती पूर्ण करणार. कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही. लाडक्या बहिणींचे पैसेही वेळेवर जमा करणार.

Sharad Pawar News: साहित्य संमेलनासाठी PM मोदींसह, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण: शरद पवार

21, 22 आणि 23 फेब्रुवारीला 98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे. ७१ वर्षांपूर्वी दिल्लीत अधिवेशन झाले होते. तेंव्हा जवाहरलाल नेहरू यांनी उद्घाटन केले.  यावेळेस अध्यक्ष तारा भारावकर आहेत.  इथे छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असं कॅम्पसचं नामकरण केलं जाईल. 

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण पाठवले आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण पाठवले जाईल. दोन सभागृहांचे नाव बाबासाहेब आंबेडकर दिले जाईल. या साहित्य संमेलनाला ५ हजार लोक उपस्थित राहतील. तर 2500 लोकं महाराष्ट्रातून येतील.  21 तारखेला ग्रंथ दिंडी निघेल.

पंतप्रधान मोदींचे कार्यक्रमाला येणार असतील तर तो कार्यक्रम विज्ञान भवनात घेण्यात येणार आहे. परंतु हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल .पंतप्रधान मोदींची येण्याची इच्छा आहे. त्यांच्या कार्यालयाकडून वेळ विचारला गेला आहे. याचा अर्थ पंतप्रधान येण्यास इच्छुक आहेत. तसेच पाकिस्तानमधून मराठी भाषिकांनी येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर आम्हाला केंद्र सरकारकडून परवानगी हवी आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली. 

Ajit Pawar: गिरीश आता तरी सुधर... अजित पवारांचा भाजपच्या संकटमोचकांना इशारा

बदल जाओ वक्त के साथ या वक्त बदलना सिको। मजबुरियो को मत कोसो। हर हाल में चलना सिको.. या विधानसभेचे वैशिष्ट्य पाहील तर अनेक तरुण आमदार निवडून आले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष देखील तरुण आहेत तर परिषदेत देखील तरुण सभापती बसवले आहेत. मागाशी मुख्यमंत्र्यांनी आपल वेळ सांगितल मात्र आपण अजूनही चाळीशीत आहात असच वाटत.


गिरीश आता तरी सुधार आता तरी सुधार… कट होता होता आत्ता तू वाचला आहेस. मधल्या काळात राम शिंदे सर तुम्ही म्हणालात अजित पवारांनी माझा इथ सभा घेतली नाही. माझ्यामुळे पराभव झाला अस आपण बोललात. मात्र जे झालं ते चांगल झालं आपण सभापती झालात. कदाचित आपण निवडून आला असता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात तुम्हाला कैबिनेट मंत्रिपद द्याव वाटलं असतं तर गिरीशच मंत्रिपद गेलं असतं, असे म्हणत अजित पवार यांनी विधानसभेत फटकेबाजी केली. 

Ranjitsinh Mohite Patil: रणजितसिंह मोहिते पाटलांना धक्का, कर्ज वाटप घोटाळा प्रकरणात नोटीस

सोलापूर जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपातील गैरव्यवहार प्रकरणी भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. जिल्ह्या मध्यवर्ती बँकेच्या कार्यकाळाती चौकशी अहवालावरून मोहिते पाटलांना नोटीस पाठवण्यात आली असून डीसीसी बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणानंतर, इतर सहकारी संस्थांवर संचालक पद कसे ठेवावे? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे मोहिते पाटलांचे चेअरमपदही धोक्यात आले आहे. 

Ram Shinde Sabhapati: विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदेंची एकमताने निवड

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची एकमताने निवड झाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्यानंतर यावर एकमताने शिक्कामोर्तब झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदेंच्या कामाचे कौतुक केले. 

राम शिंदे सर आहेत त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे. मला विश्वास आहे आपण अतिशय शिस्तीने आणि संवेदनशीलतेने आपण कार्यभार चालवाल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित त्यांच्या कुटुंबातील ९ व्या पिढीतील व्यक्ती सभागृहात खुर्चीवर बसत आहे. एकप्रकारे त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे, असं CM फडणवीस म्हणाले.


MVA Protest Nagpur: अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात विरोधक आक्रमक; मविआचे विधान भवनात आंदोलन

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन नवा वाद उभा राहिला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख केल्याने महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, ज्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. नागपूरच्या संविधान चौकामध्ये मविआच्या नेत्यांनी अमित शहांविरोधात आंदोलन केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी आज नागपूर येथील संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालून व अभिवादन करून महाविकास आघाडीच्या आमदारांनी  आक्रमकपणे आंदोलनाला सुरुवात केली. हातात बाबासाहेबांचे फोटो घेऊन व घोषणा देत सर्व आमदारांनी संविधान चौकापासून पायी विधानभवनात प्रवेश केला.

 धिक्कार असो धिक्कार असो, मोदी शहांचा धिक्कार असो.  बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,  आंबेडकर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. नागपूरच्या संविधा चौकात सुरु झालेले हे आंदोलन विधान भवनावर धडकले असून निळ्या टोप्या घालून घोषणा देत्त महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनात प्रवेश केला. 

दुसरीकडे,  डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे संसदेतही आंदोलन पाहायला मिळाले. विरोधी पक्षांनी निळे कपडे घालून आंदोलन केले. यावेळी राहुल गांधींनी निळा टी शर्ट घालून  आदोलनात सहभागी झाले होते. 

Solapur Farmer Protest: सोलापुरात शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन, महामार्ग रोखला

मार्केट यार्डात कांदा घेऊन आलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे.  अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ माथाडी कामगारांनी रात्रीपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.  त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा लिलावासाठी उतरवला न गेल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.  कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे - हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला असून रस्त्यावर काटेरी झुडपे टाकत रास्ता रोको केला  आहे.  जोपर्यंत लिलाव सुरू होणार नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरूच राहील असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. 

Winter Session Live: बीड- परभणीच्या घटनांवरुन अधिवेशनात घमासान, विरोधक आक्रमक

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून बीडमधील हत्या प्रकरणावरुन पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले आहेत. या घटनेची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी परभणीमधील घटनेवरुन सखोल चौकशीची मागणी केली आहे. 

Chhagan Bhujbal: घराणेशाहीमुळे अन् बंडखोरी; म्हणून छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट?

- घराणेशाही आणि पुतण्याच्या बंडामुळे छगन भुजबळांना महायुतीने मंत्रीपदात स्थान दिले नसल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते  छगन भुजबळ स्वतः येवला मतदारसंघातून आमदार आहेत. दुसरीकडे राज्यपाल नियुक्त आमदाराच्या यादीत पुत्र पंकज भुजबळचा समावेश आहे.

त्यानंतरही  राष्ट्रवादीतून बंडखोरी करत नांदगाव मतदारसंघातून पुतण्या समीर भुजबळने अपक्ष उमेदवारी दाखल केली होती.   समीर भुजबळांच्या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर पसरला होता.  आमदार सुहास कांदेंचीही अडचण झाली होती. त्यामुळेच छगन भुजबळांचा पत्ता कट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Onion Price: केंद्राकडे कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी करावी; दादाजी भुसेंची CM फडणवीसांना विनंती

 नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. कांदा हे येथील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे. मात्र, कांद्यावरील निर्यात शुल्कामुळे कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. तरी आपण केंद्र सरकारकडे शिफारस करून कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी विनंती मा. ना. दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. नागपूर येथे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची भेट घेऊन त्यांनी कांदा उत्पादकांची व्यथा मांडली. 

 नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांचे जीवनमान हे कांद्याच्या शेतीवर अवलंबून असून केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 20% निर्यात शुल्क लावल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण आला आहे.

तसेच या शुल्कामुळे परदेशी बाजारपेठांमध्येही कांद्याची मागणी कमी होत आहे आणि निर्यातदारांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, स्थानिक बाजारात कांद्याच्या किमतीत मोठी घसरण होत असून साध्या स्थानिक बाजारपेठांमध्ये कांद्याचा दर हा 1000 ते 2000 रुपयांपर्यंत खाली आला आहे. यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा सुटत नाही.

तरी शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्यात यावे. ज्यामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. आपण केंद्र सरकारकडे विनंती करून कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क रद्द करण्यासाठी शिफारस करावी अशी विनंती दादा भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

Live Updates: भाजप- सेना आमदार घेणार हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस. आज सकाळी भाजप आणि शिवसेना आमदार रेशिमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात भेट देतील. आजच्या भेटीत भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना आणि आमदारांना जे बौद्धिक दिले जाईल त्यात या मुद्द्यांचा देखील समावेश असेल. हे संघाचे शताब्दी वर्ष असून या वर्षात पंच परिवर्तन कार्यक्रमद्वारे राष्ट्रीय पुनर्निर्माण अभियान कार्यक्रम सरसंघचालकांनी दिला आहे. त्याचा या बौद्धिक उद्बोधन मध्ये उल्लेख होणे स्वाभाविक आहे. 

सामाजिक समरसता : समाजातील विभिन्न वर्गातील सौहार्द आणि प्रेम वाढविण्यासाठी उपाययोजना

कुटुंब प्रबोधन : परिवार हे राष्ट्र पुनर्निर्माण करिता महत्वपूर्ण भूमिका असणारे एकक असून त्याकरिता प्रत्येक परिवाराने कार्य प्रवण होणे.

पर्यावरण संरक्षण : पृथ्वीहीच आपली सर्वांची माता याचे भान ठेवून पर्यावरण संरक्षण करिता आपल्या जीवनशैली मध्ये प्रयत्नपूर्वक बदल घडवून आणणे।

स्वदेशी आणि आत्मनिर्भरता : देशाची स्वदेशी अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भरता वाढावी या कडे लक्ष।

नागरिक कर्तव्य : प्रत्येक नागरिक आपल्या सामाजिक दायित्व निर्वहन करून त्याद्वारे राष्ट्रहित साधण्यात योगदान देईल.

एकता:  निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे हे घोषवाक्य किंवा हा संदेश संघ वर्तुळातून पुढे आला. त्यानुसार, त्यास कायम राखत समाजातील एकजूट कायम राखणे, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे इत्यादी मुद्दे चर्चेत येणे साहजिक आहे. 

प्राथमिकता कशाला:  आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षे पेक्षा देश हित अधिक महत्त्वाचे हे समजून त्यानुसार कार्य करणे.

Jalgaon Fire: पाचोऱ्यातील कृषी केंद्राला भीषण आग

 जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे नगरपालिकेसमोर असलेल्या कॉम्प्लेक्समधील कृषी केंद्राला भीषण आग लागल्याची घटना घडली असून अवघ्या काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केल्याने कृषी केंद्राच्या बाजूला असलेल्या दोन दुकानांचेही या आगीमुळे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी मात्र कृषी केंद्रातील बियाणे कीटकनाशके जळून लाखोंची नुकसान झाले आहे. दरम्यान अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Dharashiv Kailas Patil News: शेतकऱ्यांना दमदाटी करणाऱ्या पवनचक्की कंपनीवर सरकारने कारवाई करावी: आमदार कैलास पाटील यांची मागणी

धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांपासून पवनचक्की उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. त्यासाठी आवश्यक जमिनी घेताना कंपनीच्या लोकांकडून दहशत निर्माण करून शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचे प्रकार वाढले आहेत. मागच्याच आठवड्यात तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई गावात काळ्या रंगाच्या दहा ते बारा गाड्या आल्या. त्यातून मोठया संख्येनं बाऊन्सर उतरले व त्यांनी शेतकऱ्यांना दमदाटी केल्याचं समोर आलं आहे.  याप्रकरणी पोलीस बघ्याची भूमिका घेत राहिले. अश्यावेळी पोलीस तक्रारीची वाट पाहतात, अनेक प्रकरणात पोलीस स्वतः हुन कारवाई करतात त्याप्रमाणे या प्रकरणी देखील कारवाई अपेक्षित आहे.  शेतकऱ्यांना दमदाटी करणाऱ्यांची दहशत मोडून काढणे आवश्यक आहे, म्हणून पोलीस व गुंडागर्दी करणाऱ्या बाऊन्सरवर कायदेशीर कारवाई करावी अशी औचिताच्या मुद्द्यामध्ये आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सभागृहात मागणी केली..

Maharashtra Winter Session: बीड, परभणीवर मुख्यमंत्री काय बोलणार?

विधिमंडळाचा आजचा दिवस परत एकदा बीड आणि परभणी मधील घटनांवरून गाजणार आहे विधानसभेचे विशेष बैठक सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे यात बीड आणि परभणी मधील झालेल्या घटनांच्या संदर्भात सत्ताधारी आणि विरोधक आमदार भूमिका मांडणार आहेत तसेच राज्यपाल अभिभाषनावर देखील काही प्रमुख नेत्यांची भाषण होणार असून या सर्वांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देतील फडणवीस बीड मधील घटना आणि परभणी मधील घटनांबाबत काही महत्त्वाची कारवाईची घोषणा करतात का याकडे लक्ष आहे. दुसरीकडे विधान परिषदेमध्ये बिनविरोध सभापती पदावर भाजपाचे राम शिंदे यांची निवड अधिकृत रित्या जाहीर होणार आहे. गेले तीन दिवस नाराज असलेले छगन भुजबळ अजित पवारांवर जोरदार टीका करत आहेत. अद्यापही अजित पवारांनी याबाबत कोणतीही प्रत्युत्तर दिलेले नाही अजित पवार भुजबळांच्या टीकेवर काही प्रत्युत्तर देतायेत काय हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे

Nandurbar News: नंदुरबार शहरात पालिका प्रशासनाच्या वतीने ३७५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

 राज्यात एकल प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही नंदुरबार पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्यांच्या वापर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने ही बाब लक्षात घेता नंदुरबार पालिकेने कारवाईची मोहीम राबविली आहे. आठवडाभरात झालेल्या कारवाईमध्ये ३७५ किलो एकल वापर प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची एकूण किंमत १० हजार रुपये आहे. या आठवड्यात देखील अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार आहे. त्यासाठी पथक स्थापन करण्यात आली असल्याची माहितीही पालिका मुख्याधिकारी यांनी दिली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com