गेल्या एक आठवड्यापासून सुरु असलेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजले. . आज विधिमंडळामध्ये विधानसभेत विदर्भ मराठवाड्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर अंतिम आठवडा मांडण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. शिवाय मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची शरद पवारांप्रमाणेच अजित पवारांनीही भेट घेतली. अजित पवारांसमोर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान आज उशिरा राज्यमंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेवाटप होण्याची दाट शक्यता आहे.
पंकजा मुंडेंच्या पदरात कोणतं खातं?
गिरीश महाजन जलसंपदा
गणेश नाईक वन
गुलाबराव पाटील पाणी पुरवठा आणि स्वच्छता
दादाजी भूसे शालेय शिक्षण
संजय राठोड मृदू संधारण
धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा
मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास
उदय सामंत उद्योग, मराठी भाषा
जयकुमार रावल राजशिष्ठाचार
पंकजा मुंडे पर्यावरण पशू संवर्धन
कोणाला कोणते खाते पाहा यादी
देवेंद्र फडणवीस गृह
एकनाथ शिंदे नगरविकास, गृहनिर्माण
अजित पवार अर्थ
चंद्रशेखर बावनकुळे महसूल
राधाकृष्ण विखे जलसंपदा
हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण
चंद्रकात पाटील उच्चतंत्र शिक्षण
महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर, फडणवीसांकडे गृहखाते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपल्याकडे गृहखातं ठेवलं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं देण्यात आलं आहे. अजित पवारांकडे अर्थ खातं कायम ठेवण्यात आलं आहे.
अजित पवारांनी परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
मस्साजोगनंतर अजित पवारांनी परभणीत जावून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्या आधी ते मस्साजोग इथं जावून संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती कळविण्यात आली आहे. 21 फेब्रुवारीला दिल्लीत हे साहित्य संमेलन होणार आहे.
धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, मस्साजोगमध्ये जोरदार घोषणाबाजी
मस्साजोगमध्ये अजित पवारांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर ते परतत होते.त्याच वेळी गावातील लोकांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी लोकांनी केली.
अजित पवार नाराज नाहीत - देवेंद्र फडणवीस
राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुपारीच माझी परवानगी घेऊन बीड आणि परभणीतील घटनांमधील पीडितांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. अन्यथा अजितदादा नाराज अशी बातमी कुठेही लावू नये- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
काही लोकांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी आमदारकीचा राजीनामा देऊ असं म्हंटलं होतं. फक्त आमदारकी वाचवण्यासाठी पर्यटन म्हणून काही लोकं येऊन जातात. त्यांनी हे अधिवेशन विनोदी आहे असं सांगणं हाच मोठा विनोद आहे. असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी असे वक्तव्य करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
कल्याण मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी शुक्ला पती पत्नीला सहा दिवसांची पोलीस कोठडी
कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्या प्रकरणी, अखिलेश शुक्ला आणि त्यांची पत्नी गीता शुक्ला यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्यांच्या बरोबर अन्य चार आरोपींनाही पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या सर्वांना आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
Live Updates: कल्याण मराठी कुटुंब मारहाण प्रकरण: अखिलेश शुक्लाच्या पत्नीला अटक
कल्याण मराठी कुटुंब मारहाण प्रकरण: अखिलेश शुक्ला याची पत्नी गीता शुक्लाला अटक करत खडकपाडा पोलीस कल्याण न्यायालयाच्या दिशेने रवाना, थोड्याच वेळात अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या पत्नी गीता शुक्ला , सुमित जाधव, दर्शन बोराडे , पार्थ जाधव आणि विवेक जाधव अशा सहा आरोपींना कल्याण न्यायालयात करणार हजर
Rahul Gandhi At Parbhani: राहुल गांधी परभणीला येणार; सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेणार
परभणी इथे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी भेट देणार आहेत. उद्या 22 तारखेला राहुल गांधी परभणीला जातील. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत विजय वडेट्टीवार देखील परभणीमध्ये उपस्थित असतील.
Baramati Crime: बारामती हत्या प्रकरण: 12 तासात आरोपी गजाआड
बारामतीत कोयत्याने वार करून एकाचा खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी बारामती शहर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत बारा तासाच्या आत तीन आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपींनी हा खून नशेच्या आदिन जाऊन केला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी शहरातील सुज्ञ पालकांनी आपली मुले काय करतात तसेच त्यांच्या सोशल मीडियाकडे लक्ष दिले पाहिजे जेणेकरून अशा घटना होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल असं आवाहन देखील बिरादार यांनी बारामतीकरांनी केले आहे.
'मारहाण करुन माझ्या मुलाचा जीव घेतला'
सोमनाथ सूर्यवंशीचा मारहाण करुन जीव घेतला, असा आरोप सोमनाथच्या आईंनी केला. शरद पवार यांनी सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी सोमनाथच्या आईने हा आरोप केला.
शरद पवार परभणीत दाखल
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची घेतली भेट. शरद पवारांसोबत माजी मंत्री राजेश टोपे, तसंच बीडचे खासदार बजरंग सोनावणे उपस्थित होते. सोमनाथला मारहाण झाल्याचा पोलिसांचा दावा.
Sharad Pawar Beed Meeting: सुत्रधार शोधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही: शरद पवार
जे काही घडलं ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, सर्व सामान्यांना एक प्रकारचा धक्का बसला आहे. बीड जिल्हा अनेक वर्षांपासून वारकरी सांप्रदाय आहे. वारकरी सांप्रदायाचा विचार घेऊन आयुष्य जगणारा, महाराष्ट्राच्या साखर उद्योगासाठी कष्ट करणारा म्हणून बीडचा उल्लेख होतो. अशा जिल्ह्यामध्ये जे घडलं ते कोणाला न पटणारं आहे, असे म्हणत या प्रकरणाच्या खोलात गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं शरद पवार म्हणालेत.
Beed NEW SP: नवनीत काँवत बीडचे नवे एसपी; संतोष देशमुख हत्येनंतर मोठा निर्णय
बीडचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत क्वावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपायुक्त होते. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेच्या प्रकरणानंतर अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली केली होती. त्यानंतर आता नव्या एसपींची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.
Sharad Pawar Visit Beed: शरद पवार मस्साजोगमध्ये दाखल, संतोष देखमुखांच्या घरी भेट
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे देशमुख कुटुंबांची भेट घेण्यासाठी मस्साजोग मध्ये हेलिकॉप्टरने दाखल झाले आहेत.पवारांच्या या दौऱ्यात देशमुख कुटुंबियांसाठी साधारण एक तास इतका वेळ राखीव ठेवल्याचे दिसून येत आहे.देशमुख हत्या प्रकरणातील सात आरोपी पैकी चार आरोपी अटक करण्यात आले आहेत तर यातील तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.आता पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे.दरम्यान मस्साजोग येथे मोठा पोलील बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Sangli Accident: डंपरने चिरडले, 2 वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू; परिसरात हळहळ
सांगलीच्या कुपवाड परीसरातील आहिल्यानगर मधून माधवनगरला जाणाऱ्या रोडवर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मनोज ओंकार ऐवळे हा दोन वर्षांचा चिमुरडा डंपर खाली येऊन जागीच ठार झाला.. घटना घडल्यानंतर डंपर चालकाने पलायन केले आहे. तर संतप्त जमावाने डंपर फोडला आहे.
घटनास्थळी कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी येऊन पंचनामा करून डंपर ताब्यात घेऊन व चालकाला शोधण्यासाठी पोलिस पथके रवाना केले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर सांगितले. स्थानिक नागरिकांनी म्हणाले की सदर रस्ता अरुंद असल्याने हि घटना घडली आहे. तरी प्रशासनाने सदर रस्त्यावरील जड वाहतूक बंद करावी अन्यथा वेगळा विचार करावा लागेल असे बोलताना सांगितले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Onion Market News: येवला बाजार समितीत कांदा लिलाव बंद, शेतकरी आक्रमक
नाशिकच्या येवला बाजार समितीत छावा शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पडले. मनमाड-येवला मार्गावर रास्ता रोको सुरु केला आहे. कांद्यावर 20 टक्के शुल्क रद्द करावे, शेतकऱ्यांना 25 रुपये किलो अनुदान मिळावे. नाफेड व एन एफ सी सी ने प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी कांदा खरेदी भ्रष्ट्राचार झाल्याने त्याची चौकशी करावी, अशा विविध मागण्यांसाठी हे रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे
नाराज छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार? कार्यकर्त्यांशी बैठका, भेटीगाठी सुरु
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळ अजूनही नाराज आहेत. प्रत्येकवेळी भुजबळ कुटुंबियांवर अन्याय होत असल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे.
आज आणि उद्या मुंबईत छगन भुजबळ हे राज्यभरातील प्रमुख ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत. ओबीसी नेत्यांच मत ते जाणून घेणार आहेत. आधी नाशिकमध्ये समता परिषदेत कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आता मुंबईत ओबीसी नेत्यांची घेणार भेट घेत आहे.
Sanjay Raut: पालिका निवडणुका स्वबळावर... संजय राऊतांचे सर्वात मोठे विधान
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढताना दिसत आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वात मोठे विधान केले आहे. आगामी पालिका निवडणुका स्वबळावर लढवाव्या, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि आम्ही कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकतो, असं संजय राऊत म्हणालेत. तसेच काहीही करुन आम्हाला महापालिका निवडणूका जिंकाव्या लागतील, असंही संजय राऊत म्हणालेत.
Mumbai Local: धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीत अडथळा, कर्जत- मुंबई लोकलचला खोळंबा
मुंबई, पुणे शहरात आज धुक्याची दाट चादर पसरली आहे, ज्याचा फटका रेल्वे वाहतूकीला बसला आहे. दाट धुक्यांमुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने होत आहे. कर्जतहून मुंबईकडे जाणारी लोकलसेवा १० ते १५ मिनिटं उशिराने जात आहे.
Maharashtra Politics: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी नेत्यांची गर्दी
नागपूर अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावर चहा पानाकरिता नेते दाखल होत आहेत. गणेश नाईक, भरत गोगावले , चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आदी नेत्यांनी यावेळी उपस्थिती लावली.
Maharashtra Politics: कुर्ल्यातील पदपथांवरील अतिक्रमणावर मुंबई महानगरपालिकेची कारवाई
कुर्ल्यातील पदपथांवरील अतिक्रमणावर मुंबई महानगरपालिकेची कारवाई
कुर्ला येथील बेस्ट बस दुर्घटनेनंतर रस्त्यावरील पादचारी आणि प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे
या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने कुर्ला येथील स. गो. बर्वे मार्ग आणि कुर्ला रेल्वेस्थानक मार्गावरील दुकानांच्या समोरील अवैध बांधकामांवर शुक्रवारी कारवाई केली
पदपथ अतिक्रमणमुक्त झाल्याने या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे
कारवाईदरम्यान दुकानांसमोर लटकवलेले साहित्य, फरशीचे बांधकाम, अनधिकृत छप्पर हटविण्यात आले
कुर्ला येथे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या बेस्ट बस दुर्घटनेत ९ जण ठार झाले
त्यामुळे रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाले आणि दुकानदारांनी अवैधरित्या केलेल्या वाढीव बांधकामांवर अनेकांनी बोट ठेवले
महानगरपालिका प्रशासनाने स. गो. बर्वे मार्ग आणि कुर्ला रेल्वेस्थानक मार्गावरील, महापालिकेच्या ‘एल’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील पदपथांवरील अवैध वाढीव बांधकामे शुक्रवारी जमीनदोस्त केली आहे
Santosh Deshmukh Murder: वाल्मिकी कराड पोलिसांना शरण जाण्याची शक्यता
वाल्मिकी कराड पोलिसांना शरण जाण्याची शक्यता
धनंजय मुंडेंच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता कराड पोलिसांना शरण जाण्याची शक्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भूमिका घेतल्याने कराड पोलिसांना शरण जाण्याची शक्यता
आज किंवा उद्या कराड पोलिसांना शरण जाऊ शकतात: सूत्रांची माहिती
Jalgaon News: पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला, रोकड पळवली
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे परिवर्तन चौकात रात्री साडेदहाच्या सुमारास दोन दुचाकी वर आलेल्या चार अज्ञातांनी रमेश खेवलकर व मंगेश खेवलकर या पिता पुत्रावर धारदार शस्त्राने प्राण घातक हल्ला करत पिता-पुत्रा जवळ असलेल्या 10 हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे. दरम्यान अज्ञानाच्या हल्ल्यात पितापुत्र हे जखमी झाले असून जखमींना तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरू आहे.
Winter Session: बिनखात्याचे मंत्री ते अजित दादांचा संयम, हिवाळी अधिवेशन का ठरलं खास?
नागपूरच्या एक आठवड्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सूप वाजणार आहे आज विधिमंडळामध्ये विधानसभेत विदर्भ मराठवाड्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर अंतिम आठवडा वर दुर्धकांचे प्रश्नांना सत्ताधारी बाकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देतील या हिवाळी अधिवेशनात परभणी बीड या दोन घटना प्रामुख्याने विषय गाजला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही घटनांच्या संदर्भात चौकशीचे आदेश दिले पुढील मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनाची तारीख देखील आज जाहीर होईल.
नागपूर हिवाळी अधिवेशन यंदाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी:
1. यंदाचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन अवघ्या एका आठवड्याचे होते
2. नागपूरमध्ये अनेक वर्षाच्या कालावधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार झाले, पण खातेवाटप शेवटच्या दिवसापर्यंत झालेच नाही त्यामुळे कॅबिनेट मंत्री बिन खात्याचे मंत्री म्हणूनच गणले गेले.
3. विरोधी पक्षनेते शिवाय नागपूरचे हिवाळी अधिवेशन दिसून आले भास्कर जाधव शेवटपर्यंत विरोधी पक्ष नेतेपद पदरात पाडावा म्हणून प्रयत्न करत राहिले पण ते तरी शक्य झाले नाही.
4. विरोधी पक्ष नेते नाही म्हणून विरोधक टीका करत होते तर दुसरीकडे काँग्रेसचा विधिमंडळ घटनेचा अधिवेशन संपून पर्यंत नियुक्त केला गेला नाही नाना पटोले विजय वडेट्टीवार नितीन राऊत यांच्या अंतर्गत स्पर्धाच कायम राहिली.
5. कॅबिनेट विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळांची नाराजी. अजित पवारांवर टीका सत्ताधारी बाकावर चर्चेचा विषय झाला. तर भाजप शिवसेनेत अनेक इच्छुक आमदारांची मंत्रिपदावर वरली नाही यामुळे हिवाळी अधिवेशन त्यांच्यासाठी गुलाबी थंडी आणणारे ठरले नाही.
6. छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर टीका खूप केली पण अजित पवारांनी संयम दाखवत एकही भाष्य भुजबळांच्या विरोधात अद्याप पर्यंत केले नाही. रोखठोक प्रतिमा असणारे अजित पवार स्वतःची कार्यपद्धती बदलताना दिसत आहेत. विनाकारण वाद सुरू असताना वक्तव्य न करता शांत राहत वेळ निभावून नेण्याची अनोखी पद्धत अजित पवारांची देखील चर्चेचा विषय ठरला.
7.कट्टर राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधिमंडळाची भेट चर्चेचा विषय झाला. ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेत गुरुदीप पक्ष नेते पदाची मागणी केली पण ही भेट राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगत आणली.
8.पहिल्या दिवसापासूनच विरोधकांमध्ये अंतर्गत समन्वयाचा अभाव दिसून आला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, रोहित पवार सारखे अनेक नेते पहिले दोन दिवस उपस्थित नव्हते तर संपूर्ण अधिवेशनात फारसा काही प्रभाव आणि आक्रमक भूमिका देखील नाही.
9. शरद पवार एनसीपी कडून जितेंद्र आव्हाड उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून भास्कर जाधव काँग्रेस कडून नाना पटोले विजय वडेट्टीवार यांनी विरोधक म्हणून बऱ्यापैकी सरकारवर टीकेची जोड लगावली
10. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे या अधिवेशनात सर्वाधिक चर्चेचे विषय ठरले बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर वाल्मीक कराड यावरून खूप टीका झाली पण मुंडेंवर कॅबिनेटमध्ये तर लागलीच तसंच अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षिक त्या मदती करत जे संकेत द्यायचे ते दिले.
11. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची वेगळी प्रतिमा या अधिवेशनात सुरू केली आहे सभागृहांमध्ये आधी अधिक आक्रमक भाषण न करता यंदा संयम संतुलित ठेवत सत्ताधारी तसेच विरोधी बाकांवरील आमदारांना सूचक इशारा देखील दिले मुख्यमंत्री म्हणून यंदाची वेगळी टर्म तिसरी असणार आहे हे देखील संकेत दिले गेले.
Sharad Pawar: शरद पवार आज बीड, परभणीच्या दौऱ्यावर, संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज बीड आणि परभणी जिल्ह्याचा दौरा करणार आहे. यावेळी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन संवाद साधणार आहेत. त्यानंतर परभणी येथील मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी जाणार आहे. सोबतच परभणीत बेमुदत धरणे आंदोलन करणाऱ्यांसोबत ते संवाद साधतील. त्यानंतर पवार यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे. कालच संतोष देशमुख आणि परभणी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आपली भूमिका मांडली आहे. त्यानंतर आज होणारा शरद पवारांचा बीड आणि परभणी दौरा महत्वाचा समजला जात आहे....
Nagpur Winter Session: 1 कोटीचा शासकीय निधी हडपला, ग्रामसेवक आणि महिला सरपंचाविरोधात गुन्हा
नागपूर जिल्हा परिषदेतर्फे एक ग्रामसेवक आणि एक महिला सरपंचाविरूध्द एक कोटी वीस लाख रुपये शासकीय निधी अपहार प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध शासकीय कामासाठी आलेला निधी आपल्या खात्यात वळते केल्याप्रकरणी मौजा पांजरी बुद्रुक नावाच्या ग्रामपंचायतीची महिला सरपंच किरण नगराळे आणि ग्राम सेवक रवींद्र टेकाडे यांच्या विरोधात जिल्हा परिषदे कडून अंतर्गत चौकशी नंतर नागपुरच्या बेलतरोडी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kalyan News: कल्याण मराठी कुटुंब मारहाण प्रकरण: आरोपी अखिलेश शुक्लाला अटक
कल्याण मराठी कुटुंब मारहाण प्रकरण:
मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला याला बेड्या
अखिलेश याच्या गाडीत पिवळा दिवा असल्याने गाडीवर कारवाई होणार
खडकपाडा पोलिसांनी गाडी केली जप्त
Indapur Accident: मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटली, चार गाड्यांना जोरदार धडक
इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर एक च्या पूलाजवळ पुण्यातील ससून रुग्णालयातून नांदेडकडे डेड बाॅडी घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात झालाय. यात चार वाहनांचे मोठे नुकसान झालेय.रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आहे.या रुग्णवाहिकेत चालकासह सात प्रवासी होते सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वजन पुणे येथील ससून हॉस्पिटल या ठिकाणाहून नांदेड या ठिकाणी MH 02 CE 9719 या क्रमांकाच्या ॲम्बुलन्स मधून डेड बॉडी घेऊन निघाले होते.
पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेले असताना इंदापूर तालुक्यातील काळेवाडी नंबर एक येथील पूलाजवळ रुग्णवाहिकेचा स्टेरिंग रोड तुटला गेला.त्यामुळे ती रस्ता ओलांडून सोलापूर पुणे लेन वर येऊन पलटी झाली. त्यामध्ये चार गाड्यांचे नुकसान झाले आहे.