जाहिरात

Maharashtra Politics: 'माझ्या नादी लागू नका, मी उलटा फिरलो तर...'; सुरेश धस यांचे जयंत पाटलांना थेट आव्हान

मविआ सरकारमध्ये जलसंपदा मंत्री असताना जिओ टॅगिंग चा जीआर काढला अन् महाराष्ट्राची लूट झाली, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. 

Maharashtra Politics: 'माझ्या नादी लागू नका, मी उलटा फिरलो तर...'; सुरेश धस यांचे जयंत पाटलांना थेट आव्हान

आकाश सावंत, बीड:

MLA Suresh Dhas On Jayant Patil:  "जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये, मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही" असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना थेट आव्हान दिलं आहे. तसेच मविआ सरकारमध्ये जलसंपदा मंत्री असताना जिओ टॅगिंग चा जीआर काढला अन् महाराष्ट्राची लूट झाली, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. 

काय म्हणाले सुरेश धस? 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दुध दरावरुन बोलताना सरकारवर निशाणा साधला होता. यालाच उत्तर देताना आमदार सुरेश धस यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. "जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. दादागिरी नौटंकी तिकडे चालवायची इकडे नाही. देवांनी तुम्हाला जेवढे डोके दिले त्याच्यापेक्षा एक टक्का आमच्या देवांनी सुद्धा जास्त दिले, अशा शब्दात सुरेश धस यांनी जयंत पाटलांवर टीका केली. 

तसेच "तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील आम्ही नाही. तुम्ही आमच्याकडे येऊन डिवचण्याचे काम करता.आम्ही तुमच्याकडे येऊन डिवचू" असे म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी शरद पवार राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ जयंत पाटील यांना जाहीर आव्हान दिले. दुधाच्या प्रश्नावर जयंत पाटील यांनी अधिवेशनात आरोप केलं होते त्यावर उत्तर देताना सुरेश धस यांनी थेट इशारा दिला आहे.

​Bullet Train: अखेर तारीख ठरली!'या' दिवशी धावणार देशातील पहिली बुलेट ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी दिली खूशखबर

पुढे बोलताना "माविआच्या सरकारमध्ये कोण जलसंपदा मंत्री होते. ज्यांच्या कालावधीमध्ये जिओ टॅगिंग चा जीआर काढला. त्याच्या नावाखाली महाराष्ट्राची लूट झाली. पुढच्या अधिवेशनात पहिल्यांदा पहा तसेच महालक्ष्मी सारखी कोणाची संस्था आहे. कोणाचे रजिस्टेशन आहे. त्यांच्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे. कोण डायरेक्टर आहेत हे सुधा पहिल्या दिवशी कळेल" असेही सुरेश धस म्हणाले. बीडच्या मच्छिंद्रनाथ गडावर ते माध्यमांशी बोलत होते.

जयंत पाटलांना धक्का...

दोनच दिवसापूर्वी सांगलीच्या ईश्वरपूर मध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्ष पद जिल्हाधिकारी महिला घोष यांनी अपात्र ठरवले होते अतिक्रमण अनिमत्ता या निकषावर त्यांचे पद रद्द करण्यात आले होते त्याच निकषावर त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांचेही पद रद्द करण्यात आले आहे पेठ सांगली रस्त्यावर महामार्गावर अतिक्रमण केल्याप्रकरणी त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.

नक्की वाचा - Wari History: वारी म्हणजे काय? वारकरी नेमकं कोणाला म्हणतात? जाणून घ्या रंजक इतिहास

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com