जाहिरात

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का! निष्ठावंत शिवसैनिकाने साथ सोडली

नुकताच चिपळूणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून तालुकाप्रमुख विनोद झगडे यांचा पद आणि सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का! निष्ठावंत शिवसैनिकाने साथ सोडली

राकेश गुडेकर, चिपळूण: विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई पुण्यासह शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. नुकताच चिपळूणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून तालुकाप्रमुख विनोद झगडे यांचा पद आणि सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेली साडेतीन वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणारे चिपळूण उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद  झगडे यांनी अखेर आपल्या पद आणि शिवसेनेच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. स्वतः आयोजित केलेल्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या भावना आणि सर्व शिवसैनिकांचे ऋण व्यक्त करून त्यांनी आपला राजीनामा जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांच्याकडे सुपूर्द केला.

शिवसेनेत उभी  फूट पडल्यानंतर अत्यंत कठीण काळात पक्षाने तालुकाप्रमुख या पदाची जबाबदारी विनोद झगडे याच्याकडे सोपवली होती.जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम सभापती पदाचा अनुभव आणि तालुक्यात दांडगा संपर्क असलेल्या झगडेनी अल्पावधीतच एक दमदार तालुकाप्रमुख म्हणून स्वतःला सिद्ध केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ग्रामपंचायत,लोकसभा विधानसभा या सर्वच निवडणुकांमध्ये उबाठा शिवसेनेने लक्षवेधी कामगिरी केली.

नक्की वाचा - भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली? पडद्याआड काय घडलं? वाचा Inside Story

अनेक ग्रामपंचायतींवर भगवा फडकला.लोकसभेला विनायक राऊत यांना सम्पूर्ण मतदारसंघात मोठं मताधिक्य दिलं, तर विधानसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रशांत यादव यांना देखील विजयाच्या जवळ नेऊन ठेवण्यात विनोद झगडे यांनी मोलाची कामगिरी बजावली होती.

दरम्यान, मात्र लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर इथल्या पक्ष संघटनेत कमालीची शितीलता आली. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहिला नाही, तर वरिष्ठ पातळीवरून देखील इथल्या शिवसैनिकांना बळ देण्यात दुर्लक्ष झालं.एकूणच या परिस्थितीत नेतृत्व सांभाळणे कठीण झाल्याने विनोद झगडे हे राजीनाम्याच्या निर्णयापर्यंत आले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com