Maharashtra Politics LIVE Updates: राज्याच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. आज महायुतीमधील महत्त्वाचे पक्ष असलेले शिंदेंची शिवसेना आणि भाजप आज छत्रपती संभाजीनगरमधून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग फुकणार आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरच्या संत एकनाथ रंग मंदिरात शिवसैनिकांचा मेळावा घेणार आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी निवडणुकीच्या नियोजना संदर्भात मराठवाडा विभागाच्या बैठकीला उपस्थित असणार आहेत.
LIVE Update: राज ठाकरे, CM देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या एकाच मंचावर...
महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचिंग कार्यक्रमाला एकाच मंचावर...
उद्या सायंकाळी लोअर परेल येथे पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत...
LIVE Update: पुण्यात उद्या भाजपची महत्वाची बैठक
पुण्यात उद्या भाजपची महत्वाची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नेत्यांसोबत पुण्यात बैठक घेणार
बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
पश्चिम महाराष्ट्रातल्या पक्ष संघटनेवर आणि मोर्चे बांधणीवर पुण्यात चर्चा
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्वाची बैठक
LIVE Update: महाडमध्ये पोलिस हवालदार ACB च्या जाळ्यात
रायगडच्या महाडमध्ये पोलिस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा जाळ्यात लाच स्विकारताना रंगे हात पकडला गेला आहे. विषाल वाघाटे असे या आरोपीत पोलिस हवालदाराचे नाव आहे. पोस्को कायद्या अंर्तगत कारवाई न करणे आणि योग्य ती मदत करण्यासाठी आरोपी वाघाटे याने पाच लाखाची लाच मागीतली होती. पैकी तीन लाख रूपये स्विकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. या प्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुढील कारवाई करीत आहे.
LIVE Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आढावा घेणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आढावा घेणार ...
भाजपाची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारी सुरु
3 दिवसांत 6 विभागांच्या बैठकी होणार...
आज 10 ऑक्टोबरला नाशिक आणि संभाजीनगर येथे मराठवाडा विभागांच्या पदाधिकार्यांच्या बैठका
11 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागांच्या पदाधिकार्यांच्या बैठका
13 ऑक्टोबरला अमरावती आणि नागपूर विभागांच्या पदाधिकार्यांच्या बैठका
नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर येथे होणार जिल्हाश: बैठका.
LIVE Update: सिंधुदुर्गातील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाला गती
सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वास्तूंनी नटलेला, धार्मिक अधिष्ठान असलेला जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने तसेच ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी येथील नांदोश गढीचे शास्त्रीय उत्खनन, भगवंतगडची पुरातत्त्वीय पाहणी आणि रामगडला ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.
LIVE Update: बिल्डरला धमकावत घायवळ टोळीचा दहा फ्लॅटवर ताबा
घायवळ याच्या टोळीने कोथरूड परिसरातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाला डोक्याला पिस्तूल लावून जिवे मारण्याचे धमकावत एकूण १० फ्लॅटवर बेकायदेशीरपणे खंडणीच्या स्वरूपात ताबा मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी व्यावसायिकाने ७ वर्षे त्रास सहन केल्यावर तक्रार दाखल केली.
LIVE Update: शासनाने बंदी घातलेल्या 'रेस्प्रिफ्रेश कफ सिरप'चा साठा बीडमध्ये आढळला
बालकांना दिल्या जाणाऱ्या आणि शासनाने बंदी घातलेल्या 'रेस्प्रिफ्रेश-टीआर कफ सिरप' चा मोठा साठा बीड शहरात आणि जिल्ह्यातील काही भागांत आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रतिबंधित औषधाचा पुरवठा पुण्यातून झाल्याची माहिती समोर आली आहे.
'रेस्प्रिफ्रेश कफ सिरप' हे औषध बालकांसाठी अत्यंत हानिकारक आहे. याचे कारण म्हणजे या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल नावाचे घातक रसायन आहे, जे ब्रेक ऑईलमध्ये वापरले जाते आणि लहान मुलांच्या मूत्रपिंडावर आणि यकृतावर वाईट परिणाम करते. त्यामुळे शासनाने या सिरपच्या निर्मिती, विक्री आणि पुरवठ्यावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे.