जाहिरात

बेसावधपणे टॉयलेटमध्ये गेला, आणखी कुणीतरी असल्याचा भास; सीटवर बसणार तोच..., थरकाप उडवणारा Video

तुम्ही बाथरुममध्ये गेलात आणि अचानक लक्षात आलं की त्या खोलीत तुमच्याशिवाय आणखी कुणीतरी आहे तर...?

बेसावधपणे टॉयलेटमध्ये गेला, आणखी कुणीतरी असल्याचा भास; सीटवर बसणार तोच..., थरकाप उडवणारा Video

Snake Found Sitting Inside Toilet Seat: तुम्ही बाथरुममध्ये गेलात आणि अचानक लक्षात आलं की त्या खोलीत तुमच्याशिवाय आणखी कुणीतरी आहे तर...? नक्कीच तुम्हाला भीती वाटेल, मात्र दुसरी कोणी व्यक्ती नसून जनावर असल्याचं कळताच घामाच्या धारा लागतील. असाच भीती वाढवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्यक्तीला टॉयलेयमध्ये पाहण्याची सवय नव्हती. हिच सवय चिंता वाढवणारी ठरली आहे.  

टॉयलेटच्या सीटवर जनावराचा वावर...(snake hiding toilet seat)

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ घराच्या बाथरुममधला आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, भारतीय शौचालयाच्या सीटवर एक लांबलचक साप बसलेला आहे. यावेळी त्याच्या शेपटीचा भाग दिसून येत आहे आणि तो अत्यंत शांत आहे. मात्र कोणी आल्याचं कळताच तो जलद वेगाने आता निघून जातो. यावरुन असं लक्षात येतं की बऱ्याच काळापासून तो तिथं लपून होता. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

जर कुणी बसलं असतं तर?.... (Snake Viral Video)

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याशिवाय मजेशीर प्रतिक्रियाही येत आहेत. एका युजरने लिहिलंय, आता टॉयलेटमध्येही सीसीटीव्ही लावायला हवेत. तर दुसऱ्याने लिहिलंय, यापुढे टॉयलेटमध्ये गेल्यावर अधिक लक्ष द्यायला हवं. तर आणखी एकाने लिहिलंय, या टॉयलेटमध्ये कुणी बसलं असतं तर...? तज्ज्ञांनुसार, अनेकदा साप पाइपलाइन, सिव्हरेट किंवा बाथरूमच्या ड्रेनेज मार्गावरुन येतात. विशेषत: मान्सून आणि उन्हाळ्यात साप अशा प्रकारे सापडण्याचं प्रमाण वाढतं. 

Emotional Video : रात्री झोपला अन् उठलाच नाही..., रिक्षाचालकाने 27 वर्षांचा मुलगा गमावला; भावुक करणारी कहाणी

नक्की वाचा - Emotional Video : रात्री झोपला अन् उठलाच नाही..., रिक्षाचालकाने 27 वर्षांचा मुलगा गमावला; भावुक करणारी कहाणी

व्हिडिओमधून आवश्यक माहिती... (Bathroom Snake Video)

हा भीती वाढविणारा व्हिडिओ नसून एक महत्त्वपूर्ण इशारा आहे. 

१ बाथरूम नियमित स्वच्छ ठेवा
२ सीट किंवा कॉर्नरचा वापर करण्यापूर्वी लक्ष देऊन पाहा
३ मान्सूनमध्ये अधिक काळजी घ्या
४ धोका कुठेही लपून बसू शकतो. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com