Mumbai Pune Heavy Rain : 14 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी रात्रीपासूनच मुंबई, मुंबई उपनगरासह ठाणे, पालघर भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आज दिवसभर पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 3 तास मुंबई, उपनगर, रायगड, सोलापूर, ठाणे येथे ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची तसेच विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Solapur Rain News LIVE Updates: अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरातील गावात पूरजन्य परिस्थिती
मागील काही दिवसाच्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरातील गावात पूरजन्य परिस्थिती.
बोरी नदीच्या पूरजन्य परिस्थितीमुळे गावातील मार्ग झाले बंद .
पुराच्या पाण्यात रुग्णांना स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत.
पुराच्या पाण्यामुळे रुग्णवाहिका गावातून पोहोचू शकल्याने रुग्णांना गावातील ओड्याचा पूल बैलगाडीने पार करावा लागतो.
गावातील वृद्ध महिलेला दवाखान्यात जाण्यासाठी गावात रुग्णवाहिका पोहोचत नसल्याने नागरिकांनी बैलगाडीने रुग्णवाहिक पर्यंत नेले.
Sangli Rain LIVE Updates: गोदावरी दुथडी भरून वाहत आहे, गंगाखेड मधील गोदाकाठचे मंदिरं पाण्याखाली
जायकवाडी आणि माजलगाव धरणातून सोडण्यात आलेलं पाणी आणि जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून गोदावरी घाटावरील मंदिरे पाण्याखाली गेले आहेत, मागील चार दिवसापासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली तर दुसरीकडे गोदावरी नदीवरील प्रमुख प्रकल्प असलेल्या जायकवाडी आणि माजलगाव धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे नदी चे पात्र वाढले आहे. यानंतरही मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने प्रशासनाने गाव परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे
Sangli Rain LIVE Update: सांगलीमध्ये मुसळधार पाऊस, दुपारपासून सुरू आहे संततधार
सांगली शहरासह परिसरामध्ये देखील आता मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते,मात्र दुपारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन पावसाला सुरुवात झाली होती,दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून संततधार असा पाऊस पडत आहे त्यामुळे सांगलीतील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे,सांगलीसह मिरज शहर परिसरामध्ये देखील जोरदार असा पाऊस पडत आहे.
Rain Update : आष्टी तालुक्यात मुसळधार पाऊस; नदी-नाले तुडुंब, कमांडो-हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांची सुटका
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आष्टी तालुक्यात सर्वत्र नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक गावांमध्ये पाणी घरात घुसल्याने नागरिक अडचणीत आले. काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. दरम्यान, पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी कमांडो पथक आणि हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. सकाळपासूनच प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन पथके युद्धपातळीवर मदत कार्यात गुंतली आहेत.
या आपत्कालीन परिस्थितीत आमदार सुरेश धस यांनी स्वतः मदत कार्याची सूत्रे हातात घेतली. सकाळपासूनच ते पूरग्रस्त भागात फिरत आहेत. पूरग्रस्त गावांमधून आतापर्यंत शेकडो नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र शेतीपिके, जनावरांची हानी आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर येत आहे.
Rain Update : पनवेलमध्ये मुसळधार पावसामुळे गाडी नदी किनाऱ्याच्या घरांमध्ये पाणी शिरलं
पनवेलमध्ये मुसळधार पावसामुळे गाडी नदी किनाऱ्याच्या घरांमध्ये पाणी शिरलं . त्याचा परिणाम शहरातील सखल भागात पाणी साचायल होत . परिणामी शंभर ते सव्वाशे घरांमध्ये पाणी शिरले होते. पनवेल महानगरपालिका साफसफाई करत नसल्याने याचा परिणाम दैनंदिन जीवनावर तसेच मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागत असल्याचं स्थानिकांनी आरोप केला आहे .
Rain Update : जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे आज पुन्हा 1 फुटाने उघडले
जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे आज पुन्हा 1 फुटाने उघडले
मागील एक ते दीड तासांपासून पैठण तालुक्यात मुसळधार पाऊस चालू असल्याने धरणात आवक वाढली
आवक वाढल्याने पुन्हा 18 दरवाजे उघडले; 18 हजार 864 क्युसेकने गोदावरी नदी पात्रात विसर्व सुरू
टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढण्यात येणार असल्याची शक्यता
गोदाकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा
Live Update : छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड तालुक्यात सकाळपासून तुफान पाऊस
छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड तालुक्यात सकाळपासून पाऊस सुरू आहे , आमठाणा धावडा या गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय तर तालुक्यातील देऊळगाव बाजार या गावात पाणी शिरले आहे, आमठाणा सह आजूबाजूंच्या वाड्या वस्त्यांमध्ये सुद्धा पाणी घुसले तर पुलावरून सुद्धा पाणी वाहत आहे या पुराचा नागरिकांना फटका बसलाय
Live Update :मराठवाड्यात गेल्या 24 तासांत 32 मंडळात अतिवृष्टीची नोंद
मराठवाडा पाऊस अपडेट....
मराठवाड्यात गेल्या 24 तासांत 32 मंडळात अतिवृष्टीची नोंद
बीड, लातूर, धाराशिव,,हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद
गेल्या 24 तासात सर्वाधिक बीड जिल्ह्यातील 15 मंडळात अतिवृष्टीची नोंद
बीड जिल्ह्यातील 15 , लातूर 4, धाराशिव 7, परभणी 4 आणि हिंगोली जिल्ह्यातील 2 मंडळात अतिवृष्टीची नोंद
Rain Update : सिंधुदुर्गात पुन्हा पावसाला सुरुवात, यल्लो अलर्ट जारी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून काही ठीकाणी पावसाची रीपरीप सुरू आहे. आज दुपार पासून जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असून सावंतवाडी तालुक्यात पावसाने हजरी होती.तसेच त्यानंतर कुडाळ मध्ये देखील पाऊस सुरू झाला आहे.आज सह्याद्री पट्ट्यासह किनारपट्टी भागात पावसाचा जोर असण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
Rain Update : मुंबईच्या पूर्व उपनगरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धुकं
मुंबईच्या पूर्व उपनगरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धुकं पसरले आहे. यामुळे दृश्यमान देखील कमी झाली आहे. मुंबई सह उपनगरामध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे. अशात मुंबईच्या पूर्व उपनगरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धुक पसरले आहे. यामुळे दृश्यमान देखील कमी झाले आहे. याचा फटका रस्ते वाहतुकीला बसताना दिसत आहे. यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी देखील आढळून येत आहे
Live Update : उपमुख्यमंत्र्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका, शिंदे यांची कार पूर्व द्रुतगती मार्गावर अडकली
उपमुख्यमंत्र्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका, शिंदे यांची कार पूर्व द्रुतगती मार्गावर अडकली
Rain Update : हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट, सकाळपासूनच पिंपरी चिंचवड शहरात पावसाची संततधार
सकाळी कामाला निघालेल्या पिंपरी चिंचवड करांना पावसाने चांगलाच झोडपून काढलं आहे, तिकडं शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ही 100 टक्के भरले असून अद्याप त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला नाहीय. परतीच्या पावसाचा अंदाज घेता नागरिकांनी आवश्यकता असल्यासचं घराबाहेर पडण्याचं आवाहन ही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Rain Update : थेऊरमध्ये 50 घरामध्ये शिरलं पाणी, घटनास्थळावर एनडीआरएफ दाखल
थेऊरमध्ये 50 घरामध्ये शिरलं पाणी, घटनास्थळावर एनडीआरएफ दाखल
मुसळधार पावसामुळे थेऊर मध्ये घुसलं पाणी
अनेक घरे घर पाण्याखाली..
घटनास्थळावर पोलीस एनडीआरएफ दाखल.
थेऊर सह धायरी आणि इंदापूर मध्येही मोठ्या प्रमाणात अनेक घरात घुसले पाणी..
50 ते 60 जणांची सुखरूप केली सुटका..
Live Update : आष्टी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; अनेक गावांचा संपर्क तुटला
बीडच्या आष्टीत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून देवळालीसह सुलेमान, देवळा, दौलावडगाव या गावांत पाणी शिरल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्या आहेत. अहिल्यानगर–बीड मार्गावरील धानोरा येथील कांबळी नदीला पूर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अचानक आलेल्या या पुरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी सदर करावे असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Rain Update : थेऊर येथील रुके वस्ती जिल्हा परिषद शाळा परिसरात पावसाच्या पाण्यात 100-150 नागरिक अडकले
पुण्यात 15 सप्टेंबर रोजी थेऊर येथील रुके वस्ती जिल्हा परिषद शाळा परिसरात पावसाच्या पाण्यात 100-150 नागरिक अडकले. स्थानिक मदतकार्याबरोबरच पीएमआरडीए व NDRF टीमने बचाव करून सुमारे 50-55 नागरिकांना सुरक्षित हलविले. पाणी ओसरत असून सकाळपर्यंत उर्वरित नागरिक घरी परततील. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Rain Update : दादर स्थानकापूर्वी रेल्वे ट्रॅकवर साचलं पाणी
Rain Update : नवी मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं..
नवी मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं..
Rain Update : मुंबईतील पावसामुळे मोनो खोळंबली
Rain Update : मुंबई पावसामुळे मोनो रेलमध्ये तांत्रिक बिघाड
मुंबई पावसामुळे मोनो रेलमध्ये तांत्रिक बिघाड
तब्बल एक तासभर मोनोरेल एकाच जागेवर उभी होती. तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेल बंद झाली होती. यानंतर प्रवाशांना त्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. यामधून १७ प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आहे.
Rain Update : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट, पुढील 3 तास धोक्याचे
Rain Update : हवामान विभागाकडून मुंबईला रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा
Rain Update : रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट
गेले काही दिवस पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र होतं.. पण काल संध्याकाळपासून पावसाने पुन्हा पुनरागमन केलं आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी रात्री पावसाची संततधार सुरू होती. पण आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. सध्या ढगाळ वातावरण जिल्ह्यात आहे.. दरम्यान आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 27.05 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.. मंडणगड, रत्नागिरी आणि लांजा या तालुक्यांमध्ये 30 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे..
Rain Update : मुंबईत मुसळधार पावसामुळे मोनो रेल बंद
मुंबईत मुसळधार पावसामुळे मोनो रेल झाली बंद, वडाळा परिसरात मोनो रेल बंद
Live Update : आज मुंबईत तुफान पावसाची शक्यता
Rain Update : खडकवासला धरणातून आज सकाळी ६ वाजता १८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू
खडकवासला धरणातून आज सकाळी ६ वाजता १८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाच्या वाढलेल्या प्रमाणामुळे, धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतला आहे. सध्या खडकवासला धरण पूर्ण भरले असून, त्यातून सुमारे १८०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. याव्यतिरिक्त, पानशेत धरणातून १३०० क्युसेकने आणि वरसगाव धरणातून १०८८ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे, मुठा नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना नदीकाठच्या भागात सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नदीपात्रात किंवा नदीकाठच्या परिसरात अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. नदीकाठच्या गावांना आणि पुलांजवळील रहिवाशांना सुरक्षित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. ज्या गावांतून पाणी जाणार आहे, त्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
Rain Update : खार सबवेजवळ अर्धा फूट पाणी साचलं, वाहतूक मंद गतीने
Rain Update : कुर्ला स्थानकाजवळ पाणी साचल्याची माहिती
कुर्ला स्थानकाजवळ पाणी साचल्याची माहिती
रविवारी रात्रीपासून मुंबईत तुफान पाऊस सुरू झाला असून याचा परिणाम लोकल सेवेवर होत असल्याचं दिसून येत आहे. 
Rain Update : मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी..
मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी..
स्थानिक शाळाने निर्णय घेऊन दिली मुलांना सुट्टी..
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सुट्टी..
हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी..
पुण्यात रात्रीपासून सुरू आहे मुसळधार पाऊस या पावसामुळे शाळांना सुट्टी.
Rain Update : मुंबई शहर, ठाणे, रायगड, अहिल्यानगर, बीड, पुणे भागात ऑरेंज अलर्ट
मुंबई शहर, ठाणे, रायगड, अहिल्यानगर, बीड, पुणे भागात ऑरेंज अलर्ट
पुढील तीन तासात वारासह मुसळधार पाऊस अंदाज कुलाबा वेधशाळा वर्तविला आहे
Rain Update : अकोल्यात मुसळधार पावसाची हजेरी !
अकोला शहरासह ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मोठी उमरी, गुडधी, यावलखेड, सांगळूद, बाबुळगाव, बोरगावसह परिसराला पावसानं झोडपून काढलं. पावसामुळे हॉटेल विक्रेत्यांसह अकोलेकरांची चांगलीच धावपळ उडाली. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, अकोला जिल्ह्यात पुढील ३ दिवसांचा येलो अलर्ट दिला असून, आजपासून १७ सप्टेंबरपर्यंत, शहरासह ग्रामीण भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Rain Update : पोलादपुर महाबळेश्वर रस्त्यावर दरड
पोलादपुर महाबळेश्वर रस्त्यावर रात्री उशीरा दरड कोसळली. आंबेनळी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या कापडे गाव हद्दीत हि दरड कोसळली असून यामुळे काहीकाळ रस्ता बंद ठेवण्यात आला होता. प्रशासनाने तात्काळ JCB आणि मनुष्य बळाचा वापर करीत रस्त्यावरील दगड माती हटवून मार्ग मोकळा केला. योग्य ती काळजी घेऊन पोलादपुर महाबळेश्वर रस्त्याचा वापर करण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
Rain Update : जोरदार पडलेल्या पावसानंतर सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ
विवारी सायंकाळी दक्षिण रायगडला जोरदार पावसाने झोडपले. याचा सर्वाधिक फटका महाड आणि पोलादपुरला बसला. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने महाड शहर चांभारखिंड परिसरात, मुंबई गोवा महामार्गालगत सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते तर महाबळेश्वर परीसरा झालेल्या जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली असून पोलादपुरमधील सावित्री नदी लगतच्या परिसरात रस्त्यावर रात्री उशिरा पर्यंत पुराचे पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता. दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
Rain Update : पुण्याच्या इंदापूर तालुक्यात गेल्या 24 तासाहून अधिक काळ पाऊस सुरू
पुण्याच्या इंदापुर तालुका आणि शहरात गेल्या दोन दिवसापासून मोठा पाऊस कोसळतोय. परवा पासून पावसाची सुरू झालेली संततधार अद्यापही थांबली नाही. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने इंदापूर शहरातील पाणदरा नाला तुडूंब भरून वाहिला गेला. या पाण्यामुळे शहरातील पाणदरा,कासारपट्टा परिसरात काहीशा प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पहायला मिळालं आहे.
मात्र गेल्या 24 तासात मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग काही प्रमाणात सुखावला गेलाय. गेल्या दोन दिवसापासून हा पाऊस सुरू असून आज सकाळपासून देखील मेघ दाटून आलेले आहेत आणि पावसाची संततदार सुरूच आहे त्यामुळे आज दिवसभर देखील हा पाऊस सुरूच राहील असा अंदाज आहे.
Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसत आहे. विशेष म्हणजे सर्वच जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाड्यात दोन दिवसांत एकूण ३२ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, याचा सुमारे ६४० गावांना फटका बसला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात तर पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. अनेक गावांत शेकडो एकर जमिनी पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. पावसाचा जोर पाहता जायकवाडी धरणाचे देखील संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले होते, त्यामुळे गोदावरीला देखील मोठा पूर आला. तर पुढील २ दिवसांत छत्रपती संभाजीनगरसह परभणी, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली व जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
Rain Update : अंधेरी सबवे येथे एक ते दीड फूट पावसाचे पाणी साचल्याने तेथील वाहतूक बंद
Rain Update : हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी..
हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी..
मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी..
स्थानिक शाळाने निर्णय घेऊन दिली मुलांना सुट्टी..
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सुट्टी..
हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी..
पुण्यात रात्रीपासून सुरू आहे मुसळधार पाऊस या पावसामुळे शाळांना सुट्टी.
Rain Update : हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी..
हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी..
मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी..
स्थानिक शाळाने निर्णय घेऊन दिली मुलांना सुट्टी..
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सुट्टी..
हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी..
पुण्यात रात्रीपासून सुरू आहे मुसळधार पाऊस या पावसामुळे शाळांना सुट्टी.
Rain Update : मुसळधार पावसामुळे लोकल सेवा उशिराने
मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा उशिराने धावत आहे
पावसाचा थेट परिणाम मुंबईतील रेल्वे सेवेवर
मध्य रेल्वे १० ते १५ मिनिटं उशिरा तर हार्बर लाईन सुद्धा ७ ते १० मिनिटं उशिरा धावतेय
पावसाचा परिणाम पश्चिम रेल्वेवर सुद्धा पश्चिम रेल्वे ५ मिनिटं उशिराने धावत आहे
सकाळच्या सत्रात पावसामुळे चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे पावसामुळे हाल