जाहिरात

Mumbai Pune Rain News: मुंबई- पुण्यात पावसाची बॅटिंग! नागरिकांची तारांबळ, लोकलची स्थिती काय?

Mumbai Pune Rain Live Updates: पावसाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन सज्जही सज्ज झाले आहे.

Mumbai Pune Rain News: मुंबई- पुण्यात पावसाची बॅटिंग! नागरिकांची तारांबळ, लोकलची स्थिती काय?

Mumbai Pune Rain News: गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा बॅटिंग सुरु केली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूरमध्ये आज सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईमधील जोरदार पावसामुळे नोकरीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाल्याचे पाहायला मिळालेत. हवामान खात्यानेही मुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. 

नवी मुंबई (Navi Mumbai Rain) शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतील बेलापूर, वाशी, खारघर, उरण या भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन सज्जही सज्ज झाले आहे.

Maharashtra Rain Update: राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं कमबॅक; मुंबई, पुण्यात काय आहे स्थिती?

 मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात, रेल्वे वाहतूक विस्कळीत (Mumbai Rain)

मुंबईमध्ये सुरु झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची ( Central Railway Issue) वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोरदार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसल्याचे दिसत असून चाकरमान्यांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे मुंबईत पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Mumbai Weather Update) दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर समुद्रालगत कोणीही जाऊ नका, असं आवाहन मुंबई पोलिसांनी ही सोशल मीडियावरुन केले आहे.

पुण्यातही पावसाची हजेरी (Pune Rain Update)

 पुणे शहर (Pune Rain Update) आणि परिसरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आज देखील पाऊस हा सातत्याने पडताना दिसत आहे त्यामुळे पुणे शहरांमध्ये काही प्रमाणात वाहतूक कुंडीचा त्रास हा पुणेकरांना सहन करावा लागलाय यासोबतच काही सखल भागात देखील पाणी साचले आहे याशिवाय पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ होताना दिसत आहे.

Satara Rain Update : साताऱ्यात 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज, नदीकाठच्या गावांना इशारा; कोयना धरणाचे दरवाजे उघडले जाणार

पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट (Pune Weather Update)

कोल्हापुरात (Kolhapur Rain) गेल्या आठवड्याभरापासून पावसाने थोडीशी विश्रांती दिलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. पंचगंगा नदीची घटलेल्या पाणी पातळीत पुन्हा एक फुटाने वाढ झालीये. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाचं प्रमाण वाढलं आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आज पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रेड अलर्ट जारी केला आहे. 

हवामान विभागाने नागरिकांना पुढील काही तास अत्यंत सावध राहण्याचे आणि शक्यतो घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. घाटमाथ्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांनी सतर्क राहावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून, स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या सूचना:
    •    पावसाळी भागात प्रवास टाळावा
    •    नद्यांच्या किंवा ओढ्यांच्या काठावर जाणे टाळावे
    •    शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांना आवश्यक असल्यास सुट्टीचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल
    •    नागरिकांनी अधिकृत स्त्रोतांमधूनच माहिती घ्यावी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com