जाहिरात

Satara Rain Update : साताऱ्यात 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज, नदीकाठच्या गावांना इशारा; कोयना धरणाचे दरवाजे उघडले जाणार 

Satara Koyna Dam : या पार्श्वभूमीवर कोयना नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक कारणासाठी नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. 

Satara Rain Update : साताऱ्यात 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज, नदीकाठच्या गावांना इशारा; कोयना धरणाचे दरवाजे उघडले जाणार 

Satara Rain Update : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. विशेषतः महाबळेश्वर, पाटण, कोयना, परिसरात प्रचंड पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल (14 जुलै) रात्रीपासून पावसाचा जोर अधिकच वाढला असून, परिणामी कोयना धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे.

सध्या कोयना (Satara Koyna Dam) धरणात प्रति सेकंद 16 हजार क्युसेक्स पाण्याची आवक कोयनात सुरू आहे. कोयना धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 105 टीएमसी इतकी आहे. त्यापैकी 75.50 टीएमसी इतका पाण्याचा साठा आज सकाळपर्यंत नोंदवला गेला आहे. वाढत्या पावसाचा अंदाज पाहता, कोयना धरण प्रशासनाने सहा वक्रदरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

Kajwa Festival : राज्यातील काजवा महोत्सवांवर निर्बंध; काजव्याचा प्रजनन काळ धोक्यात येणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश

नक्की वाचा - Kajwa Festival : राज्यातील काजवा महोत्सवांवर निर्बंध; काजव्याचा प्रजनन काळ धोक्यात येणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश

आज (मंगळवार) दुपारी 11 वाजता, कोयनामधून 5 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होणार असून, सध्या पायथ्याच्या जलविद्युत प्रकल्पातून 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे 11 नंतर एकूण 7100 क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात होणार आहे.

साताऱ्यातील काही ठळक पावसाचे आकडे 

महाबळेश्वर – 92 मिमी, आज अखेर 2218 मिमी

पाटण – 108 मिमी

कोयना– 103 मिमी आज अखेर 2330 मिमी

नवजा - 134 मिमी आज अखेर 2202 मिमी

जावळी तालुका – 98 मिमी

सातारा शहर – 65 मिमी

या पार्श्वभूमीवर कोयना नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक कारणासाठी नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे काही भागांत जमीन खचण्याच्या घटना, वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकारही समोर येत आहेत. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठीही जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com